दिवे देत नाही
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या
चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या
पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता
पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता
जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला
स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ
लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ..
कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून
कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून
तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई
म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही
- संध्या
अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती.
अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे. टेक इट लाईटली मधल्या लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ अशा रितीने काही ठिकाणी वापरात आहेत. खुलासा फक्त संदर्भ म्हणून
वर्गीकरण
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख
>>>खुलासा फक्त संदर्भ म्हणून
मा लिख मा लिख मा लिख
लाईटचे हलकेच आणि दिवे असे
In reply to लाईटचे हलकेच आणि दिवे असे by अविनाशकुलकर्णी
अल्सर ही फ्रेज नाही. एका
:)
काल एका कवीच्या, गाली होत्या
शब्द उगा ओढून ताणून
काही कळलं नाही.
In reply to काही कळलं नाही. by सूड
++१
मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा
धन्यवाद सर्वांचे
वण लायणर आवडले पण संदर्भ