यकुविषयी ती घाणेरडी बातमी इथूनतिथून पहिल्यांदा कानावर आली तेव्हापासून सुरुवातीला डिनायलमधे जाणं पसंत केलं. नंतर वर्तमानपत्राची लिंक आणि त्यातला स्पष्ट उल्लेख.. आणि सगळीकडून येणारी कन्फर्मेशन्स यामुळे एकदम लटपटायलाच होत होतं.
आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय.
पण अजूनही उजव्या कॉलममधे "हजर सभासद" मधे यकु दिसेल म्हणून नजर तिथे जातेच आहे.
अजूनही संदेश (१ नवीन) असं पाहून क्लिक करु आणि "गवि.. हे वाचलंत का?" अशा टायटलने एखाद्या अत्रंग धाग्याची लिंक यकुने दिली असेल म्हणून डोळे तिथे फेरी मारुन येताहेत.
यकुच्या युजींबद्दलच्या लेखांनी मी माझे सर्व स्केप्टिक गंड सोडून युजींच्या विचारधारेवर मनापासून विचार करायला लागलो होतो आणि स्वतःच्या अशा धारेला लागल्यासारख्या वागण्याने दचकलोही होतो.
मुंबईत लोकलने प्रवास करताना एक छोटीशी भिकारी मुलगी यकुला दिसली. आपल्यालाही अशी भिकारी पोरं रोज दिसतात. पण तिला बघून यकु मात्र ढसाढसा रडला. असह्य होऊन त्याने मला फोन लावला आणि श्वास कोंडेपर्यंत रडला. समोरच्या क्षणाशी पूर्ण भिडून जगणारा आपला यकुच आहे..
यकुची मैत्रिण इजिप्तमधेही होती. इतक्या दूर असलेल्या आणि भेट शक्य नसलेल्या तिच्याशी असलेल्या अनाम नात्याची हुरहुर मला जाणवली होती. वाळूत यशवंत असे शब्द रेखाटत बसलेली तिची मुद्रा फोटोंमधे पाहून मला गलबललं होतं. जेव्हा माझी आई इजिप्तला टूरवर जाणार होती तेव्हा त्या मैत्रिणीला भारतीय साडी बांगडी आणि काय काय पाठवणार होता. ते आणूनही ठेवलं होतं बहुतेक. इजिप्तमधे सिव्हिल वॉर होऊन ते जाणं कॅन्सल झालं तेव्हा यकु काहीच बोलला नाही. मी मात्र मनात आणखी जास्त कळवळलो. त्या इजिप्तच्या अराजकामधे इंटरनेटसह तिचे सर्व काँटॅक्ट्स बंद झाले.. यकु काहीच बोलला नाही. मीही विचारायला धजावलो नाही.
मिपामधे यकुचा बहि:स्थ प्राण आहे. मिपावरुन त्याचा आयडी ब्लॉक झाल्यावरही जुन्या आयडीने येऊन पहिल्या दमातच "मी मिपाशिवाय राहू शकत नाही" असं दिल खोल के कबूल करणारा यकुच आहे. रात्री दोन वाजता जडावल्या डोळ्यांनी मोबाईलवर मिपा लोड करणार्या माझ्यासारख्या व्यसनींना त्यावेळी मिपावर हमखास जर दिसणारा यकुच आहे. कोणताही लक्षवेधी धागा आला की त्याविषयी व्यनि करुन मला ढोसकलून जागं करणारा, निगुतीने इकडच्या तिकडच्या लिंका पेस्टवणारा यकुच आहे. मिपावरच्या धाग्यांमधे इतका दिलो जान से इन्व्हॉल्व होणारा यकुच आहे.
"गुंजग्रामीचे दिवस" मधून गावाच्या धुळीत घेऊन जाणारा आणि रात्रीच्या भजनात गुंगी आणून देवळाच्या मंडपातच सर्वांना झोपवणारा यकुच आहे. "आमचा पाव एक गाव" मधे मिसळपावला शब्दशः एक गाव बनवून सर्वांच्या कल्पनेत उभं करणारा यकु आहे. शब्दाशब्दात किती प्रचंड ताकद असते ते जाणून किंवा न जाणता जबरदस्त ताकदीने शब्द लिहीणारा यकु आहे.
मधेच एक सरकलेली पोस्ट लिहायला घेणारा यकु.. नव्यानव्या विचारसरणींना उत्कटपणे भिडणारा यकु.. हे काय सालं कोडं आहे ते उलगडलंच पाहिजे असं पोटतिडकीने म्हणणारा यकु..
आणि हो.. इतक्या सगळ्यानंतरही मला आजपर्यंत समोरासमोर कधीही न भेटलेला यकु..
यकुने मला मिपावर आणलं. मी प्रवासात होतो म्हणून माझ्या एका शब्दाखातर यकु माझ्याऐवजी "ब्लॉग माझा" स्पर्धेचा पुरस्कार घ्यायला त्याच्या गावापासून पूर्ण प्रवास करुन मुंबईत आला आणि माझ्याजागी शूटिंगला गेला, दिवसभर ताटकळूनही संध्याकाळी फ्रेश मनाने लोकलला लटकून केवळ माझं पुस्तक शोधायला मुंबईच्या दुसर्या टोकाला भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात गेला.
