गाणे गात रहा
In reply to आर्त आशयघन कविता आवडली. by सस्नेह
In reply to उत्तम कविता. बाकी प्रतिसाद by बॅटमॅन
रोज नाही कधीतरीIn reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
In reply to हे पद्याचे भाषांतर आहे का? नाही पद्यच आहे फक्त यमक जुळवत लिहिलय by संजय क्षीरसागर
In reply to संजय काका यु आ सो रुड कट्टी by जेनी...
In reply to हे बरंय! by संजय क्षीरसागर
In reply to =)) by जेनी...
In reply to कवितेत तीन गोष्टी हव्या by संजय क्षीरसागर
In reply to कवितेत तीन गोष्टी हव्या by संजय क्षीरसागर
In reply to आपल्याशी सहमत. by हारुन शेख
In reply to आपल्याशी सहमत. by हारुन शेख
अन ज्या क्षणी अस काही उमटत, त्याला वेसन घालुन यमकात बसवण म्हणजे त्या विचारावरचा, कवीकल्पनेवरचा अत्याचारच.तसं नाहीये. कविता नेहमी छंदबद्ध असते. कवितेचा मुखडाच लयीत प्रकट होतो. मग त्या मूडचा परिपोष करणारे अंतरे सुचत जातात आणि शेवटी कविता क्लायमॅक्सला येते. जोपर्यंत विचार लयबद्ध होत नाहीत, शब्दांवर हुकूमत येत नाही तोपर्यंत मनातला भाव उत्कटतेनं कवितेत उतरत नाही. संदीपच्या या ओळी पाहा : नसतेस घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो...१ नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो....२ येतात उन्हे दाराशी हिरमुसूनी जाती मागे खिडकीशी थबकून वारा तव गंधा वाचून जातो...३ ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनी झालो तुज वाचून उमगत जाते तुज वाचून जन्मच अडतो...४ तव मिठीत विरघळणार्या मज स्मरती लाघव वेळा श्वासाविण हृदय जसे की मी तसाच अगतिक होतो...५ याला म्हणतात लय, अनुभवाची उत्कटता आणि शब्दांवर हुकूमत!
ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.इथे यमक आहे, पण वृत्त कुठेय? वरती प्रतिसादात एक मुद्दा आलाय, की
कविता नेहमी छंदबद्ध असते. कवितेचा मुखडाच लयीत प्रकट होतो. मग त्या मूडचा परिपोष करणारे अंतरे सुचत जातात आणि शेवटी कविता क्लायमॅक्सला येते. जोपर्यंत विचार लयबद्ध होत नाहीत, शब्दांवर हुकूमत येत नाही तोपर्यंत मनातला भाव उत्कटतेनं कवितेत उतरत नाही.पहिल्या दोन वाक्यांशी अंशतः सहमत. पण वॉल्ट व्हिट्मनच्या कविता लय वैग्रे काही बंधने न पाळूनसुद्धा तितक्याच गाजलेल्या आहेत. अन्य उदाहरणे देखील देता येतील. पण काव्य कशास म्हणावे? याबद्दल संस्कृत साहित्यिक-टीकाकार विश्वनाथ याचे एक वाक्य मला फार आवडते- "वाक्यम् रसात्मकं काव्यम्|" रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. हीच काव्याची खरी मिनिमॅलिस्टिक डेफिनिशन आहे, नेसेसरी आणि सफिशिअंट कंडिशन आहे. अन्य लयीची बंधने (माझ्या वैयक्तिक मते) तितकीशी अनावश्यक म्हणता येणार नाहीत, पण मूळ डेफिनिशन हीच. काव्य म्हणजे मिनिमम एखादे रसपूर्ण वाक्य असलेच पाहिजे. प्रस्तुत कविता रसपूर्णतेच्या निकषावर उतरली असल्याने "काव्य" या संज्ञेस नक्कीच पात्र आहे याबद्दल मला तरी आजिबात संदेह नाही.
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
In reply to सबी गवाहो को मद्दे नजर रखते by जेनी...
