एखाद्याची लायकी म्हणजे काय? हा प्रश्न मला बर्याच दिवसांपासून पडला आहे. ही एखाद्याची लायकी नेमकी कशी सिद्ध होते आणि कोण सिद्ध करतो? म्हणजे मलातरी अजुन कळलेले नाही. खरेतर माझी स्वत:चीच लायकी अजुन सिद्ध झाली नसल्याने दुसर्याची लायकी काढायचा प्रश्नच उद्भवत नाही.
एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर, विरारला जाण्यासाठी, लोकलच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तिक़ीट देणारा क्लार्क सुट्या पैशांसाठी हुज्जत घालत होता. बाजूच्या कोपर्यात एक एटीम मशीन होते आणि तिथला वॉचमन त्या काउंटरवरच्या क्लार्कशी मी यायच्या आधि गप्पा मारत तिथेच उभा होता. तोही जरा गमजेतच होता. त्याने उगाचच, "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" अशी कमेंट पास केली (हिंदीत).
माझ्या अंगाचा तिळपापड झाला. आधिच रात्रीचे 12 वाजत आले होते, प्रवासाने शिणलो होतो. त्यात त्याचा हा अगोचरपणा, माझा तोल गेला आणि मीही त्याला 'अबे XXX औकात मे रेह, समझा ना' वैगरे बोलून गेलो. नंतर कसेबसे तिक़ीट घेतले सुट्ट्या पैशावर पाणी सोडून. पण गाडीत बसल्यावर, थंड हवा लागल्यावर जरा शांत झालो आणि त्या वॉचमनला बोललेलं माझ वाक्य मला आठवून मला पश्चाताप होऊ लागला. त्याची अशी लायकी काढायचा मला खरंच अधिकार होता का?
तेव्हापासून काही प्रश्न आजतागायत पडले आहेत.
1. एखाद्याची अशी लायकी काढायचा मला अधिकार आहे का?
2. एखाद्याची अशी लायकी काढताना माझी स्वत:ची लायकी सिद्ध झाली आहे हे कसे सिद्ध होणार?
3. एखाद्याला असेल स्वत:बद्दल पराकोटीचा अभिमान म्हणून मला त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का?
4. असेल एखाद्याचे तोंड फाटके तर लगेच मलाही जीभ टाळ्याला लावून लगेच त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का?
ह्या प्रश्नांची उत्तरे इथे लायक असणार्यांकडून मिळतील अशी आशा आज जागृत झाल्यामुळेच हा काथ्याकूट...
वाचने
25633
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो गया ना लोचा...
"अनुल्लेखाने मारणे"
दुसर्यांनी ठरवायची असते
सोप्पं आहे!!
--^--^--^--
In reply to सोप्पं आहे!! by पिवळा डांबिस
हा हा हा, पिडांकाका हा किस्सा
In reply to सोप्पं आहे!! by पिवळा डांबिस
पुण्यावरून मुंबैला येताना...दादर स्टेशनवर?
अवो, तसं न्हाई जोशीसायेब!
In reply to पुण्यावरून मुंबैला येताना...दादर स्टेशनवर? by श्रीरंग_जोशी
असे होय...
In reply to अवो, तसं न्हाई जोशीसायेब! by पिवळा डांबिस
आता आमी तरी कुटं...
In reply to असे होय... by श्रीरंग_जोशी
दुरुस्ती
In reply to पुण्यावरून मुंबैला येताना...दादर स्टेशनवर? by श्रीरंग_जोशी
अ. वॉचमन ऐवजी तिथे एखादा उच्च
सुट्ट्या पैशांवरून हुज्जत?
In reply to अ. वॉचमन ऐवजी तिथे एखादा उच्च by औदुंबर
सुट्ट्या पैशांचा मुद्दा
In reply to सुट्ट्या पैशांवरून हुज्जत? by श्रीरंग_जोशी
संपूर्णपणे असहमत
In reply to सुट्ट्या पैशांचा मुद्दा by औदुंबर
- चलनाच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडतो, कारणेः
- चलन छापणे, त्याचे देशभर वाटप करणे, त्याच्या सुरक्षेचा खर्च व त्याच्या काळजीचा खर्च
- एवढे करूनही छापलेली प्रत्येक नोट काही वर्षांत वापरायच्या योग्यतेची उरत नाही (रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना बरेच लोक जुमानत नाहीत). त्यामुळे त्या किमतीचे चलन पुन्हा छापावे लागते म्हणजे वर लिहिलेला सर्व खर्च पुन्हा एकदा.
- कितीही प्रयत्न केले तरी आपले शेजारी देश जवळ जवळ मूळ चलनाच्या दर्जाएवढा दर्जा असणारे खोटे चलन भारतात पोचवतात. त्याच्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात व अनेक निरपराध नागरिकांना झळ बसते.
