विषय तसा थोडा नाजुकच. कितीही टाळायचा म्हटला तरी कधी ना कधी त्याला तोंड द्यावे लागणारच याची कल्पना ही होती. पण म्हणुन ती वेळ इतक्यातच येउन ठेपेल असा अंदाज नव्हता.
तस पाहिलं तर मागे 'थ्री ईडियट्स' पहातानाच (टायटलमध्ये स्पर्म्सची कार्टुन रेस दाखवली आहे ती पाहुन ) हे काय म्हणुन तिनं विचारलं. परत त्याच चित्रपटात शेवट जवळ येताना जो धुमाकुळ चालु होता तेव्हा ही चेहेर्यावर बर्याच प्रश्नचिन्हांचं जाळं पसरलेलं होत. त्यावेळी काही तरी थातुर मातुर उत्तर देउन टाळलं होतं. पण नांदी तेव्हाच झाली होती.
गेल्या आठवड्यात एका सॅनिटरी नॅपकीन ची जाहिरात पाहुन बराच काळ तुंबलेला प्रश्न बाहेर आलाच. 'ह्या मोठ्या बायकापण 'डायपर' का घालतात?' त्यावर काही बायकांना कधी कधी एखादा प्रॉब्लेम असतो म्हणुन घालतात असं उत्तर देउन वेळ मारुन नेली होती.
परवा तिनं विचारलं 'बाबा, कौन्सेलिंग म्हणजे काय?' उत्तर देण्या पुर्वी नक्की कसल्या संदर्भात हा प्रश्न आहे हे कळावं म्हणुन मी विचारलं 'कुठे ऐकसलास गं हा शब्द?' तर म्हणे शाळेत नवीन तास चालु होणार आहे कौन्सेलिंगचा. मग तिला समजेल अश्या शब्दांची जुळवा जुळव करत म्हटलं की एखादी अडचण, समस्या वा न समजलेली गोष्ट समजावुन सांगणे, अडचणींवर उपाय सुचवणे म्हणजे कौन्सेलिंग. माझ्या नशिबानं बाईसाहेबांचं तेवढ्याने समाधान झालं आणि माझी सुटका झाली.
काल रात्री झोपताना तिने आईला एक बाउंसर टाकला. 'आई, बाळ आईंच्या पोटात असतं ना?'
'हो' बेसावध सौ उत्तरली.
'मग ते बाहेर येत कुठुन?'
रात्री पांघरुणात शिरण्याची वेळ, त्यात परत सकाळी तांबडं फुटायच्या आत उठायच. शिवाय हा विषयही काही २ मिनिटांत संपणारा नव्हता. त्यामुळे उद्या बोलु आता उशीर झालाय अशी बोळवण करत सौनी झोपण्याचे आदेश दिले. पण लेकीचं समाधान झालं नाही. मग नाईलाजाने म्हणाली 'जाऊ दे. उद्या कौन्सेलिंगच्या तासाला सरांनाच विचारते.'
तिचा तो आवेश पाहुन त्या सरांचा कावरा बावरा झालेला चेहेरा सौच्या डोळ्या पुढेच उभा राहिला. आता हे कुतुहल दडपण्यात अर्थ नाही हे सौला उमजुन चुकलं. झालं... परत मनातल्या मनात शुब्दांची जुळवा जुळव करत बायको म्हणाली. 'आईंच्या पोटात एक पिशवी असते. बाळ त्या पिशवीत असतं. त्या पिशवीला एक ओपनींग असतं, अन योग्य वेळ झाली की त्यातुन बाळ बाहेर येत. आता हेच बघ आपला घाम बाहेर येण्यासाठी कशी त्वचेला लहान लहान भोकं/ पोअर्स असतात की नाही, तसचं काहीसं.'
"पण हे ओपनींग नक्की असते कुठे?" हे लेकीचं पालुपद सारखं चालुच होतं. तिचं कुतुहल काही शमे ना.
किती ही टाळायचं म्हटलं तरी ही हे बुमरँग टाळता येण्या सारखं नव्हतं. शेवटी सौंनी शरणागती पत्करली आणि खरं खरं काय ते सांगण्याचं ठरवलं.
अश्या प्रकारे आमच्या घरात 'सेक्स एज्युकेशनचा' धडा पहिला गिरवायला घेतला आहे.
आता 'ते बाळ आत जातच कसं?' हा पुढचा प्रश्न लवकरच येणार असल्याची पुर्ण खात्री असल्याने त्या दिशेनेही उत्तरांची जुळवा जुळव चालु आहे. जर तुमच्या पैकी कुणी या अश्याच प्रश्नांना सामोरं गेलं असेल तर त्या बद्दल जाणुन घ्यायला नक्की आवडेल.