पण, गेल्या शंभर-दीडशे वर्षांत बरीच मुक्तछंदात्मक कविता तयार झालेली आहे. तिथे यमक-गण-मात्रा इत्यादींची बंधने न पाळतासुद्धा आशयदृष्ट्या तितकीच परिणामकारक कविता झाल्याची कितितरी उदाहरणे देता येतील. विकी लिंक बघा-फ्री व्हर्स.लिंक बघण्यापेक्षा इथे तुम्हाला पटलेली उदाहरणं द्या. तुमच्या लिंक्स वाचून त्यांच खंडण करण्याचं काम मी करत नाही. एनी वे, तुमचं कन्क्लूजन आहे :
तस्मात उत्तम काव्य हे यमकाविनादेखील करता येते.`यमक' हा गाण्यातल्या समेसारखा आहे. यमकाविना कविता म्हणजे `समेविना गाणं' असा अर्थ आहे त्यामुळे ते निरर्थक आहे. पुढे तुम्ही अगम्य लिहिलय :
आता उरला वृत्त-छंदादिकांचा मुद्दा. एकवेळ यमकाला झुगारणे सोपे आहे, परंतु वृत्त-छंदाला झुगारणे तुलनेने कठीण आहे. पण तशीदेखील कैक उदाहरणे देता येतीलयाचा अर्थ यमक नसले तरी छंद (किंवा लय अथवा वृत्त) नसलेली कविता असू शकते. आणि उदाहरण देऊन विचारलय `इथे यमक आहे, पण वृत्त कुठेय?' :
ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.तुम्हाला बहुदा लय म्हणजेच वृत्त (अथवा छंद) ही कल्पना नाही. या ओळी फक्त अश्या लिहिल्या की त्या लयबद्ध दिसतील (म्हणजे लय आहेच, फक्त ती लक्षात येईल) ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. पुढे लिहिलय :
...पण वॉल्ट व्हिट्मनच्या कविता लय वैग्रे काही बंधने न पाळूनसुद्धा तितक्याच गाजलेल्या आहेत. अन्य उदाहरणे देखील देता येतील.विषय मराठी कवितेचा आहे. तरीही लय आणि यमक अजिबात नसलेल्या कविता इथे द्या. शेवटी तुम्ही कहर केलाय :
रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य.रस निर्मितीसाठीच तर नादमय शब्द, लयबद्ध रचना आणि आवर्तनाची सम दर्शवणारं यमक हवं!
प्रस्तुत कविता रसपूर्णतेच्या निकषावर उतरली असल्याने "काव्य" या संज्ञेस नक्कीच पात्र आहे याबद्दल मला तरी आजिबात संदेह नाही.वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाही. स्वतः कवि म्हणतोय
संजय क्षीरसागर आपल्याशी सहमतत्यामुळे कवितेतल्या उणीवा दाखवून मी त्यांना पुन्हा नाउमेद करू इच्छित नाही. तुम्ही स्वतःची किंवा इतर कोणतिही मराठी कविता जी लय आणि यमकविरहित आहे ती इथे द्या आणि त्यातून रसनिर्मिती कशी झाली आहे ते दाखवून द्या.
In reply to @ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे? by संजय क्षीरसागर
In reply to @ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे? by संजय क्षीरसागर
यमक' हा गाण्यातल्या समेसारखा आहे. यमकाविना कविता म्हणजे `समेविना गाणं' असा अर्थ आहे त्यामुळे ते निरर्थक आहे.अधोरेखित वाक्याला आधार काय? की नुसतेच स्वमत? तुमच्या मताप्रमाणे संस्कृत काव्य निरर्थकच ठरेल-निव्वळ निर्यमक असल्यामुळे, नाही का? कालिदासाच्या मेघदूतातील "तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिंबाधरोष्ठी मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणानिम्ननाभि: श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्याम् या तत्र स्यात् युवतिविषया सृष्टिराद्येव धातु:" हे यक्षपत्नीचे अप्रतिम वर्णन, ज्यातून शृंगाररस ओसंडून वाहतोय, ते निरर्थकच आहे नैका? यमक नाही म्हणून?
विषय मराठी कवितेचा आहे. तरीही लय आणि यमक अजिबात नसलेल्या कविता इथे द्या.का? नाही, म्हणजे मराठी कविताच का? अन्य भाषांतील कविता दिल्याने नेमके काय बिघडते?
