Skip to main content

उसाचा रस, चारचाकी गाडी आणी पेट्रोलला डच्चु..!!

लेखक यशोधन वाळिंबे यांनी मंगळवार, 26/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डिस्कव्हरी वर सहज एक संशोधनात्मक कार्यक्रम पाहत बसलो होतो. त्यातील विषय पाहुन थोडे बरे वाटले कारण त्याच्या आदल्याच दिवशी आपल्या मायबाप सरकारने जनतेप्रती असलेल्या अगाध प्रेमामुळे पेट्रोलची 'नाईलाजास्तव (?)' भाडेवाढ केली होती. असो तर विषय असा होता कि पेट्रोलला कोण कोणत्या गोष्टींचा पर्याय आहे ? आपल्याकडच्या विद्वान माणसांनी (ज्यांपुढे न्युटन,आईनस्टाईन अशा लोकांनी गुढगे टेकावेत) नक्कीच डिझेल असे एकमताने उत्तर दिले असते.. पण माझी बुद्धी सर्वसामान्यांप्रमाणेच शुल्लक असल्याने मी यावर थोडा अभ्यास करायचे ठरवले. त्यात बऱ्याच गोष्टी ह्या पेटोलला पर्याय असल्याच्या समोर आल्या. तुम्ही आम्ही ज्याचा रस अगदी आवडीने पितो तो उस देखील पेट्रोलला पर्याय असू शकतो हे पाहुन आश्चर्य वाटले. भविष्यात अशा मोटारीतून प्रवास करायला मजा येईल हे मात्र नक्की.. अधिक माहितीसाठी माझ्या ह्या लेखावर नजर टाका..

चारचाकी मोटार उसाचा वापर करून चालु शकते का ?

उसाचा रस, चारचाकी गाडी आणी पेट्रोलला डच्चु आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..

वाचने 14879
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

तुम्ही सतत तुमच्या ब्लॉगची गर्दी वाढवण्यापेक्षा सगळा लेखच इथे का टाकत नाही ? दहा ठिकाणी उगाच क्लिकक्लिकाट कशाला करायला लावता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशी सहमत. ईथेच तो लेख कॉपी पेस्ट करा की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आधीच प्रकाशित केलेला लेख मग भले तो माझाच का असेना.. कॉपी - पेस्ट जमायचे नाही.. मिपा वरील माझे लिखाण देखील माझ्या ब्लॉग वर येणार नाही..फक्त लिंक दिसेल. हा लेख 3 Jan 2013 रोजी प्रसिद्ध झाला होता. आणी दहा ठिकाणी उगाच क्लिकक्लिकाट करण्यापेक्षा नवीन माउस खरेदी करा. एकाच क्लिक मध्ये याल...!!

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, तुम्हाला माहीत नाही का - असा माउस निघाला आहे ज्याचेवर को-ऑर्डीनेट असतात व ते सेट करुन एका क्लिक्मध्ये ५/७ पानं उघडता येतात ;)

In reply to by यशोधन वाळिंबे

आधीच प्रकाशित केलेला लेख मग भले तो माझाच का असेना.. कॉपी - पेस्ट जमायचे नाही.. मिपा वरील माझे लिखाण देखील माझ्या ब्लॉग वर येणार नाही..फक्त लिंक दिसेल.
आपला माजोरीपणा अतिशय आवडला. :)

In reply to by यशोधन वाळिंबे

यशोधन, एकतर पोस्ट इतकी त्रोटक आहे की शीर्षकाच्या नाविन्यामुळे ती उघडावीशी वाटली दुसरी गोष्ट, इथून तुमच्या ब्लॉगवर, मग तिथले संदर्भ इथे आणि मग इथे चर्चा म्हणजे सदस्यांना दुहेरी प्रयास आहे. तुम्हाला जर लेख खरंच काही काँट्रिब्यूट करतोय असं वाटत असेल तर तो इथे पोस्ट करून चर्चा करण्यात कोणती तात्विक अडचण आहे?

आता तर पाण्यावर चालनार्‍या गाड्या आल्या आहेत्. http://www.xmileager.com/ सुधरा जरा वाळिंबे साहेब हे किट बसवा आनि बघा.

आता तर पाण्यावर चालनार्‍या गाड्या आल्या आहेत्. http://www.xmileager.com/ सुधरा जरा वाळिंबे साहेब हे किट बसवा आनि बघा.

