सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं.
अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.
वेळ वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. `काल' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न.
____________________
या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. कालरहितता हा सिद्धत्वाचा गुणविषेश मानला गेलाय आणि कालमुक्तीला असाधारण महत्त्व आहे. इटर्निटी जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही.
___________________
अस्तित्वात प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांचा कालावधी मोजण्यासाठी आपण काल हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कालाचा सतत वापर करतो त्यामुळे काल वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये.
______________________
वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो.
वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी वेळ गाठताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो.
वेळ कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात.
________________________
वेळ भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: `कालाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अकाल आहोत! ज्याला काल भास आहे हे कळलं त्याच्यावर कालात घडणार्या घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो.
शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं
आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की `वय' शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि उत्तररंग देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू!
शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, शारीरिक वयाचा आपल्यावर चित्तस्थितीवर परिणाम होत नाही.
_______________________
वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणार्या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो, साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे.
वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशावरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते.
____________________
कालरहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, वेळेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं.
अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही.
टाईम फ्रस्टेट करणारा अवकाश परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च अवकाश होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय!
_____________________
पैसा निदान कल्पना तरी आहे पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा.
जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है!
जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
वाचने
41734
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
२ दा वाचलं...
हा हा हा
सध्या छान लिहिलय,इतकच
डु का टा आ
शरीराची निर्मिती कालात आहे
>"आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे
In reply to शरीराची निर्मिती कालात आहे by नगरीनिरंजन
वाद घालायचा म्हणून नाही, पण
In reply to >"आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे by संजय क्षीरसागर
सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको.
In reply to वाद घालायचा म्हणून नाही, पण by नगरीनिरंजन
"साक्षात्कार" म्हणजे काय...
In reply to सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. by संजय क्षीरसागर
मी काय म्हणतो, `कालशून्यता हा सिद्धत्वाचा गुणविषेश आहे'
In reply to "साक्षात्कार" म्हणजे काय... by चित्रगुप्त
तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात
In reply to सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. by संजय क्षीरसागर
आपलं असणं याला काय पुराव्याची गरज आहे?
In reply to तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात by नगरीनिरंजन
तुम्ही म्हणालात शरीर जाणवते
In reply to आपलं असणं याला काय पुराव्याची गरज आहे? by संजय क्षीरसागर
तुमच्या एक लक्षात येतय का?
In reply to तुम्ही म्हणालात शरीर जाणवते by नगरीनिरंजन
धन्यवाद
In reply to तुमच्या एक लक्षात येतय का? by संजय क्षीरसागर
ननि... फार सुंदर बोललास..
In reply to धन्यवाद by नगरीनिरंजन
गोल्डफिशसमोर ऑप्शन आहे ना...
In reply to ननि... फार सुंदर बोललास.. by गवि
गवि, स्टिफनचं म्हणणं मान्य करुन तुम्ही जगा, आनंद आहे
In reply to ननि... फार सुंदर बोललास.. by गवि
क्लास्सिक
In reply to धन्यवाद by नगरीनिरंजन
अगदी अगदी.. +१०००००००
In reply to क्लास्सिक by मन१
एक ओबड धोबड थेअरी :)
In reply to वाद घालायचा म्हणून नाही, पण by नगरीनिरंजन
ठोकाठोकी
In reply to एक ओबड धोबड थेअरी :) by अर्धवटराव
गोडेल, इशर, बाख या पुस्तकात
In reply to ठोकाठोकी by नगरीनिरंजन
अल्गोरिदम तर आहेच !!
In reply to ठोकाठोकी by नगरीनिरंजन
मजा सांगतो. फ्री विल हा
In reply to अल्गोरिदम तर आहेच !! by अर्धवटराव
हा थेरम लिमेटेड आहे !!
In reply to मजा सांगतो. फ्री विल हा by बॅटमॅन
मान्य की. पण स्ट्राँग फ्री
In reply to हा थेरम लिमेटेड आहे !! by अर्धवटराव
त्याचं कसं आहे...
