मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही · · जे न देखे रवी...
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ. शुचिताई यांचे आहे. तू कूक मी स्नेही तू बूक मी वही तू गप मी चूप तू तेल मी तूप तू नेहरू मी शास्त्री तू कूक मी पॅस्ट्री तू ताई मी आप्पा तू मम्मी मी पप्पा.. तु कोको मी कोफी, तु केक मी साकी. तू स्नेही मी कूक तू लाही मी दूध तु एक्वाफिना, मी बिसलेरी तु अमुल बटर, मी देसी घी तु सीएस, मी सीए तु बीएमएस, मी एमबीए मी गूळ, तू गुळांबा मी भीम तू हिडींबा तू पंडित मी काझी तू मनमोहन मी सारकोझी तू जावा मी डॉट नेट तू हवा मी ईथरनेट. मी प्लग तू सॉकेट तू उपग्रह मी रॉकेट तू चिकु मी अंजीर तू चाकु मी खंजीर. तू बाकरवडी मी हलवा तू खोताची वाडी मी कळवा तू कीबोर्ड मी माऊस तू ढग मी पाऊस... तु कोकण, मी कॅलिफोर्निया तु पोखरण, मी अणुमॅनिया! तू खव मी व्यनि तू बोका मी मनी तु अ‍ॅरिस्टोटल मी प्लुटो, तु माओ, मी हुन जिंन्तओ. तू तात्या मी नाना तू *त्या मी शाना. तू वसई मी विरार तू पारई मी लोहार. तू कानपूर मी नागपूर तू करीना मी कपूर तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु विसा, मी मास्टर कार्ड तु हेल्थी, मी जाड फार! तू मुंबई मी बंगलोर तू दुबई मी लाहोर. तु देना मी एसबीआय तु प्रतारणा, मी करु काय? तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु शिवनेरी मी ऐरावत, तु एसबीआय मी स्टँर्डड चाटर्ड! तु ताट मी वाटी मी कोकनी आन तु घाटी तु मथुरा मी काशी मी विंग्रजी तु देशी मी कॅसेट तु खरखर तु मायबोली मी मिपाकर तु समाधी, मी ब्रम्हानंदी, तु संन्यासी, मी बैरागी तू एक टन मी दोन टन तू हिलरी मी क्लिंटन मी भाउ तू मामा तू रिकामा मी ओबामा. तू नोकिया मी सोनी तू गोणपाट मी गोणी तु मोबाईल मी बेसिक फोन, तु मंजुळ, मी रुड टोन! तू याहु मी गुगल तू आळस मी मरगळ तु मयाक्रोसोफ्ट मी अ‍ॅपल, तु मिसळपाव, मी मनोगत तु बीअर मी ओपनर तु 'साहिल' मी झमझम! तू फियाट मी फरारी. तू मनमोहन मी झरदारी. (अर्थात कोणी कुठली ओळ लिहीली ही माहीती आम्ही जाणीवपुर्वक गोपनीय ठेवली आहे.) विनंती: रसिक वाचकांनी यात अजुन भर घातल्यास आम्हाला विशेष आनंद होईल! -- मिसळपाव खरडफळा श्री. इंटरनेटस्नेही.

वाचने 30590 वाचनखूण प्रतिक्रिया 86

In reply to by पैसा

गणेशा Fri, 09/24/2010 - 21:26
धागा मस्त काढलाय हो - पैसा जी आपला रिप्लाय ही मस्त हे पण कसे वाटते आहे .. ? -- तु मिसळ मी पाव तु शब्द मी घाव तु पैसा, मी रोकड तु सुरी, मी बोकड

अथांग Sat, 09/25/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा Sat, 11/03/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

चौकटराजा Sat, 11/03/2012 - 18:38
तू " काय? " मी " हाय !" तू वाउ मी बाउ

कलश Sat, 11/03/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश Sat, 11/03/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके Sun, 11/04/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी Sat, 11/03/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल Sat, 11/03/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... Sun, 11/04/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर Sun, 11/04/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. Sun, 11/04/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम Sun, 11/04/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...

कलश Sun, 11/04/2012 - 17:05
तू कडू मी गोड, तू बंदा मी मोड ;)