मेटामॉर्फिसीस
लेखनविषय:
काव्यरस
मी.
माझ,
मला....
असा पिळदार रेशमाचा
भक्कम कोष
गुंफायचा स्वत:भोवतीच
अन विणायची स्वप्न
लपेटदार पंखांची
सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची.
यांन द्याव, त्यानं करावं.
शिवाजींन सदाच शेजारी जन्माव.
मी मात्र माझ्या कोषात मग्न
मनी मानसी पंखांची स्वप्न
पण विसर मुख्य मुद्द्याचा
स्वत:ला झोकून द्यायचा
कुठे एक बोच नको
माझ्या पुरती आंच नको
कशी लाभावी देण पंखांची
जर न सुटती कोषाच्या भिंती?
असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला
धुडकाव पहिलं आपल्याच मताला.
तरच अपेक्षांना फुटतील पंख
सोस क्षणिक दु:खाचा डंख
मग होशील मुक्त तू घ्याया भरारी
फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी
सोड आस या रेशीम कोषाची
जग असा क्षणभरी की
न उरेल
खंत
मरणाची.
__/\__
अपर्णा .
वाचने
6056
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
शीर्षकाला साजेसं !!
In reply to शीर्षकाला साजेसं !! by सुहास..
एक मेटा माझ्याकडून पण :) , कुसुमाग्रजांचा आहे.
छान आहे
छान आशय आहे कवितेचा.. भावला
अय्या, हे काय अपर्णा ?
In reply to अय्या, हे काय अपर्णा ? by सस्नेह
मला वाटते.
In reply to अय्या, हे काय अपर्णा ? by सस्नेह
इतकी कल्पकता+आशय अन यमक-छंद
खूप छान.
आवडली फार फार आवडली.
In reply to आवडली फार फार आवडली. by ज्ञानोबाचे पैजार
आयला !
कविता आवडली.
कविता आवडली !
सुरेख कविता.
आवडली कविता
In reply to आवडली कविता by पैसा
+१
In reply to आवडली कविता by पैसा
+१.५
फारच सुंदर.
खुप मस्त, मला तर रेषमी
In reply to खुप मस्त, मला तर रेषमी by ५० फक्त
माझा "पिळदार" शब्द त्या साठीच
छान आहे कविता ...
In reply to छान आहे कविता ... by मनीषा
खरी ताकद लागते ती स्वतःला
In reply to खरी ताकद लागते ती स्वतःला by स्पंदना
अगदी अगदी ... +१
मस्तच ....
कविता
छान कविता...
छान
सार्यांना धन्यवाद. एकुण
हे बघा
कविता आवडली..
कविता सुंदर आहेच पण