निरक्षर
कधीही न भेटणार्या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच.
_________________________________
मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच.
आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण?
उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ?
आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.
अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार?
चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही.
तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?)
चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं.
त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची!
आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच.
सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ).
अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय?
तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना)
आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो.
अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे)
येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?)
माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून.
काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!)
नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल)
आनंद देणार्या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे)
स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय)
तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस.
‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला.....
मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार,
चिपकाले सैंय्या फेविकॉल से!
....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली!
आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच!
तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही.
निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं.
आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
वाचने
29058
वाचनखूण
प्रतिक्रिया
147
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
पहिला प्रतिसाद संपादकांचा, लेखनाच्या निर्वैयक्तितेची पोच !
फार अवघड असत तोल सांभाळन.
In reply to फार अवघड असत तोल सांभाळन. by स्पंदना
ते काहीसं भारत-पाकिस्तान सारखं आहे
In reply to ते काहीसं भारत-पाकिस्तान सारखं आहे by संजय क्षीरसागर
अगदी अगदी
In reply to ते काहीसं भारत-पाकिस्तान सारखं आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही "गैरसमज" या शब्दाकडे
In reply to तुम्ही "गैरसमज" या शब्दाकडे by स्पंदना
गैरसमज असेल तर दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
In reply to ते काहीसं भारत-पाकिस्तान सारखं आहे by संजय क्षीरसागर
एकदम सहमत !
फक्त वाचणच ठरवलं होतं... पण थोडंस विचीत्र भासलं म्हणुन...
दुतोंडी प्रतिसादकर्ते पाहुन
In reply to दुतोंडी प्रतिसादकर्ते पाहुन by शिल्पा ब
मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय
विडंबन ओढून ताणून म्हणजे,
In reply to विडंबन ओढून ताणून म्हणजे, by किसन शिंदे
तंतोतंत!!!
In reply to विडंबन ओढून ताणून म्हणजे, by किसन शिंदे
किसनश्री, ही पोस्ट देव या भ्रामक कल्पनेतली व्यर्थता दर्शवते
In reply to किसनश्री, ही पोस्ट देव या भ्रामक कल्पनेतली व्यर्थता दर्शवते by संजय क्षीरसागर
पटत नाय.
In reply to किसनश्री, ही पोस्ट देव या भ्रामक कल्पनेतली व्यर्थता दर्शवते by संजय क्षीरसागर
"आण्णा, आज दुपारुन मला दत्त
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
सुस्पष्ट अन समर्पक
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
बापरे
In reply to बापरे by स्पा
आपला हा प्रतिसाद वाचून खुप
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
मूळ धाग्याचा संदर्भ
In reply to मूळ धाग्याचा संदर्भ by बाळ सप्रे
तुमचं म्हणणं पटलं.
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
+१०००% सहमत
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
प्रतिसाद आवडला
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
मरुन गाउन नाही हो "मरुन रोब"
In reply to मरुन गाउन नाही हो "मरुन रोब" by पियुशा
अवांतर ठरु नये म्हणून वांतरः
In reply to अवांतर ठरु नये म्हणून वांतरः by गवि
गविकाका, तेव्हढा शब्द दुरुस्त
In reply to मरुन गाउन नाही हो "मरुन रोब" by पियुशा
चुक लक्षात आणून दिल्याबद्दल
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
अयोयो! एव्हढ चांगल लिखाण
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
वा . आवडला प्रतिसाद
In reply to "आण्णा, आज दुपारुन मला दत्त by धन्या
परफेक्ट.
पैसाताई, अपर्णाताई आणि
In reply to पैसाताई, अपर्णाताई आणि by कवितानागेश
ताईदीन!!
In reply to ताईदीन!! by स्पंदना
आमच्या वेळी नव्हते हो असले
In reply to आमच्या वेळी नव्हते हो असले by धन्या
आमच्या वेळी नव्हते हो असले
आमच्या वेळी नव्हते हो असले काहीहे वाक्य पुण्यातल्या आठ वर्षाच्या पोरापासुन ऐंशी वर्षाच्या म्हातार्यापर्यंत कोणीही म्हणु शकतं. इति. पु.ल.In reply to ताईदीन!! by स्पंदना
दीन
In reply to दीन by पैसा
माझ्यातर्फेही!!
In reply to माझ्यातर्फेही!! by सूड
@अगदी मीनाक्षीताईसकट>>>
In reply to दीन by पैसा
दोन्हीतल गो बाय. पन 'दिन'मधल
धनाजीराव!
In reply to धनाजीराव! by संजय क्षीरसागर
मला तर "व्हर्च्युअल स्नेही"
In reply to मला तर "व्हर्च्युअल स्नेही" by गवि
गवि,
In reply to गवि, by संजय क्षीरसागर
च्यायला
In reply to च्यायला by चाणक्य
हेच काय दोघ
In reply to हेच काय दोघ by स्पा
असावेत!
बाळ सप्रेजी, बहोत खुब!
संक्षी धन्यान बरच काही लिहिलं
In reply to संक्षी धन्यान बरच काही लिहिलं by स्पंदना
अपर्णा!
