तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)
लेखनविषय:
नमस्कार,
मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती.
हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ. शुचिताई यांचे आहे.
तू कूक मी स्नेही
तू बूक मी वही
तू गप मी चूप
तू तेल मी तूप
तू नेहरू मी शास्त्री
तू कूक मी पॅस्ट्री
तू ताई मी आप्पा
तू मम्मी मी पप्पा..
तु कोको मी कोफी,
तु केक मी साकी.
तू स्नेही मी कूक
तू लाही मी दूध
तु एक्वाफिना, मी बिसलेरी
तु अमुल बटर, मी देसी घी
तु सीएस, मी सीए
तु बीएमएस, मी एमबीए
मी गूळ, तू गुळांबा
मी भीम तू हिडींबा
तू पंडित मी काझी
तू मनमोहन मी सारकोझी
तू जावा मी डॉट नेट
तू हवा मी ईथरनेट.
मी प्लग तू सॉकेट
तू उपग्रह मी रॉकेट
तू चिकु मी अंजीर
तू चाकु मी खंजीर.
तू बाकरवडी मी हलवा
तू खोताची वाडी मी कळवा
तू कीबोर्ड मी माऊस
तू ढग मी पाऊस...
तु कोकण, मी कॅलिफोर्निया
तु पोखरण, मी अणुमॅनिया!
तू खव मी व्यनि
तू बोका मी मनी
तु अॅरिस्टोटल मी प्लुटो,
तु माओ, मी हुन जिंन्तओ.
तू तात्या मी नाना
तू *त्या मी शाना.
तू वसई मी विरार
तू पारई मी लोहार.
तू कानपूर मी नागपूर
तू करीना मी कपूर
तू लांबी मी रुंदी
तू हिंदी मी सिंधी
तु विसा, मी मास्टर कार्ड
तु हेल्थी, मी जाड फार!
तू मुंबई मी बंगलोर
तू दुबई मी लाहोर.
तु देना मी एसबीआय
तु प्रतारणा, मी करु काय?
तू लांबी मी रुंदी
तू हिंदी मी सिंधी
तु शिवनेरी मी ऐरावत,
तु एसबीआय मी स्टँर्डड चाटर्ड!
तु ताट मी वाटी
मी कोकनी आन तु घाटी
तु मथुरा मी काशी
मी विंग्रजी तु देशी
मी कॅसेट तु खरखर
तु मायबोली मी मिपाकर
तु समाधी, मी ब्रम्हानंदी,
तु संन्यासी, मी बैरागी
तू एक टन मी दोन टन
तू हिलरी मी क्लिंटन
मी भाउ तू मामा
तू रिकामा मी ओबामा.
तू नोकिया मी सोनी
तू गोणपाट मी गोणी
तु मोबाईल मी बेसिक फोन,
तु मंजुळ, मी रुड टोन!
तू याहु मी गुगल
तू आळस मी मरगळ
तु मयाक्रोसोफ्ट मी अॅपल,
तु मिसळपाव, मी मनोगत
तु बीअर मी ओपनर
तु 'साहिल' मी झमझम!
तू फियाट मी फरारी.
तू मनमोहन मी झरदारी.
(अर्थात कोणी कुठली ओळ लिहीली ही माहीती आम्ही जाणीवपुर्वक गोपनीय ठेवली आहे.)
विनंती: रसिक वाचकांनी यात अजुन भर घातल्यास आम्हाला विशेष आनंद होईल!
--
मिसळपाव खरडफळा श्री. इंटरनेटस्नेही.
वाचने
30625
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
या धाग्याच आयुष्य किती माहीत नाही,
पण गुढगा खुप दुखतोय का रे ;)
In reply to या धाग्याच आयुष्य किती माहीत by गणपा
>>>पण गुढगा खुप दुखतोय का रे
म्हंजी? अंमळ समजलो नाही?
असो. प्रतिसादा बद्दल धन्यु.
In reply to >>>पण गुढगा खुप दुखतोय का by इंटरनेटस्नेही
:D :D : D
In reply to या धाग्याच आयुष्य किती माहीत by गणपा
>>पण गुढगा खुप दुखतोय का रे 

तू मिसळ मी पाव
तू "पीच" मी धाव!
