मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चुप्प!

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
सखे मला सांग, तू कधी विचार केलायसं? जेव्हा शरीरं थकलेली असतील, डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील, पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाही सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेल, अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन 'तु मला खुप आवडतेस' तेव्हाही तु अश्शीच लाजून, डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?

वाचन 6807 प्रतिक्रिया 29