In reply to by वेताळ

सर्व गोष्टी माझ्या वाचनात आल्या होत्या.. उसाचा रस जरा विशेष म्हणुन खोलात शिरलो.. वाक्य वाचलेले दिसत नाही आपण - (त्यात बऱ्याच गोष्टी ह्या पेटोलला पर्याय असल्याच्या समोर आल्या.) आणी पाण्यावर काय 'आय साला म्हणुन अमिताभ पण गाडी चालवतो आजकाल..!!' (विनोदाचा भाग होता.. कितीही विद्वान असलात तरी घरी हा प्रयत्न करू नये. नुकसान भरपाई मिळणार नाही)

शुल्लक बुद्धी! हे क्षुल्लक बुद्धी असं लिहावं. बाकी चालूद्या.

नविन शोध लागला आहे ड्रायव्हरने उसाचा रस प्यायचा व गादी चालवायची .पेत्रोल लागत नाहि

मी तर हायड्रोजनवर चालणारी म्हणजे हवेवर चालणारी कार यायची वाट पहातेय. उसाच्या रसाचा वास ना नंतर चांगला नाही येत. अन मग अश्या वास येणार्‍या गाडीतुन उतरल्यावर आपल्याकडे माणसे कशी पहातील या कल्पनेने मी तरी बाद या वापरातुन. :-))

In reply to by स्पंदना

मी तर हायड्रोजनवर चालणारी म्हणजे हवेवर चालणारी कार
तुम्हाला नायट्रोजन म्हणायचं आहे का? धन्यवाद.

In reply to by गवि

नाही, त्या बरोबर म्हणत आहेत. हायड्रोजनवर चालणारी कारही असते (असु शकते इन फ्युचरमध्ये ), फक्त त्याला 'फ्युएल सेल' असे म्हणतात. http://auto.howstuffworks.com/fuel-efficiency/alternative-fuels/fuel-ce… http://en.wikipedia.org/wiki/Fuel_cell - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

कार चालली तर हायड्रोजनवरच चालेल नायट्रोजनवर अवघड पडेल.. माझ्या अधोरेखिताचा रोख नायट्रोजन-हायड्रोजन गोंधळाकडे नसून "हवेवर" म्हणजेच "हायड्रोजन"वर अशा रचनेकडे होता. हवेवर म्हणजे हायड्रोजनवर नव्हे. हवा ही नायट्रोजनची बनलेली असते, म्हणून विचारलं. हायड्रोजनविषयी असं म्हणायचंच तर "पाण्यावर" अर्थात हायड्रोजनवर चालणारी, असं म्हणता येईल.

In reply to by गवि

गाडी फक्त रस्त्यावरच चालते. (पाण्यावर चालली तर तिला बोट म्हवावे आणी हेवेत चालली तर विमान.)

In reply to by स्पंदना

ही सिनेमाची जाहिरात नाही. मीच पाण्यावर संशोधन करीत असून त्यात वाढत्या महागाईने, करांमुळे सामान्य माणसाच्या डोळ्यातून जे पाणी येते त्यावर " प्रकाश" टाकणारा मी शीधनिबंध लिहित आहे. या पाण्यात एक क्याट्यालिष्ट असतो तो पाण्याचे दोन भाग करून प्राणवायू व उदजन वायू मिळवितो.उदजन ज्वलनशील असून प्राणवायू ज्वलनास मदत करणारा आहे. हे आपल्याला सर्वाना माहीतच आहे.

वुडगॅसवर आधारीत प्रायोगिक गाडी आहे. पण ते अवजड धूड फक्त ट्रॅक्टर किंवा ट्रक म्हणून वापरता येण्याजोगे आहे. बाकी मिपावर येऊन फुकट जाहिरात करण्यापेक्षा पेपरमध्ये जाहिरात द्या ना.. - पिंगू

छान अजून येऊ दे. :) -दिलीप बिरुटे (नवसंशोधकांना प्रोत्साहित करणारा)

नमस्कार! तुम्ही ज्या प्रकारच्या इंधनाचा संदर्भ दिला आहे ( इथनोल ), ते अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये नियमित वापरले जाते. (blended बेसिस वर). कर्नाटक ने तर diesel मध्ये ते थोड्या प्रमाणात mix करून विकणे चालू केले आहे. परंतु अगदी ५% ब्लेंड केले तरी आपली वार्षिक गरज देशांतर्गत भागणे अशक्य आहे - उसाचे उत्पादन आणि साखरेची मागणी लक्षात घेता. साखर उत्पादक कंपन्यांची एक analyst म्हणून माझे मत व्यक्त केले एवढेच.

