चुप्प!
लेखनविषय:
काव्यरस
सखे मला सांग,
तू कधी विचार केलायसं?
जेव्हा शरीरं थकलेली असतील,
डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील,
पायांना भराभर चला सांगितले तरी
ते ऐकतीलच असं काही होणार नाही
सग्गळं बोलून-सांगून झाले असेल,
रुसून-फुगून झाले असेल
भांडून-बिंडून झाले असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील,
शब्दांशिवायच काय नजरेशिवायही
तुला माझे अन् मला तुझे
म्हणणे नीट समजायला लागले असेल,
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला
तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून
हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून
तुझ्या सैल पडलेल्या कानात
हळूच कुजबुजीन
'तु मला खुप आवडतेस'
तेव्हाही तु अश्शीच लाजून,
डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
वाचने
6807
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अगोदर शेवट वाचला मग वर वर असं
लई भारी!
लईच रोम्यान्टिक हो....
सुपर लाईक
आहा...
मस्त
अय हय.....मजा़ आ गया..आता
आवडली
छान !!
मिका साहेब अतिशय सुंदर कविता.
मिका, नॉन स्टॉप शिक्सर मारताय
मस्त आवडेश.
अतिशय सुंदर कविता
त्या
छानच
मस्तच आहे!
मिका, कविता आवडली
आजच आजी आजोबांचा एक फोटो पाहिला फे.बु.वर...
मिका, उत्तम कविता!
In reply to मिका, उत्तम कविता! by संजय क्षीरसागर
आपल्या
In reply to आपल्या by मिसळलेला काव्यप्रेमी
मिका, धन्यवाद!
वेगळाच विषय. आशयही छान.
वाह!!
आवडली.
मस्त, पण या अवस्थेत पोहोचेन
एक नंबर रे मिक्या...
मस्त !
तुमच्या 'येशील' मुळे इथे आले.
खुपचं छान.. आवडली