मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही · · जे न देखे रवी...
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ. शुचिताई यांचे आहे. तू कूक मी स्नेही तू बूक मी वही तू गप मी चूप तू तेल मी तूप तू नेहरू मी शास्त्री तू कूक मी पॅस्ट्री तू ताई मी आप्पा तू मम्मी मी पप्पा.. तु कोको मी कोफी, तु केक मी साकी. तू स्नेही मी कूक तू लाही मी दूध तु एक्वाफिना, मी बिसलेरी तु अमुल बटर, मी देसी घी तु सीएस, मी सीए तु बीएमएस, मी एमबीए मी गूळ, तू गुळांबा मी भीम तू हिडींबा तू पंडित मी काझी तू मनमोहन मी सारकोझी तू जावा मी डॉट नेट तू हवा मी ईथरनेट. मी प्लग तू सॉकेट तू उपग्रह मी रॉकेट तू चिकु मी अंजीर तू चाकु मी खंजीर. तू बाकरवडी मी हलवा तू खोताची वाडी मी कळवा तू कीबोर्ड मी माऊस तू ढग मी पाऊस... तु कोकण, मी कॅलिफोर्निया तु पोखरण, मी अणुमॅनिया! तू खव मी व्यनि तू बोका मी मनी तु अ‍ॅरिस्टोटल मी प्लुटो, तु माओ, मी हुन जिंन्तओ. तू तात्या मी नाना तू *त्या मी शाना. तू वसई मी विरार तू पारई मी लोहार. तू कानपूर मी नागपूर तू करीना मी कपूर तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु विसा, मी मास्टर कार्ड तु हेल्थी, मी जाड फार! तू मुंबई मी बंगलोर तू दुबई मी लाहोर. तु देना मी एसबीआय तु प्रतारणा, मी करु काय? तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु शिवनेरी मी ऐरावत, तु एसबीआय मी स्टँर्डड चाटर्ड! तु ताट मी वाटी मी कोकनी आन तु घाटी तु मथुरा मी काशी मी विंग्रजी तु देशी मी कॅसेट तु खरखर तु मायबोली मी मिपाकर तु समाधी, मी ब्रम्हानंदी, तु संन्यासी, मी बैरागी तू एक टन मी दोन टन तू हिलरी मी क्लिंटन मी भाउ तू मामा तू रिकामा मी ओबामा. तू नोकिया मी सोनी तू गोणपाट मी गोणी तु मोबाईल मी बेसिक फोन, तु मंजुळ, मी रुड टोन! तू याहु मी गुगल तू आळस मी मरगळ तु मयाक्रोसोफ्ट मी अ‍ॅपल, तु मिसळपाव, मी मनोगत तु बीअर मी ओपनर तु 'साहिल' मी झमझम! तू फियाट मी फरारी. तू मनमोहन मी झरदारी. (अर्थात कोणी कुठली ओळ लिहीली ही माहीती आम्ही जाणीवपुर्वक गोपनीय ठेवली आहे.) विनंती: रसिक वाचकांनी यात अजुन भर घातल्यास आम्हाला विशेष आनंद होईल! -- मिसळपाव खरडफळा श्री. इंटरनेटस्नेही.

वाचन 30588 प्रतिक्रिया 0