प्रिय माधुरीस
प्रिय माधुरीस,
तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली.
त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने.
अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम - लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील - अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस.
तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला.
त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन 'जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा' असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन "अक्सेंट" घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले.
पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही.
काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.
तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.
अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे...
तुझा,
(बातमी वाचुन कळवळुन गेलेला) सोकाजी
वाचने
46398
वाचनखूण
प्रतिक्रिया
144
In reply to एम एफ हुसैन नावाच्या महान by विनीत संखे
तिचं पाठमोरं नृत्य आजही
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
मृत्यन्जय, ह्या
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
>>तब्बुनेही अनेक उत्तम
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
तुला
In reply to तुला by प्रमोद्_पुणे
कधी पासून माधुरी आवडायला
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
तब्बु
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अनिल कपूर बद्दलही शंका आहे वाटतं
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
माधुरी अभिनय करत नाही हा
In reply to माधुरी अभिनय करत नाही हा by पक्या
ओक्के.
In reply to >>>>>अनिल कपुर ह्या तगड्या by प्राजु
अभिनय तर सो सो होता इश्वर,
In reply to अभिनय तर सो सो होता इश्वर, by सोत्रि
मान्य. अनिल कपूरचा
In reply to मान्य. अनिल कपूरचा by विनीत संखे
इश्वर, साहेब, लम्हे, विरासत,
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नया दौर बघा..
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
संयत अभिनय
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुकार!
In reply to अभिनय तर सो सो होता इश्वर, by सोत्रि
इश्वर, साहेब, लम्हे, विरासत,
ती माधुरी आहे!
In reply to ती माधुरी आहे! by पैसा
खुपच संयत प्रतिसाद
उत्तम कल्पना
In reply to उत्तम कल्पना by राजेश घासकडवी
जेब्बात! बाकी कुणाला कळो न
In reply to उत्तम कल्पना by राजेश घासकडवी
हा हा हा....
एकदम पटलं... !! It is
साकोजीरावांच्या भावना
विनोदी प्रतिसाद
In reply to विनोदी प्रतिसाद by आदिजोशी
माधुरीला अभिनय येत नाही ह्या
माधूरी आपल्याला आवडायची ब्वॉ.
माझ्या top लिस्ट मध्ये
मुलं मोठी होउ लगली कि परतीचे
मस्तच पत्रये आवडल
माधुरी ही 'माधुरी' आहे . तिने
In reply to माधुरी ही 'माधुरी' आहे . तिने by मनीषा
बरोबर.
१. माधुरी दिक्षीत उत्तम
In reply to १. माधुरी दिक्षीत उत्तम by नगरीनिरंजन
३. "राजा" या चित्रपटात तिने
In reply to १. माधुरी दिक्षीत उत्तम by नगरीनिरंजन
या वरून आठवलं...
अहाहा..
कोण म्हणते माधुरीला acting येत नाही ?
In reply to कोण म्हणते माधुरीला acting येत नाही ? by वाहीदा
फ़ैन?
In reply to फ़ैन? by मिहिर
फ़ैन' हा शब्द कधी पासून हिंदी झाला ?
In reply to फ़ैन' हा शब्द कधी पासून हिंदी झाला ? by वाहीदा
Fan हा शब्द मराठीत फॅन असा
In reply to Fan हा शब्द मराठीत फॅन असा by विश्वनाथ मेहेंदळे
हिंदीत फैन हा शब्दच नाही आहे मुळी
In reply to हिंदीत फैन हा शब्दच नाही आहे मुळी by वाहीदा
------fEn------
च्यामारी !!
हुश्श!
In reply to हुश्श! by तिमा
हिरड्याकुमारी'
खत्तरनाक मनोरंजन !!
In reply to खत्तरनाक मनोरंजन !! by नाना चेंगट
मदनबाणा ! तु दिलेल्या
अतिशय आर्त अन आशयघन.
हाहा..
समद्या लोकास्नी एक इन्न्ती
In reply to समद्या लोकास्नी एक इन्न्ती by खटपट्या
सुंदर फोटो
माधुरी
हे कोन?
चित्रपट आणि संजय दत्त निवडले ह्यावरुन च कळते
@ प्रसाद१९७१