मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवे देत नाही

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही - संध्या अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती. अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे. टेक इट लाईटली मधल्या लाईटचे हलकेच आणि दिवे असे दोन्ही अर्थ अशा रितीने काही ठिकाणी वापरात आहेत. खुलासा फक्त संदर्भ म्हणून

वाचने 2035 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सांजसंध्या Sat, 03/16/2013 - 13:25
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख ( चक्क ढापलंय. :फिदी: अर्थ विचारू नये )

In reply to by अविनाशकुलकर्णी

सांजसंध्या Sun, 03/17/2013 - 08:31
अल्सर ही फ्रेज नाही. एका वाचकाने (मिपावर नाही ) सिरीयसली विचारलंय. खळ्या गालाच्या आतल्या बाजूला कि बाहेर पडतात ? त्याला दुस-याने उत्तर पण दिलंय कि त्याला अल्सर म्हणतात. :फिदी: आतल्या बाजूस खळ्या पडल्या तर गालाला तोंड नसते का म्हटले ?