यकुच्या प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगच्या वेळेपासून आत्तापर्यंत मला सर्वात जास्त आवडणार्या प्रतिक्रिया आहेत. मला आलेला पहिला स्वागताचा व्यनि यकुचा आहे आणि मला आलेले सर्वात जास्त व्यनि यकुचे आहेत. यकुच्या मिपा होमपेजवर आवडत्या लिखाणात पहिलं नाव माझ्या पुस्तकाचं आहे. माझ्या कोणत्याश्या लिखाणावर बेहद्द खूष होऊन यकुने मला एक आख्खी आरसी बॉटल लागू केली आहे. ती त्याच्यावर पेंडिंग आहे. यकु माझ्यासोबत मासे खायला सुरुवात करणार आहे. यकुला आधी इंदोरमधे आणि आता औरंगाबादेत माझ्यासोबत आणि इतर मिपामित्रांसोबत कट्टा करायचा आहे. त्याचे रिमाईंडर तो नेहमी नवे व्यनि काढून उत्साहाने पाठवतो.
मी पुन्हा तीच चूक करतोय. लिखाण करण्याच्या भरात मी वर्तमानकाळावर उतरलोय. नुसतं वर्तमानकाळात लिहून आमचा तिकडचा यकु इकडे थोडाच येणार आहे ?
...
एकदम भान येतं आणि यकुच्या जाण्याच्या धाग्यावर आलेल्या आणखी प्रतिक्रिया वाचतो. त्यात दिसतं की प्रत्येक मिपाकराला यकु अगदी तस्साच आणि तितकाच भिडला आहे. प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली..
.
यकुच्या पिकासावर चढवलेली ही एक कविता सापडली.. :

यकुच्या पिकासावर चढवलेली ही एक कविता सापडली.. :

वाचने
23175
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
.............................
प्रत्येकाशी असंख्य धागे
:(
In reply to प्रत्येकाशी असंख्य धागे by किसन शिंदे
(No subject)
हे वाचुन असं वाटतंय की आपणच
तंतोतंत
In reply to हे वाचुन असं वाटतंय की आपणच by ५० फक्त
मूर्ख
+१^n
In reply to मूर्ख by श्रावण मोडक
मीही तसंच म्हणून पाहिलं
In reply to +१^n by बिपिन कार्यकर्ते
कितने आसानी से कह दिया ...
In reply to मूर्ख by श्रावण मोडक
भावना
In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा
असहमत
In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा
संवेदनशीलता हे पाप आहे
वेगळी श्रध्दांजली
+१
In reply to वेगळी श्रध्दांजली by धर्मराजमुटके
यकुचं समग्र लिखाण एकत्र खालील
In reply to +१ by शिद
जगताना सगळ्यांचा होऊन
एकदा व्यक्ती गेली कि गेली ..
In reply to जगताना सगळ्यांचा होऊन by इनिगोय
(No subject)
माझा त्याचा व्यनी-मनीच्या
अगदी असेच!
In reply to माझा त्याचा व्यनी-मनीच्या by गणपा
............
चीड..
सॉरी दोस्ता, तूला समजून
मन उदास झाले सारे वाचुन......
प्रत्यक्ष ओळख जरी नसली
फार त्रास होतोय जीवाला.
मिपावर आल्यापासुन
पण हा काही पर्याय होऊ शकतो का
हसास दिल ...
ही बातमी समझली तेव्हापासून मन
... !!!
(No subject)
मरण्यापेक्षा जगण्यासाठी अधिक
श्रध्दांजली
.....
वाईट वाटले
नको झालाय स्वतःचा विवेक. नको
आपाताई,
In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना
कुणी बोलो न बोलो, एक आई
In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना
वाईट्ट
(No subject)
हम्म...
थोडा अंदाज येतोय
यशवंता..
फार वाइट बातमी ....
समाधी
हे वाचा -
In reply to समाधी by चेतन सुभाष गुगळे
वाईट बातमी
अरे काय रे हे...
विवेक
सहमत
In reply to विवेक by श्रावण मोडक
+१००० श्री.मोडक, बरोबर बोलत
In reply to सहमत by आजानुकर्ण
सहमत...
In reply to +१००० श्री.मोडक, बरोबर बोलत by ५० फक्त
यकु गेला यावर अजुनही विश्वास
देव सर्वांचे भले करो वा न करो
वाईट बातमी!!
'या केस मधे त्याच्या मानसिक
In reply to वाईट बातमी!! by मराठमोळा
५०,
In reply to 'या केस मधे त्याच्या मानसिक by ५० फक्त
माझा तर पुर्ण विश्वास होता की
In reply to ५०, by मराठमोळा
शांत गदाधारी भीम..शांत.
In reply to माझा तर पुर्ण विश्वास होता की by बॅटमॅन
यकुशी कोण कायकाय बोलले आणि
In reply to शांत गदाधारी भीम..शांत. by गवि
ज्यांनी आंतरजाल हेच आयुष्य
In reply to यकुशी कोण कायकाय बोलले आणि by इनिगोय
मन खिन्न झाले.
ही वेंट टू द एक्स्ट्रीम
+१. तंतोतंत.
In reply to ही वेंट टू द एक्स्ट्रीम by संजय क्षीरसागर
साधकांनी `संसार आणि अध्यात्म'
घरि कोनि जाउन आले आहे का त्याच्या?
पुन्हा वाचले.....