- रोख रक्कमच नाही तर धनादेश व डिमांड ड्राफ्टच्या वापरामध्येही अनावश्यक खर्च होतोच.
- रोख चलनामुळे जागोजाग भ्रष्टाचार सहजपणे करता येतो.
या सर्वांवर परिणामकारक उपाय म्हणजे कार्डांचा किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर पैशांच्या देवाण घेवाणीसाठी करणे. बरेच ठिकाणी ग्राहकावर २.xx% अधिभार लावला जातो, काही ठिकाणी मात्र असे होत नाही. मी स्वतः कमवायला लागल्यावर सुरुवातीचे काही दिवसच रोख रकमेचा १००% वापर केला. त्यानंतर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी कार्ड अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे खर्च केले (माझा वाणसामानाचा दुकानदार सुद्धा या माध्यमाने देयक स्वीकारतं असे). त्यासाठी आजवर हजारो रुपये माझ्या खिशातून अधिक गेले. पण देशाच्या संपत्तीचा गैरवापर टाळण्यात अमीबाएवढा का होईना मी माझा वाटा उचलला. अवांतर - महाराष्ट्रातले एक जगप्रसिद्ध मिठाईचे दुकान ज्याची अनेक लोक थट्टा करत असतात ते केवळ रोख रकमेद्वारेच बिलाची रक्कम स्वीकारत असे. तिथे कार्ड-देयकाबाबत विचारणा केल्यावर नकारात्मक उत्तर मिळत असे. सप्टेंबर २००८ मध्ये त्याचे कर्मचारी दुपारपर्यंत जमा झालेली रक्कम (जवळ जवळ ६ लक्ष रुपये) बँकेत पोचवत असताना हल्ला होऊन लुटली गेली. ईसकाळ वर बातमी प्रकाशित झाल्यावर अनेक जालिय वाचकांनी असुरी आनंद व्यक्त केला होता. त्या दुकानाने जर पूर्वीपासून कार्ड देयक स्वीकारले असते तर अनेक ग्राहकांचीही सोय झाली असती अन नाममात्र रकमेसाठी कुणी त्या कर्मचाऱ्यांवर हल्ला पण केला नसता. मी लहान असताना पाकीट / पर्स हरवल्याने किंवा चोरट्यांनी पळवल्याने अनेक लोकांचे अपरिमित नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. आज तसे झाल्यास बऱ्याच लोकांचे नाममात्र नुकसान होते कारण कार्डांचा वापर. आपल्या देशाने इतकी तांत्रिक प्रगती केली आहे की इतर कुणाशी तुलना करण्याचे काही कारण उरलेले नाही. येणाऱ्या काही वर्षांत किरकोळ भाजीविक्रेते, चाट भंडार, रिक्षा चालक हे लोक सुद्धा त्यांच्या चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या कार्ड रीडरद्वारे देयक स्वीकारताना दिसतील असा मला विश्वास वाटतो.अत्यंत सहमत. आणि कार्ड म्हणजे
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
खुप छान प्रतिसाद...
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
मंग्रठी भाषा आहे ती
In reply to चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या by विजुभाऊ
असहमत...
In reply to सुट्ट्या पैशांचा मुद्दा by औदुंबर
बाझवला !
लायकी
:)
बाकी... सोत्री अण्णा
=)) =))
In reply to बाकी... सोत्री अण्णा by बन्या बापु
आबे,
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
लायकी काढणे हा अपमान करण्याचा
वो पिडाकाका सही बोल्ताय.
In reply to लायकी काढणे हा अपमान करण्याचा by मृत्युन्जय
मला राहुल बोस ची पूजा बेदी
मोडका पूल
छान ,
+१
In reply to छान , by सुहास..
होता है..
हा हा...
अस होत कधी कधी...
"कुलूप आहे का?"
In reply to अस होत कधी कधी... by बाबा पाटील
चलता है...
In reply to "कुलूप आहे का?" by मोदक
हम्म...
In reply to अस होत कधी कधी... by बाबा पाटील
बाकीच्यांचे माहित नाही. पण
माझा अपमान झाला म्हणून आजवर
In reply to बाकीच्यांचे माहित नाही. पण by विश्वनाथ मेहेंदळे
अरे विमे
In reply to बाकीच्यांचे माहित नाही. पण by विश्वनाथ मेहेंदळे
==))
In reply to अरे विमे by स्पा
अलेले उगी उगी
खॅ...खॅ...खॅ...
In reply to अलेले उगी उगी by स्पा
लायकी आणि नालायकपणा
लायकी आणि नालायकपणा
एखाद्याची लायकी
योग्यायोग्यतेच्या नियमांचा
काही चुक केली नाहीत तुम्ही.