मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेटामॉर्फिसीस

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी. माझ, मला.... असा पिळदार रेशमाचा भक्कम कोष गुंफायचा स्वत:भोवतीच अन विणायची स्वप्न लपेटदार पंखांची सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची. यांन द्याव, त्यानं करावं. शिवाजींन सदाच शेजारी जन्माव. मी मात्र माझ्या कोषात मग्न मनी मानसी पंखांची स्वप्न पण विसर मुख्य मुद्द्याचा स्वत:ला झोकून द्यायचा कुठे एक बोच नको माझ्या पुरती आंच नको कशी लाभावी देण पंखांची जर न सुटती कोषाच्या भिंती? असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला धुडकाव पहिलं आपल्याच मताला. तरच अपेक्षांना फुटतील पंख सोस क्षणिक दु:खाचा डंख मग होशील मुक्त तू घ्याया भरारी फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी सोड आस या रेशीम कोषाची जग असा क्षणभरी की न उरेल खंत मरणाची. __/\__ अपर्णा .

वाचन 6056 प्रतिक्रिया 0