रस निर्मितीसाठीच तर नादमय शब्द, लयबद्ध रचना आणि आवर्तनाची सम दर्शवणारं यमक हवं!का? तुम्ही म्हणता म्हणून? पुन्हा एकदा, संस्कृत काव्याचा ढीगभर पसारा बघा, तुमच्या विधानाचा फोलपणा लगेच लक्षात येईल. भगवद्गीतेसारख्या अप्रतिम काव्यग्रंथात कुठेय यमक???? मेघदूतात कुठेय यमक? त्या यमकाचे विनाकारण स्तोम माजवण्यात काही अर्थ नाही. मराठीतली बहुतांश काव्यनिर्मिती यमकबद्ध आहे याचा अर्थ ते इन्डिस्पेन्सिबल आजिबात नाही. जर मराठीसदृश अन्य भाषांमधील काव्य पाहिले तरच हे लक्षात येते, नाहीतर एकच एक घेऊन बसले की वेगळे यापेक्षा काही असू शकेल या कल्पनेची रिसेप्टिव्हिटी संपते.
वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाही.मी स्वतः आधार दिलाय संस्कृत ग्रंथ साहित्यदर्पण याचे लेखक कविराज विश्वनाथ याचा आणि तरी तुम्ही म्हणताय आधार नाही!! एकतर तुम्ही प्रतिसाद नीट नाही वाचला किंवा विश्वनाथाचे म्हणणे चूक आहे असे वाटतेय. जर विश्वनाथ चूक आहे तर का आणि कसे ते सांगा- सप्रमाण, निव्वळ स्वमताच्या दृढ रोपणाने काही साध्य होणार नाही.
तुम्ही स्वतःची किंवा इतर कोणतिही मराठी कविता जी लय आणि यमकविरहित आहे ती इथे द्या आणि त्यातून रसनिर्मिती कशी झाली आहे ते दाखवून द्या.मी सुरुवातीस उद्धृत केलेली कविता रसपूर्ण आहे. हे विधान माझ्यासाठी जवळपास स्वयंसिद्ध आहे, पण तरी सांगतो, त्याचे विवेचन लिहिण्यास मला जरा वेळ लागेल, तोपर्यंत जर इच्छा असेल तर त्या कवितेची लक्तरे काढावीत खुशाल. मी काहीतरी लिहिणार, परत तुमचे रसग्रहण वेगळ्या अँगलने जाणार, एखाद्या शब्दाच्या अर्थासाठी विनामतलब, निव्वळ स्वमते प्रतिष्ठापिणारी वादावादी होणार, त्यापेक्षा तुम्ही उपरोल्लेखित कवितेतून रसनिर्मिती कशी काय होत नाही ते सांगा, त्याच्या आधी रस म्हणजे काय तेही स्पष्ट करा. संज्ञांच्या व्याख्या एकदा स्पष्ट झाल्या की निम्मा वाद तिथेच संपतो- हे वादातील दोन्ही पक्षांच्या फायद्यासाठी सांगतोय. सरतेशेवटी हे वाक्य
तुम्हाला बहुदा लय म्हणजेच वृत्त (अथवा छंद) ही कल्पना नाही.तुमच्या प्रतिसादातले कदाचित एकमेव सेन्सिबल वाक्य. एक प्रश्न आहे- ही जी लय आहे ती गेयतेशी संबंधित आहे का? आपल्या गद्य बोलण्यालादेखील एक लय असतेच, पण स्पेसिफिकली गाण्याशी संबंधित लय असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास मी सहमत नाही. इथे साहित्यासारख्या गोष्टींत अटळ असलेल्या सब्जेक्टिव्हिटीमुळे शेवटी तुमचे मत तुम्हाला, माझे मला. हे केवळ मतप्रवाह आहेत, यांपैकी इंट्रिन्सिकलि कोणताही मतप्रवाह अधिक बरोबर वा चूक नाही.
In reply to वॉल्ट व्हिट्मनची ही कविता by बॅटमॅन
...तोपर्यंत जर इच्छा असेल तर त्या कवितेची लक्तरे काढावीत खुशाल.मला अश्या कामात स्वारस्य नाही. माझ्या मते जीवनात जे जे सौंदर्यपूर्ण आहे ते सहज आहे आणि ते इतकं चटकन भावतं की विश्लेषणाची गरज उरत नाही.
