मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण · · जनातलं, मनातलं
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें? नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?" वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच" नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे." वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?" नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत." वराहगंधर्वः "मग?" नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा." असो. आपला, (स्वर्गवासी नारदमुनी) आजानुकर्ण

वाचने 13620 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज गुरुवार, 11/15/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 15:07
लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे