उसाचा रस, चारचाकी गाडी आणी पेट्रोलला डच्चु..!!
मध्यंतरी डिस्कव्हरी वर सहज एक संशोधनात्मक कार्यक्रम पाहत बसलो होतो. त्यातील विषय पाहुन थोडे बरे वाटले कारण त्याच्या आदल्याच दिवशी आपल्या मायबाप सरकारने जनतेप्रती असलेल्या अगाध प्रेमामुळे पेट्रोलची 'नाईलाजास्तव (?)' भाडेवाढ केली होती. असो तर विषय असा होता कि पेट्रोलला कोण कोणत्या गोष्टींचा पर्याय आहे ? आपल्याकडच्या विद्वान माणसांनी (ज्यांपुढे न्युटन,आईनस्टाईन अशा लोकांनी गुढगे टेकावेत) नक्कीच डिझेल असे एकमताने उत्तर दिले असते.. पण माझी बुद्धी सर्वसामान्यांप्रमाणेच शुल्लक असल्याने मी यावर थोडा अभ्यास करायचे ठरवले. त्यात बऱ्याच गोष्टी ह्या पेटोलला पर्याय असल्याच्या समोर आल्या. तुम्ही आम्ही ज्याचा रस अगदी आवडीने पितो तो उस देखील पेट्रोलला पर्याय असू शकतो हे पाहुन आश्चर्य वाटले. भविष्यात अशा मोटारीतून प्रवास करायला मजा येईल हे मात्र नक्की..
अधिक माहितीसाठी माझ्या ह्या लेखावर नजर टाका..
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..
चारचाकी मोटार उसाचा वापर करून चालु शकते का ?
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..
वाचन
14875
प्रतिक्रिया
0