In reply to तू आणि मी by पैसा
धागा मस्त काढलाय हो
-
पैसा जी आपला रिप्लाय ही मस्त
हे पण कसे वाटते आहे .. ?
--
तु मिसळ मी पाव
तु शब्द मी घाव
तु पैसा, मी रोकड
तु सुरी, मी बोकड
In reply to धागा मस्त काढलाय हो- पैसा by गणेशा
चालू ठेवा!
@ पैसा, गणेशा
कीप ईट अप!
तु लेख मी कथा
तु वर्णन मी व्यथा
तु सकाळ, मी दुपार
तु वाचक, मी चकार
तु good मी वाईट
तु Day, मी नाईट
- चला गुड नाईट
-
तू वेडा, मी वेडी
तू जादा, मी थोडी ;)
तू पाऊस, मी धारा
तू थेंब, मी गारा !
तू नळी, मी हुक्का..
तू कडका, मी व्होडका !!
तू मी, मी तू,
तू मैना, मी मिठु....
.....अहो बास बास, नका फार सुटु .....
मी सुइ..तु दोरा
मी गोरी ..तु काळा ;)
मी टिव्ही ..तु खोका
मी माउ ..तु बोका
In reply to मी टिव्ही ..तु खोकामी माउ by पर्नल नेने मराठे
मी जांभूळ, तू करवंद,
मी स्वानन्द, तू आनंदी आनंद
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवुन देणारा धागा.
In reply to बुद्धीमत्तेची चुणुक दाखवुन by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
मिपाच्या साहित्यात अनमोल भर
तु जनता, मी नेता,
तू कमविता , मी नेता.
In reply to तु जनता, मी नेता,तू कमविता , by गांधीवादी
सुधारणा
तु जनता, मी नेता,
तू कमविता , मी खाता.
तू बाकरवडी मी हलवा
ही ओळ थोडीशी सुधरवा
तू बाकरवडी...मी बेडूकउडी
तू विरजण मी टारझन
तू लेखणी
मी शाई,
मी अरेच्च्या
तू अगबाई.....!
लगे रहो......
तु जल मी वाहिणी
तु शब्द मी कहाणी !
तु हडळ... मी खविस
मी चोर .....तु ४२०
तु अंगत, मी पंगत
मिसळपाव संगत धागा चालला रंगत :)
तू हवा मी पाणी,
मी राजा मी राणी ;)
तू हवा मी पाणी,
मी राजा मी राणी ;)
तू हवा मी पाणी,
मी राजा तू राणी ;)
मी ऐल तू पैल
मी चूल तू वैल
मी कडक तू सैल
तू गाय मी बैल
@कलश
तू तीन मी एक
तू ब्रेड मी केक ;) ;) ;)
मी दळण तू वळण,
मी गाळण तू चाळण !
तु फेस मी बुक,
तु केस मी लूक :-P
तू " काय? " मी " हाय !"
तू वाउ मी बाउ
तू अगर मी तगर,
तू घागर मी सागर ;)
तू ऊभा मी आडवा,
तू दिवाळी मी पाडवा :-P :-D
इंट्याने डु आयडी घेतला काय?
In reply to इंट्याने डु आयडी घेतला काय? by अन्या दातार
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;)
अवांतरः माझ्या काही ओळी,
तू प्रोग्राम मी बग,
तू सॉकेट मी प्लग.. :)
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :)
असो..
तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;)
तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))
तु उप मी क्रम
तु मनो मी गत
तु मिसळ मी पाव
तु मीम मी राठी
तु ऐसी मी अक्षरे
ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.
तू पारस मी मणी,
तू तरस मी फणी :-P
तु रात्र मी चांदणी
तु चित्र मी वाहिनी
तु रंग मी ब्रश
तु आयटम मी क्रश ;)
तु स्वीट मी हनी
तु खरड मी व्यनी :D
तु आवरा मी सावरा
तु कावरा मी बावरा
तु आइ गं! मी आयला !
तु च्यामारी ! मी च्यायला :P
बाकिचं नंतर .
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी)
तू वेल्डर, मी फिटर.
तू ग्राईंडर, मी कटर.
तू गियरबॉक्स, मी मोटर
तू शेड, मी शटर.
तू अॅम्पीअर, मी व्होल्ट.
तू नट, मी बोल्ट.