In reply to by ई-पूर्वाई

मला म्हणायचे होते - "परंतु अगदी १०-१५% ब्लेंड केले"

हे इंधन मुख्यत्वेकरून ब्रझिल मध्ये वापरले जाते परंतू शेतीयोग्य किंवा धान्यपीकयोग्य जमीन उसासाठी (जास्त किंमतीसाठी नव्हे तर पर्यायी इंधनासाठी)वापरावी लागल्यामुळे धान्योत्पादनात असमतोल निर्माण होऊ लागला आहे. जट्रोफा ची एक प्रजाती जट्रोफा कुर्कुस-कडू एरंड अथवा एरंडी हिचा देखील जैवैंधनासाठी विचार केला जातो पण याही बाबतीत ठोक प्रमाणात उत्पादनासाठी किती जमीन तिकडे वळवावी लागेल याचा अंदाज काढता आलेला नाही. कारण हे अजूनही एक जंगली वाण आहे, कल्टिवेशन द्वारे दर हेक्टरी किती उत्पादन मिळेल याचे अचूक ठोकताळे निर्माण झालेले नाहीत.

असो. टाटाचं न्युमॅटिक इंजिन कधी येतंय त्याची वाट पाहतोय.. त्यात आपला खारीचा वाटा म्हणून शेअर्सपण घेऊन ठेवलेत ;)

इथेनॉल वर गाड्या चालतात ह्यात नविन ते काय? आणि ऊसाचा रस आणि इथेनॉल ह्यात फरक आहे. टीआरपी साठी उगाचच ऊसाचा रस वापरला आहे Title मधे

प्रोफाईल : यशोधन प्र. वाळिंबे, प्रथम वर्ष (वाणिज्य) - चालु , सर परशुरामभाऊ महाविद्यालय (पुणे), व्यवसाय - विद्यार्थी सदर आयडी स्वतःच्या ट्रायलसाठी इतरांना कामला लावण्याचा उद्योग करतोय. त्याच्या कोणत्याच पोस्टमधे स्वतःचं काहीही काँट्रिब्यूशन असणं शक्य नाही

ब्राझिल मध्ये उसाचा रस काढून घेतल्यावर उरलेल्या चिपाडा वर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून ethanol हे द्रव्य तयार करतात व ते वेगगळया प्रमाणात कार च्या इंधनात वापरतात. हि प्रथा १९७५ पासून चालू आहे. उसाचा रस इंधन म्हणून वापरण्याची गरज नाही . इंधन तेलाच्या आयातीत बचत करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. आपल्या देशात उसाचे उत्पादन भरपूर आहे पण उस पिळून उरलेल्या चिपाडापासून ethanol मोठ्या प्रमाणवर होते असे वाटत नाही.

उसाच्या रासाचा संबंध असा आहे कि मोलासेस बरोबर उसाचा रस हि अम्बावण्यात येतो. वस्तुतः ब्राझील आलटून पालटून साखर आणि इथनोल वर लक्ष केंद्रित करते म्हणून दर वर्षी अंतरराष्ट्रीय साखर बाजारपेठेत साखरेच्या किमतीत प्रचंड उतार चढाव येतात. म्हणजेच ज्या वर्षी ब्राझील इथनोल वर भर देते त्या वर्षी साखरेच्या किमती वाढतात (आणि उलटत हि). माफ करा, विषयात रस असल्याने मी वारंवार उत्तर देत आहे...