वॉट अ ज्योक! तुमच्या रस निर्मितीच्या कल्पनेला काही एक आधार नाहीयावर तुम्ही म्हणताय :
मी स्वतः आधार दिलाय संस्कृत ग्रंथ साहित्यदर्पण याचे लेखक कविराज विश्वनाथ याचाआणि त्याचं विधान आहे `रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य!' ही व्याख्या मान्य केली तर `शिवाजीराव भोसल्यांची पल्लेदार वाक्य म्हणजे कविता' असं म्हणावं लागेल आणि त्यांचं संपूर्ण भाषण म्हणजे `महाकाव्य' होईल! तुमची बेसिक चूक बहुदा तुमच्या लक्षात येत नाहीये. ती भाषणं रसनिर्मिती करतात पण ते गद्य आहे पद्य नाही आणि चर्चा कवितेची आहे. रस म्हणजे काय ते मी संदीपच्या कवितेनं सदोहारण विशद केलय त्यामुळे तो मुद्दा परत घेत नाही. तरीही तुमच्या कवितेसंदर्भात रसनिष्पत्तीच्या काय कल्पना आहेत ते लिहा म्हणजे बघू. कमींग टू द एंड :
आपल्या गद्य बोलण्यालादेखील एक लय असतेच, पण स्पेसिफिकली गाण्याशी संबंधित लय असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास मी सहमत नाही.लयीचा अर्थ समान कालावधीमुळे येणारी वारंवारिता. या वारंवारितेत अंतर्भूत असलेला पॅटर्न. आणि त्या बरोबर येणार्या नादमय आणि चित्रदर्शी शब्दयोजनेमुळे निर्माण होणारा इंपॅक्ट किंवा रसनिष्पत्ती. `एकदा लय अंगवळणी पडली आणि शब्दांवर हुकूमत आली की कविता करणं अवघड नाही पण तिची आशयघनता मात्र कविच्या संवेदनाशिलता आणि अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते' असं ग्रेससारखा दिग्गज म्हणतो त्याच्या पुढे आपण काय बोलणार?
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण पण निरूपयोगी प्रतिसाद by संजय क्षीरसागर
ज्या कालिदास, भगवद्गीता वगैरेच्या गोष्टी केल्यात ती `महाकाव्य' वगैरे असतील पण त्या `कविता' नक्कीच नाहीत. टू बी वेरी फ्रँक, मला साध्या सोप्या कवितेशी जी सामान्य माणूस आपल्या उत्कट भावनांची अभिव्यक्ती म्हणून करू शकेल कर्तव्य आहे, महाकाव्याशी नाही. याचा अर्थ मला भगवद्गीतेची प्रतिभा मान्य नाही असा नाही. माझं इतकंच म्हणणय की त्या श्लोकात लयबद्धता असली तरी ती कविता नाही.या तीन वाक्यांचा अर्थ इतकाच की कविता म्हणजे काय, याची तुम्ही तुमच्या मते एक डेफिनिशन केलेली आहे आणि तिला काउंटरएग्झांपल मिळाले तरी तुम्ही लक्ष देत नाही आहात तिकडे. कारण तुमच्या मते कवितेत जी लय, इ.इ. असणे गरजेचे आहे, ते सर्व काही उपरोल्लेखित साहित्यात आहे. त्यामुळे माझ्याच काय, तुमच्या व्याख्येप्रमाणेदेखील ती कविताच आहे. ते सर्व साहित्य श्लोकबद्ध आहे, अनेक वृत्तबद्ध आहे, प्रत्येक वृत्ताला स्वतःची वेगळी चाल आहे. तुमची-माझी प्रथम भाषा मराठी असल्याने त्यातील सौंदर्याचा इंपॅक्ट आपल्यावर कदाचित तितका होणार नाही, पण संस्कृत भाषा जेव्हा भारतात बर्यापैकी प्रचलित होती, तेव्हा लोकांना समजायला अवघड गेले असावे असे नाही वाटत. बाकी महाकाव्य विरुद्ध साधी कविता म्हणायचे असेल तर संस्कृत स्तोत्रे पहा- साधी, ठाव घेणारी भाषा, आटोपशीर पसारा यांतच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक दडले आहे. ती उत्तम कविता आहे.