In reply to अपर्णा! by संजय क्षीरसागर
माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार...
'अक्षर' हे नेमकं काय आहे,
In reply to 'अक्षर' हे नेमकं काय आहे, by इनिगोय
तुमचा अतीदीर्घ प्रतिसाद निर्वैयक्तिक होऊ शकला असता
In reply to 'अक्षर' हे नेमकं काय आहे, by इनिगोय
हे एक्दम पटले..
In reply to हे एक्दम पटले.. by अक्षया
त्या अक्षर लेखाचा आणि
In reply to त्या अक्षर लेखाचा आणि by धन्या
सो शिंपळ
In reply to त्या अक्षर लेखाचा आणि by धन्या
अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे?
In reply to अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे? by संजय क्षीरसागर
उत्तम लिहीणार्या दोन
In reply to उत्तम लिहीणार्या दोन by गवि
बुद्ध हे कुणा व्यक्तीचं नाव
In reply to उत्तम लिहीणार्या दोन by गवि
गवि,
In reply to गवि, by किसन शिंदे
किसनदेवा, येनकेनप्रकारेण
In reply to हे एक्दम पटले.. by अक्षया
सहमत..
In reply to सहमत.. by मोदक
लेखात सूड भावना कुणीही दाखवून द्यावी
In reply to लेखात सूड भावना कुणीही दाखवून द्यावी by संजय क्षीरसागर
ब्वॉर.....
In reply to सहमत.. by मोदक
अक्षर सारखा नितांतसुंदर लेख
हा लेख आणि त्यामागची प्रेरणा
आणि हा तुमचा दुसरा मुद्दा!
जराशी गंमत!!!
निरबुद्ध
कुंकु का लावतात? थुक्का का...
In reply to कुंकु का लावतात? थुक्का का... by अक्षया
लोक जास्त डोकं का लावतात?
In reply to लोक जास्त डोकं का लावतात? by किसन शिंदे
+ १
देव (किंवा कधीही न भेटणारा मित्र) यातला संवाद एकतर्फी असतो
In reply to देव (किंवा कधीही न भेटणारा मित्र) यातला संवाद एकतर्फी असतो by संजय क्षीरसागर
एव्हडाच उद्देश होता ?
In reply to देव (किंवा कधीही न भेटणारा मित्र) यातला संवाद एकतर्फी असतो by संजय क्षीरसागर
कथा स्वानुभव म्हणत चितारली
In reply to कथा स्वानुभव म्हणत चितारली by अग्निकोल्हा
ग्लिफ, मुळात देव ही मानवी कल्पना आहे
In reply to ग्लिफ, मुळात देव ही मानवी कल्पना आहे by संजय क्षीरसागर
मुळात देव ही मानवी कल्पना आहे
In reply to मुळात देव ही मानवी कल्पना आहे by अर्धवटराव
तुम्ही स्वतः!
In reply to तुम्ही स्वतः! by संजय क्षीरसागर
यु कान्ट डिनाय योरसेल्फ.
In reply to तुम्ही स्वतः! by संजय क्षीरसागर
एक असं उदाहरण द्या जी मानवी
In reply to तुम्ही स्वतः! by संजय क्षीरसागर
थोडा थोडा अर्थ बोध होतोय... पण गुंताही वाढतोय.
In reply to थोडा थोडा अर्थ बोध होतोय... पण गुंताही वाढतोय. by अग्निकोल्हा
ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष
In reply to ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष by अग्निकोल्हा
ग्लिफ, तुम्ही स्वतः कल्पना नाही पण तुम्ही कल्पना करू शकता
In reply to ग्लिफ, तुम्ही स्वतः कल्पना नाही पण तुम्ही कल्पना करू शकता by संजय क्षीरसागर
सुरेख! आपण शिक्षकच असणार. फारच सोपं करता सगळं.
In reply to सुरेख! आपण शिक्षकच असणार. फारच सोपं करता सगळं. by अग्निकोल्हा
तुम्हाला कशावरुन खात्री आहे की "ग्लिफ" सुध्दा अस्तित्वात आहे ?
In reply to तुम्हाला कशावरुन खात्री आहे की "ग्लिफ" सुध्दा अस्तित्वात आहे ? by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by अग्निकोल्हा
ग्लिफ,
In reply to ग्लिफ, by संजय क्षीरसागर
अकारण विषय भरकटतोय.
In reply to :) by अग्निकोल्हा
थोडक्यात "ग्लिफ" ही एकच
In reply to थोडक्यात "ग्लिफ" ही एकच by कवितानागेश
वेल माय डिअर चाइल्ड ऑफ गॉड....
In reply to वेल माय डिअर चाइल्ड ऑफ गॉड.... by अग्निकोल्हा
कारण त्यांच्या म्हणन्या नुसार "तुम्ही आहात" हाच मुद्दा आहे.
In reply to कारण त्यांच्या म्हणन्या नुसार "तुम्ही आहात" हाच मुद्दा आहे. by अग्निकोल्हा
आपुलाचि वाद आपणासि|
In reply to आपुलाचि वाद आपणासि| by कवितानागेश
:)