@ परिकथेतील राजकुमार, मुंबईत याला माज म्हणतात, पुण्यात स्वाभीमान कोल्हापुरात अजून काही तर सोलापुरात अजून काही.. प्रश्न येतो तो आपण किती एकनिष्ठ आहोत याचा..!! @ संजय क्षीरसागर, त्रोटक लेखाचा मुद्दा पटला. यापुढे नोंद घेतली जाईल..!! तात्विक अडचणी यापूर्वीच माझ्या ब्लॉग वर प्रकाशित झालेल्या पोस्टबद्दल आहेत. सर्वच पोस्ट बद्दल नाहीत. @ इनिगोय, माझ्या बुद्धीचे मोफत परीक्षण केल्याबद्दल आभार. आजपर्यत आपण केलेली सर्व बुद्धी परीक्षणे मला उपलब्ध करून दिलीत तर समबुध्यांक बंधूंना भेटीन म्हणतो. आपण आपले कार्य चालू ठेवा. आपल्यासारख्या विद्वान सम्राटा नंतर या देशाचे कसे होणार हीच चिंता.. इथिओपिया पासून कोल्हापूर पर्यंत सर्वांना भेडसावते आहे. @ अविनाश कुलकर्णी, असा शोध सायकलसाठी आपल्या पूर्वजांनी लावल्याचा संदर्भ आहे. पण काय प्राशन अथवा ग्रहण करत होते याबद्दल साशंकता आहे. @ aparna akshay, गाडी कशावरही चालो, पण त्या वस्तूची सारखी भाववाढ नको. @ पिंगू, क्रियेटीविटीला बंधन असू नये असे म्हणतात. मी तर नको त्या ठिकाणी केलेल्या जाहिराती पहिल्या आहेत. असो सांगण्यासारख्या नाहीत.. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, धन्यवाद. @ ई-पूर्वाई, धन्यवाद.. आपल्या मताशी मी सहमत आहे. सर्व प्रतिक्रियांपैकी आपलीच प्रतिक्रिया अभ्यासु आहे. @ ऋषिकेश, छान.. फारच दूरदर्शी विचार दिसतायेत. @ प्रसाद१९७१, नवे काही असोत पण आडनाव मात्र मुख्य असते ना . @संजय क्षीरसागर, धन्यवाद, आपण गुगल कडे तक्रार करू शकता. @ रमेश आठवले, सहमत, दुहेरी फायद्यासाठी हे उत्तम गणित आहे. यावर इतर प्रक्रिया करून त्यातील उपयुक्तता कशी वाढवता येईल यावर शास्त्रज्ञांचा काळ अधिक आहे. @ तर्री, आपल्या बहुमुल्य गणित ज्ञानाबद्दल आभारी आहोत. पाणिनी आणि आपणात साम्य दिसतय. @ लिलि काळे, धन्यवाद. आभारी आहोत.

In reply to by यशोधन वाळिंबे

यशोधन, शक्य असेल तर पूर्ण शास्त्रोक्त माहिती इथे देऊ शकत असाल तर तुमचे स्वागतच आहे. मिपा हे संस्थळ जाहिरात करण्यासाठी उघडण्यात आलेले नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो..

In reply to by यशोधन वाळिंबे

"आपल्या बहुमुल्य गणित ज्ञानाबद्दल आभारी आहोत. पाणिनी आणि आपणात साम्य दिसतय." ईति यशोधन. पाणिनीचे नाव त्यांनी लिहिलेल्या संस्कृत व्याकरणासाठी प्रसिध्द आहे ; गणितासाठी नाही.

In reply to by यशोधन वाळिंबे

पण..
@ परिकथेतील राजकुमार, मुंबईत याला माज म्हणतात, पुण्यात स्वाभीमान कोल्हापुरात अजून काही तर सोलापुरात अजून काही.. प्रश्न येतो तो आपण किती एकनिष्ठ आहोत याचा..!!
पुण्यात याला *त्तेपणा आणि मिपावरती 'कोदा'पणा म्हणतात. *हे चिन्ह, अक्षर गाळून आम्ही स्वतःच टाकले आहे. तरी 'तुझा शब्द संपादित झाला का?, 'च्यायला ! मिपाला आता ह्या शब्दांची पण एलर्जी व्हायला लागलीये का?' असे प्रश्न विचारुन सहानुभुती दाखवणार्‍या खरडी अथवा व्यनी करू नयेत. सदर लेखक हे कॉलेजात असल्याने त्यांना अक्षर गाळून तसा शब्द लिहून दाखवला आहे. (भांचोत ! पुण्यात असले शिक्षण मिळते हे कळाले तर अनेक लोक इथे शिकायला येणेच बंद करतील. अर्थात हे विधान सदर लेखक हे स्वयंभू नसून शिक्षणातून शहाणे झाले आहेत, असा समज घेउन वरील वाक्य लिहिले आहे.)

@ तर्री, आपल्या बहुमुल्य गणित ज्ञानाबद्दल आभारी आहोत. पाणिनी आणि आपणात साम्य दिसतय. काहीही दिसते तुम्हांला ! असो.

In reply to by तर्री

+१. अभ्यास वैग्रे वाढवा यशोढनजी, नै तं कालिजात लोकं लाज काढतीन.

आल्याचा आसुरी आनंद बर्‍याच आय डींच्या प्रतिसादांमधून दिसला ... अत्रुप्त आत्मा !! जिभल्या चाटणारी स्माइली टाक रे !!

अर्र्रारा.. :) मिसळपाव बरच सौम्य झालय.. आमच्या टार्‍याची आठवण झाली.. बाकी या रसात काहीही सा़खर नाही, निव्वळ पूचकावणी.. लेखकाने स्वतः थोडा उसाचा रस पेट्रोल टाकीत टाकुन बघावा.. मजा येते..

In reply to by शैलेन्द्र

त्याचा डाव, इतरांनी तो प्रयोग स्वतःच्या गाडीवर करावा म्हणजे त्याला रिझल्ट कळेल असायं!

In reply to by संजय क्षीरसागर

कितीही विद्वान असलात तरी घरी हा प्रयत्न करू नये. नुकसान भरपाई मिळणार नाही)

सारखा सारखा उसाच्या रसाचा उल्लेख वाचून "येथे आलेलिंबूमिश्रित उसाचा रस मिळेल" अशा बोर्डासहित लोट्यांच्या हिशेबात (लीटर)इक्षुरस देणार्‍या सांगलीमिरज रस्त्यावरच्या असंख्य हंगामी रसमशीन्सची आठवण झाली. शिवाय सोबत ताटलीत भरुन दिलेला बर्फ आणि मिठाच्या बाटलीचीही.

In reply to by गवि

आई शप्पथ.......काय आठवण करून दिलीत गवि!!!!!! मिरजेत लै प्रस्थ असायचं याचं-अजूनही आहे. ब्राह्मणपुरीत लै रसवाले आहेत. आपला फेव्हरीट म्हंजे लोणीबाजारातनं डावीकडं वळून (ज्ञानदीपच्या रस्त्याला) लगेच पहिल्या डावीकडच्या बोळातला रसवाला. आता मिरजेला जाईन तेव्हा तिथे जाऊन रस पिणे आले. तोवर पुण्यात रस पिऊन घेतोच :)

In reply to by गवि

आणि बहुतेक रसवंतीगृहाचं नाव (पुण्यात बाकीकडे माहीत नाही) कानिफनाथ वगैरे म्हणजे नवनाथ संप्रदायातलं असतं असं निरिक्षण नोंदवतो. :)

लहान मुलगा आहे, सांभाळून घ्या. आपण सगळी जुनी जाणती माणसं त्याला टिका करून हतबल करायला लागलो तर कसं होणार. भले त्याला त्याच्या भयानक बुद्धीमत्तेचा अभिमान आणि माज असेल, आणि प्रत्यक्षात तसं नसेल, तरी टिका करून साध्य काहीही होणार नाही. मोठी झेप घेण्याची कुवत अशी सुरुवातीलाच खुडून टाकू नका. ज्या वयात आपल्यातल्या बर्‍याच जणांना स्वतःची चड्डी बदलायची समज नव्हती त्या वयापासून हा मुलगा ब्लॉग लिहितो आहे. भले आत्ता नेटवरून इथुन तिथुन उचलून ब्लॉगवर लेख लिहिले असतील, पण सुरुवात अशीच होते. सो फ्रेंड्स, मराठी मुलाला सपोर्ट करा.

In reply to by आदिजोशी

बाकी ठीक, पण
ज्या वयात आपल्यातल्या बर्‍याच जणांना स्वतःची चड्डी बदलायची समज नव्हती त्या वयापासून हा मुलगा ब्लॉग लिहितो आहे.
हे जरा अतीच झालं हं! कुठल्या काळाबद्दल बोलताहात आपण? कंप्यूटर युग नसले तर मग ब्लॉग अन नेटच्या भानगडी काय करणार कप्पाळ? ब्लॉग लिहितोय हे चांगलेच असले तरी त्याची स्तुती करण्याच्या नादात बाकीच्यांवर उगी खार खाताहात असे वाट्टे.

In reply to by आदिजोशी

तुम्ही लोकं असे लादेन जन्माला घालणार आणि निस्तरायचे आम्ही.

सपोर्ट करू या आदी. डिस्क्लेमर: पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतल्यास बेट्याचे "ऑपरेशन" :) केले जाईल हे त्याने लक्ष्यात घ्यावे.

त्यापेक्षा सरळ शेणावर (मिथेनवर) चालणारी गादी .. आय मीन.. गाडी का नाही बनवत? सकाळी सकाळी भैया दुधाबरोबर डबाभर शेण पण आणून देत जाईल, त्याचा गोठा पण स्वच्छ, आणि परत भाव वाढण्याची शक्यतापण कमी. लोकं इन्वेस्ट्मेंट म्हणून शेणबाजारात पैसे लावतील, चारावाल्या बाया या उद्याच्या सर्वात स्मार्ट आंत्रप्रिन्युअर ठरतील (लोकं पैसे भरून चारा भरवरतील आणि पैसे भरून शेण पण नेतील.. मधल्या मधे गाय धष्ट्पुष्ट!) भारतीय संस्कृतीरंक्षकांना महान भारतात गायीचं महत्व काय हे जगाला सांगता येईल.. कित्ती फायदे!!