दिवे देत नाही
लेखनविषय:
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या
चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या
पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता
पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता
जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला
स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ
लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ..
कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून
कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून
तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई
म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही
- संध्या
अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती.
अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे. टेक इट लाईटली मधल्या लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ अशा रितीने काही ठिकाणी वापरात आहेत. खुलासा फक्त संदर्भ म्हणून
वाचने
2036
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख
( चक्क ढापलंय. :फिदी: अर्थ विचारू नये )
>>>खुलासा फक्त संदर्भ म्हणून
ब्वार्र !
मा लिख मा लिख मा लिख
अलख अलख अलख
लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ ........... अल्सर च काय??/
In reply to लाईटचे हलकेच आणि दिवे असे by अविनाशकुलकर्णी
अल्सर ही फ्रेज नाही. एका वाचकाने (मिपावर नाही ) सिरीयसली विचारलंय. खळ्या गालाच्या आतल्या बाजूला कि बाहेर पडतात ? त्याला दुस-याने उत्तर पण दिलंय कि त्याला अल्सर म्हणतात. :फिदी: आतल्या बाजूस खळ्या पडल्या तर गालाला तोंड नसते का म्हटले ?
:)
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या
चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या > 

शब्द उगा ओढून ताणून जुळवल्यासारखे वाटले.
काही कळलं नाही.
In reply to काही कळलं नाही. by सूड
कैच कल्ला नाय
**********
आजचा सुविचारः अॅब्स मारा, पण दणकून !! :)
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ..:) ही आयडीया भारी आहे.
धन्यवाद सर्वांचे
सूड, स्पा
हा दोष माझा. इथे संदर्भ माहीत नसल्याने असं होणं शक्य आहे.
वण लायणर आवडले पण संदर्भ कळ्ळा नै कैच.
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख