मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक भिंत येथे होती

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१|| एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ || काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३|| एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४|| ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५|| - संध्या ०६ मार्च २०१३

वाचने 1951 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

1 आणी... एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली|| >>> या साठी __/\__