रस म्हणजे काय ते मी संदीपच्या कवितेनं सदोहारण विशद केलय त्यामुळे तो मुद्दा परत घेत नाही. तरीही तुमच्या कवितेसंदर्भात रसनिष्पत्तीच्या काय कल्पना आहेत ते लिहा म्हणजे बघू.बरं. आता माझ्या मते गद्य आणि पद्य रसनिष्पत्ति यांत फरक लयीचा आहेच, पण ही लय म्हणजे तुम्ही म्हणता तीच आहे असे मला वाटत नाही. एखादी कविता (तुमच्या अर्थाने नव्हे) गाता आली नाही, तरी तिच्यापासून रसनिर्मिती होते, मग गद्यापासून फार उल्लेखनीय फरक पडतो का? जपानी हायकू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. फक्त तीन ओळी, त्यादेखील गेयता वगैरेंचा घंटा विचार न करता फक्त आशयावर लक्ष केंद्रित करून लिहिलेल्या. मग त्यातील रसनिर्मिती आणि गद्य रसनिर्मिती यांत फरक नाही असं म्हणायचं आहे का?
`एकदा लय अंगवळणी पडली आणि शब्दांवर हुकूमत आली की कविता करणं अवघड नाही पण तिची आशयघनता मात्र कविच्या संवेदनाशिलता आणि अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते' असं ग्रेससारखा दिग्गज म्हणतो त्याच्या पुढे आपण काय बोलणार?पण इथे कविता अशीच असावी, तशीच नसावी, असे कुठे म्हणतोय ग्रेस? लय ही गेयतेशी निगडित असावी असा सूर कुठे ध्वनित होतोय? त्याने जनरल पॉईंटर्स मांडलेत, त्यांच्याशी असहमत होण्याचे काही कारण दिसत नाही. आणि कवितेच्या एकूण रूपाबद्दल स्वतः केशवसुतच म्हणतात- अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला आहात मोठे, पुसतो तुम्हाला? आता ही कविता वृत्त-यमक-बद्ध असल्याने काही सिद्ध होत नाही. मी फक्त केशवसुतांचा पॉईंट मांडला इतकेच.
In reply to वॉल्ट व्हिट्मनची ही कविता by बॅटमॅन
In reply to सहमत by आबा
मला मुक्तछंदातल्या कविता आवडतात .मेव्यानं `मी ही कवि होणार' ` मधे म्हटलय
छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!त्याला नक्की काय म्हणायचय ते, तू लिहिलेलं असं वाचलं की लक्षात येईल : हळव्या जाईला एकदा विचारलं तुझ्यात कुठुन गं एवढी अधिरता भरलिय ? तर म्हणाली ... नाहि गं! त्याचा स्पर्श होताच पाकळी आपोआप उमलु लागते. तुला तुझं लेखन (किंवा कल्पना) कविता वाटते कारण पुढे `लागते' ला `जाते' ! असा यमक जुळवलाय. ऑन इटस ओन ती गद्यात लिहिलेली कल्पना आहे. पुढे जे काय लिहिलयस ती पण गद्य कल्पना एंटर मारून पद्य केली आहे आणि तिथे तर यमकपण जुळत नाही त्यामुळे ते `एक वेगळं वाक्य' झालंय. ढगा आडुन वारा जेव्हा अव़खळ लिला करायचा वेड्यागत चमेलीचा ताटवा नुसता बघत उभा रहायचा (इथे यमकामुळे कवितेचा भास होतो पण पुढे सरळ वाक्य आहे) मग एकदा हटकुन तिला छेडलं " इतकी कशी गं वेंधळी तु? "तर म्हणाली ... नाहि गं !वार्याच्या चाहुलिनच तनु मोहोरल्याचा भास होतो
In reply to @ पूजा, खरं तर तुझ्यामुळे ही चर्चा झाली म्हणून तुझे आभार by संजय क्षीरसागर
बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली जाते आणि कवितेतले शून्य कळत असताना देखील खाडकन कीबोर्ड पुढे ओढून दाद दिली जाते ती आमच्या दृष्टीने कविता.हे गुणगुणलं जाणं म्हणजे लय आणि दाद देणं म्हणजे रसनिष्पत्ती. हेच मी एका वाक्यात लिहिलं होतं `कविता म्हणजे चाल न लावलेलं गाणं' आता इथे चर्चा क्लिष्ट कुणी केलीये ते पाहा म्हणजे झालं.