;)
;)In reply to नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी by गणामास्तर
तू अॅम्पीअर, मी व्होल्ट.
तू नट, मी बोल्ट.
हे फारच मार्मिक होते.
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले)
तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर
तू सीटीपी मी इमेजसेटर
तू इमेज मी रिझोल्युशन
तू लेआऊट मी कम्पोझीशन
तू यंत्र मी तंत्र,
तू सुत्र मी मंत्र :)
तू आस मी पास,
तू प्यास मी ध्यास ;)
तू गुण मी दोष,
तू सदोश मी निर्दोश :-P
तू सूट मी केस
तू बूट मी लेस ;)
तू पूरण मी पोळी
मी बंदूक तू गोळी :-P
तु दीपावली मी दसरा
तु बटाटा, मी काचरा.
तु करन्जी,मी सारण
तु कर्ज, मी तारण.
तु पणती.मी दिवा,
तु छावि,मी (सुका)मेवा.
तु मासा, मी बगळा
तु शहाणी, मी बावळा
तू ऊंट मी सांडणी,
तू तांदूळ मी कांडणी
तू दिवा मी वात
तू धर्म मी जात
मी थंडि तू ताप
मी शाप तू उशाप...
तू कडू मी गोड,
तू बंदा मी मोड ;)
तू दिवा मी बत्ती,
मी हवा तू हत्ती :-P
तू बिग मी बॉस
तू ब्रेड मी सॉस :-P
तू याहु मी गुगल
तू इतिहास मी भुगोल
तू हृदय मी यकृत,
तू मराठी मी संस्कृत !
तु उद्या मी आज
तु श्रुंगार मी साज
तु हुक्का मी पाईप
तु सुका मी टाईट
लोल..
इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे प्रतिक्रियांचा रतीब पडलाय बघ.
(का कलशात जुनेच पाणी???)
In reply to इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे by अन्या दातार
शक्यता नाकारता येत नाही.
तू साहित्य मी चर्चा,
तू खालचा मी वरचा ;) :-P :-D
तू कला मी दालन,
तू लालन मी पालन ;)
तू आकार मी ऊकार,
तू नकार मी होकार :)
तू उरला मी सुरला,
मी कुर्ला तू पार्ला ;)
तू फूल मी दाणी,
मी रुपये तू नाणी :-P
तू वही मी वाट,
तू सारी मी पाट :)
तू पंखा मी पाते,
तू दळण मी जाते :-)
तू चल मी चित्र,
तू फुल मी पात्र :-P :-D
तू मिक्सर मी ग्राइंडर,
तू सखाराम मी बाइंडर !
कलश कांत ..आहो एकाच पोश्टात मांडाकी आपल्या भावना
का शतकवीर ठरायचय??
In reply to कलश कांत ..आहो एकाच पोश्टात by जेनी...
चालू द्यात की.. काही पो टाकतात तर काही लेंड्या. आवड ज्याची त्याची..
In reply to काय हे, पूजाबै.. by चिगो
=)) =))
In reply to काय हे, पूजाबै.. by चिगो
तू पोगो मी लोगो,
तू चिगो मी ईगो :-D :-P ;) :)
तू रण मी शिंग,
तू कण मी भिंग !
तू हाव मी भाव,
तू अभाव मी प्रभाव !
तू नेल मी कटर
मी अमूल तू बटर :-P
तू गुड मी बेटर
तू लव मी लेटर ;)
तू नंदन मी कुंदन
तू चंदन मी वंदन !
तू विक्रम मी वेताळ,
मी आकाश तू पाताळ :-D
तू रास मी लीला
तू मून्नी मी शीला :-P
तू राज मी गादी
मी नर तू मादी ;)
तू आरोप मी प्रत्यारोप
तू निरोप मी समारोप :)
तू आरोप मी प्रत्यारोप
तू निरोप मी समारोप :)
तू वर मी माला
तू मधू मी बाला :)
तू घास मी लेट
तू पाप मी लेट :-P
तू घात मी अपघात
तू आघात मी प्रघात :)
तू देश मी विदेश
तू आदेश मी संदेश :)
तू दर मी आदर
तू ब्रदर मी फादर !
तू यम मी नियम
तू संयम मी कायम !
या धाग्याच आयुष्य किती माहीत