वाचने
36972
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
कठिण आहे...
बाप रे बाप फारच कठीण काम आहे
कठिण नाही.
धडा पहिला गिरवीन......
या विषयावर एक पुस्तक
हाण्ण!
In reply to या विषयावर एक पुस्तक by चित्रगुप्त
गणपा, उगाच लपवालपवी वा उत्तरे
खरयं. सध्या तोच मार्ग अवलंबला
In reply to गणपा, उगाच लपवालपवी वा उत्तरे by यशोधरा
मला सांग साध सोप अन वयाला
In reply to खरयं. सध्या तोच मार्ग अवलंबला by गणपा
वर्गात किती जागा आहेत? अजून
आमच्या कडेही आज ना उद्या हे
अभिनंदन
आमच्या लेकीने ५ वर्षाची
शेजारचा ३ वर्षांचा
...
कौन्सेलिंग म्हणजे समुपदेशन! -
In reply to ... by विकास
आवश्यकता.
प्रसार माध्यम काका
In reply to आवश्यकता. by प्रभाकर पेठकर
सेक्स एज्यूकेशन.
In reply to प्रसार माध्यम काका by स्पंदना
काका ,ज्या प्रश्नांची
In reply to सेक्स एज्यूकेशन. by प्रभाकर पेठकर
सर्वच गोष्टी लहानपणी कळत
In reply to सेक्स एज्यूकेशन. by प्रभाकर पेठकर
गैरसमज नसावा.
In reply to सर्वच गोष्टी लहानपणी कळत by नाना चेंगट
प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न..
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
शेवटचा प्रतिसाद.
In reply to प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.. by आनंदी गोपाळ
ज्या स्त्रिया केवळ
In reply to प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.. by आनंदी गोपाळ
बाकी या पाश्च्यात्यांना कैपण
In reply to ज्या स्त्रिया केवळ by नाना चेंगट
पाश्चात्यांना नावे
In reply to बाकी या पाश्च्यात्यांना कैपण by बॅटमॅन
या निषेधाचा
In reply to पाश्चात्यांना नावे by नाना चेंगट
>>>च्च च्च च्च ...... माझा
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
एवढ्या लहान वयात 'ह्या'
In reply to आवश्यकता. by प्रभाकर पेठकर
पुढारलेली पिढी...
In reply to एवढ्या लहान वयात 'ह्या' by गणपा
............. तर ह्या बौद्धीक
In reply to पुढारलेली पिढी... by प्रभाकर पेठकर
समजाविणे महत्त्वाचे.
In reply to ............. तर ह्या बौद्धीक by गणपा
माफ करा,
In reply to पुढारलेली पिढी... by प्रभाकर पेठकर
चाईल्ड अॅब्युजचा
In reply to माफ करा, by आनंदी गोपाळ
पुस्तके...
एक जोक आठवला...
(No subject)
याबाबतीत आमचे हे काही
:)
हे काही पटले नाही. मुलांना
In reply to :) by रामपुरी
आमच्या लहान पणी असे
आमच्या लहान पणी असे
In reply to आमच्या लहान पणी असे by llपुण्याचे पेशवेll
नक्की काय म्हणायचंय?
In reply to आमच्या लहान पणी असे by नाना चेंगट
जसा तुमचा चश्मा असेल तसे
In reply to नक्की काय म्हणायचंय? by आनंदी गोपाळ
मला वाटतं ,तीला जे आहे ते
काळ तर मोठा कठीण आला आहे.
सहसा
अबे...
In reply to सहसा by परिकथेतील राजकुमार
असंच काही नाही अगदी! तू
In reply to सहसा by परिकथेतील राजकुमार
याचाच अर्थ
आमच्या वेळेस 'वयात येताना' हे
ओव्हर फ्रॅन्कनेस !! काही
काकाश्रींशी सहमत ! निसर्ग हा
निसर्ग हा सर्वात मोठा गुरु
In reply to काकाश्रींशी सहमत ! निसर्ग हा by मदनबाण
अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख,
In reply to निसर्ग हा सर्वात मोठा गुरु by बॅटमॅन
समाज काय हेच करायला बसलाय का ?
In reply to अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, by मदनबाण
आजच्या घडीला याच मानवाने या
In reply to अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, by मदनबाण
मला तरी लैगिक शिक्षण निसर्गातूनच मिळाले.
सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे
=)) =)) =))
In reply to सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे by सुहास..
हा धागा मिपावर टाकावा की नाही