मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<रडारड>

पिवळा डांबिस · · जनातलं, मनातलं
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... प्रस्थापितांबरोबर तरी जपून प्लीज!" "काही नाही होत हो... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "बघ तरी तुला सांगत होतो... जपून, जपून." "होय हो! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी." "आता समजून काय उपयोग! त्या दिवशी तुला समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच मिपावर येऊन तुझी वाट बघत बसायची अंतहीन पाळी नसती आली माझ्यावर, टार्‍या!!!!" :(

वाचने 8864 वाचनखूण प्रतिक्रिया 29

Nile गुरुवार, 09/13/2012 - 01:36
ही पण ष्टोरी वळकीची वाटतीए! फक्त 'अंताचा' भाग सोडून. ;-)

राजेश घासकडवी गुरुवार, 09/13/2012 - 03:59
विडंबन भारी जमलेलं आहे. टाऱ्या गेल्यापासून मिपा थोडं बदललं हे मान्यच करायला हवं. (एके काळी सागुतीच काय, खिमा झालेला) व्यर्थेश कळबडवी

In reply to by नंदन

श्रावण मोडक गुरुवार, 09/13/2012 - 12:04
तरीच हल्ली मला पश्चिम किनाऱ्याकडून सारखे 'दिन गेले भजनाविन सारे...' हे पद सारखं ऐकू येतंय राव. ;-) त्यात पश्चिम ही मुक्तीची दिशा (असं आमचे बाळासाहेब (मंगेश्शकर) सांगून गेले आहेत). म्हणजे जे ऐकू येतंय ते खरंच असावं. ;-)

In reply to by श्रावण मोडक

नंदन गुरुवार, 09/13/2012 - 12:53
पश्चिम ही मुक्तीची किंवा उन्मुक्तीची दिशा हे खरंच. पण यात काही आमचा 'वेस्टे'ड इंट्रेष्ट मुदलातच (किंवा इंट्रेष्ट असल्याने मुदलावर) नाही हो :).

In reply to by नंदन

रमताराम गुरुवार, 09/13/2012 - 21:34
हा बाबा माणसांसारखा का बोलत नाही? हे असं अव्यक्तातून व्यक्त होण्याची काय गरज?

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/13/2012 - 14:45
=)) दंडवत! आणि अक्षरशः शेवटच्या शब्दापर्यंत सहमत! ;) *** टार्‍याचा संदर्भ असल्यामुळे रडारड हे नाव शोभत नाही हां... तोडातोड (दात, हाडे इ.) किंवा फोडाफोड असं काही तरी नाव पाहिजे ब्वॉ! ;)

पैसा गुरुवार, 09/13/2012 - 21:14
पिडां स्पेशल! "उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या" ची आठवण झाली. पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे! ० कैसा ०

In reply to by पैसा

Nile गुरुवार, 09/13/2012 - 21:28
पण टारबाचा संदर्भ असल्यामुळे रडारड ही टारबाची नाही तर त्याचे टार्गेट ठरलेल्यांची असावी असा संशय आहे!
चुकलं, चुकलं, संपादिकाबाई. (संपादकांचं नेहमीच कसं चुकतं, हीच तर (आमची रडा)रड आहे!) ;-) पळा....

सोत्रि गुरुवार, 09/13/2012 - 21:43
पिडाकाका, जबरदस्त! दंडवत स्विकारा! _/\_ - ( मिपावर येऊन वाट बघत बसणारा) सोकाजी