एक भिंत येथे होती
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१||
एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ ||
काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३||
एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४||
ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५||
- संध्या
०६ मार्च २०१३
वाचने
1953
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||__/\__ परत एकदा एक रेखिव रचना.
In reply to अहाहा by मिसळलेला काव्यप्रेमी
1
आणी...
एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली|| >>> या साठी __/\__
आवडली
सुंदर! आवडली!!
अ प्र ति म !
छान कविता !!
सर्वांचे आभार
आवडली.
:)
आवडली!
अहाहा