चुप्प!
लेखनविषय:
काव्यरस
सखे मला सांग,
तू कधी विचार केलायसं?
जेव्हा शरीरं थकलेली असतील,
डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील,
पायांना भराभर चला सांगितले तरी
ते ऐकतीलच असं काही होणार नाही
सग्गळं बोलून-सांगून झाले असेल,
रुसून-फुगून झाले असेल
भांडून-बिंडून झाले असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील,
शब्दांशिवायच काय नजरेशिवायही
तुला माझे अन् मला तुझे
म्हणणे नीट समजायला लागले असेल,
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला
तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून
हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून
तुझ्या सैल पडलेल्या कानात
हळूच कुजबुजीन
'तु मला खुप आवडतेस'
तेव्हाही तु अश्शीच लाजून,
डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
वाचने
6807
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अगोदर शेवट वाचला मग वर वर असं उलटं वाचत गेलो..
मस्त वाटलं वाचून..
मिका: ही अप्रतिम प्रेमकविता तुमच्या नावासकट आप्त-मित्रांना फॉरवर्ड करतो आहे, तुमची परवानगी गृहीत धरून, आशा आहे तुम्हाला चालेल.
(का कुणास ठाऊक, पण वाचता वाचता Fiddler on the roof मधला हा प्रसंग आठवला):
लईच रोम्यान्टिक हो....
फार आवडली...
आता लवकरच तिचंही उत्तर लिहा.
सुपर लाईक
आहा...
साधासाच प्रश्न पण सुरेख गुंफलाय कवितेत
अय हय.....मजा़ आ गया..आता वरती इंदुसुता म्हणताहेत तसं याचं उत्तरदेखील लौकरच लिहून टाका बरं!
आवडली आपल्याला. सोपे शब्द सुन्दर वर्णन.
छान !!
मिका साहेब अतिशय सुंदर कविता.
मिका, नॉन स्टॉप शिक्सर मारताय हल्ली! जबय्राच एकदम :-)
मस्त आवडेश.
अतिशय सुंदर कविता
त्या 'सैल पडलेल्या' ओळीशी चुकून रेंगाळलो आणि कानांनी आश्वस्त झालो.
छानच
कविता मस्तच आहे!
मिका,
कविता आवडली
आणि लगेच ही कविता वाचली. मस्त.
काही सजेशन्स :
पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाहीपायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं नाही
सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, म्हणणे नीट समजायला लागले असेलसग्गळं बोलून-सांगून झालं असेल, रुसून-फुगून झालं असेल भांडून-बिंडून झालं असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेलकष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझं अन् मला तुझं म्हणणं नीट समजायला लागलं असेल
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीनअश्या त्या वेळेला जेव्हा मी तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात ____ (हे जरा नजाकतदार हवं) हळूच कुजबुजीन.. बाकी कवितेची मांडणी आणि आशय उत्तम!
In reply to मिका, उत्तम कविता! by संजय क्षीरसागर
आपल्या सुचनांबद्दल धन्यवाद. :)
In reply to आपल्या by मिसळलेला काव्यप्रेमी
इतक्या सुरेख कवितेवर प्रतिसाद देण्याऐवजी व्य. नि. करायला हवा होता. सं.मं.ला प्रतिसाद काढण्याची विनंती केली आहे.
या ओळी मात्रः
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीनअश्या सहज वाटतील अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या कानात हळूच कुजबुजीन..
वेगळाच विषय.
आशयही छान.
वाह!!
आवडली.
मस्त, पण या अवस्थेत पोहोचेन की नाही याची शंका असलेला. कवितेबद्दल धन्यवाद.
एक नंबर रे मिक्या...
मस्त !
तुमच्या 'येशील' मुळे इथे आले.. एक मस्त कविता हुकली असती!
क्यु॑ट आहेत भावी आजोबा ;)
खुपचं छान.. आवडली
अगोदर शेवट वाचला मग वर वर असं