In reply to परा, माऊस स्क्रोल करायला सहभागी असलेल्या दोघांचे प्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to पहा... by गवि
In reply to चेपुवरुन साभार... by ५० फक्त
In reply to कथिन आहे. by बॅटमॅन
In reply to कथिन आहे का कुथून आहे? by प्रचेतस
...पण तरीही त्या कवितेच्या अर्थाच्या दृष्टीने ते तिथे तसेच हवे आहे. तर हि फारकत त्या कवितेला अर्थाची जोड देऊनही त्या रचनेची गेयता आणि लय कायम ठेवते आहे.आणि माझा इथे दिलेला पहिला प्रतिसाद :
...कवितेवरच्या अभिप्रायाबद्दल असेल तर कवितेला लय असणं नितांत आवश्यक आहे. शिवाय शब्दांच नादमाधुर्य बघणं तितकंच महत्त्वाचय. नाही तर गद्य आणि पद्य यात फरक तो काय?आता मजा म्हणजे बॅटमॅन स्वतःचा स्टँड बदलायला लागलेत : पहिला प्रतिसाद :
कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहेआताचे प्रतिसाद :
बरं. आता माझ्या मते गद्य आणि पद्य रसनिष्पत्ति यांत फरक लयीचा आहेच..
मग त्यातील रसनिर्मिती आणि गद्य रसनिर्मिती यांत फरक नाही असं म्हणायचं आहे का?
लय ही गेयतेशी निगडित असावी असा सूर कुठे ध्वनित होतोय?तुम्हाला गद्य आणि पद्य यातला फरकच कळत नसेल किंवा लयबद्धता म्हणजे काय ते समजत नसेल तर चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही.
In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी आता बास करा राव. by हारुन शेख
उगाच धाग्याची गाझापट्टी करू नका.भिडलं!!!!
In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर
In reply to ती चर्चा मी वाचलीये, लय by बॅटमॅन
In reply to चिल माडी सार! by दादा कोंडके
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची काही लिहिलं की पुढे जन्मभर काही लिहिण्याची गरज नाही!याच्याशी दिलोजानसे तुंबा सहमत :)
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील ... भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही ...माझ्याकरिता लय अगदीच हरवलेली ओळ :
पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगदकाही यमके आवडली (समुद्रावर/प्रवासावर हे यमक अनपेक्षित, आधी चुकचुकणारे, पण लयीमुळे चपखल होणारे यमक!), तर काही बेडौल वाटली (मन/अंगण? त्यावेळी/कोवळी? यमक साधायचे ठरवले, तर आघातांच्या लयीचा विचका होतो). आता कवी हारून शेख यांनीच म्हटले आहे, "आपल्याशी सहमत." ही सहमती म्हणजे काय? हारून शेखना रचण्याच्या वेळीसुद्धा कुठलीही लय जाणवली नाही अशी सहमती आहे काय? खुद्द कवीला लय जाणवत नसेल, तर मला लय जाणवते, असा आग्रह मी करणार नाही. ("मला लय जाणवली नाही" असा शब्दही फिरवणार नाही. आग्रह करणार नाही, इतकेच.) लयीत आणि यमकांत सफाई नाही, इतपत कवीची सहमती असेल, तर चांगले. मलाही तसेच जाणवते. पण सरावाने सफाई येईल. हा प्रयत्न छान झाला आहे.
In reply to शेख च्चच्चा कविता आवडली . by जेनी...
In reply to पवारा प्राण तळमळला by हारुन शेख
In reply to माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं by संजय क्षीरसागर
चर्चा संपन्न करतो.
मनापासून आभार.
या निमित्ताने तुमची काव्यक्षेत्रातली जाणकारी पाहून एक नम्र सुचवणूक. तुम्ही "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक लिखाण केले तर माझ्यासारख्या सदस्यांना काव्य विभागात सक्रिय सहभागी होता येईल.
आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.In reply to धन्यवाद... by मोदक
आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.आता काय पाळणाघर काढणार का काय संजय काका? ;)
In reply to धन्यवाद... by मोदक
In reply to माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं by संजय क्षीरसागर
जे सुचतय तसचं उतरवायचं राव, ते मीटर, वृत्त, यमक गेलं चुलीत.. आधी खुप वाच, सगळं वाच, बहीणाबाई पासून ते अगदी चेपूवरच्या नवकवींपर्यंत सगळ वाचत जा... पण तेच लिही जे तुझ्या आतून येतं. तुझ्यात प्रतिभा असेल तर ती दिसेलचं, नसली तरी काही बिघडत नाही, तुझा तुला आनंद नक्की मिळेल.आता असे काही ऐकल्यानंतर कोणाला हात आवरता येणार आहे सांगा? म्हणून मी लिहीतो ;)
आर्त आशयघन कविता आवडली.