In reply to मान्य की. पण स्ट्राँग फ्री by बॅटमॅन
भौतिकशास्त्र हे स्पेस व
In reply to त्याचं कसं आहे... by अर्धवटराव
हा हा हा
In reply to भौतिकशास्त्र हे स्पेस व by बॅटमॅन
दर बिग बँग च्या वेळी हे
In reply to हा हा हा by अर्धवटराव
सुंदर, मननीय लेख.
धन्यवाद!
In reply to सुंदर, मननीय लेख. by चित्रगुप्त
काहीही कळले नाही !
+१. शब्द शब्द शष्प शब्द....
In reply to काहीही कळले नाही ! by विटेकर
मग ते सोपं करुन सांगा ना...
In reply to काहीही कळले नाही ! by विटेकर
>>यापेक्षा भूक लागली की जेवण
आयला...
In reply to >>यापेक्षा भूक लागली की जेवण by अर्धवट
एक प्रश्न...
काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे
???
In reply to काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे by संजय क्षीरसागर
प्रामाणिक पणे प्रश्न विचारला..
In reply to ??? by अर्धवटराव
>प्रथम मनःपूर्वक वाचावं
In reply to काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे by संजय क्षीरसागर
शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर
शरीराचा त्रास तिथेच कसा
In reply to शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर by शिल्पा ब
काळ आणि पैसा
सदस्यहो!
?
In reply to सदस्यहो! by संजय क्षीरसागर
यात कुठेय सर्क्युलरायझेशन?
In reply to ? by नितिन थत्ते
दिवस व रात्र होणे म्हणजेच तर
In reply to यात कुठेय सर्क्युलरायझेशन? by संजय क्षीरसागर
`काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा
In reply to सदस्यहो! by संजय क्षीरसागर
सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात...
सर,सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात हे मंजूर आहे
In reply to सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... by चित्रगुप्त
एक डाव धोबीपछाड
कालपर्यंत आपण काल शिकलो, आणि काल आहे या मान्यतेत जगलो
In reply to एक डाव धोबीपछाड by चैतन्य दीक्षित
हे सारं कशासाठी?
काल भास आहे की सत्य
खरंय!
In reply to काल भास आहे की सत्य by आत्मशून्य
@ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे
In reply to खरंय! by राघव
@राधव = तेच तर सांगतोय, तुम्ही काल
In reply to @ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे by संजय क्षीरसागर
लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं?
In reply to @राधव = तेच तर सांगतोय, तुम्ही काल by आत्मशून्य
कोणतीही लोकल चालणार असेल तर दडपण कसं येईल?
In reply to लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं? by संजय क्षीरसागर
माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे
In reply to @ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे by संजय क्षीरसागर
सुंदर !!
In reply to माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे by राघव
@राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं
In reply to माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे by राघव
हे फक्त बुद्धीभेद करणं आहे,
In reply to @राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं by संजय क्षीरसागर
मी सत्य आणखी दहा प्रकारे
In reply to @राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं by संजय क्षीरसागर
बर्याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्या वाटतात...
आहो, वेळ भास आहे ही गोष्ट प्रत्यक्ष आचरणात आणायला काहीही धोका
In reply to बर्याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्या वाटतात... by चित्रगुप्त
डेडलाईन..................?
In reply to आहो, वेळ भास आहे ही गोष्ट प्रत्यक्ष आचरणात आणायला काहीही धोका by संजय क्षीरसागर
घड्याळ न वापरणे
कालज्जयी आपण आहोतच!
In reply to घड्याळ न वापरणे by चित्रगुप्त
तुमच्या लक्षात येतय? इथले
In reply to कालज्जयी आपण आहोतच! by संजय क्षीरसागर
दर वेळी `किती वाजले'
In reply to कालज्जयी आपण आहोतच! by संजय क्षीरसागर
काल
प्रक्रिया भास नाहीये हो, ती वस्तुस्थिती आहे
In reply to काल by नितिन थत्ते
:(
In reply to प्रक्रिया भास नाहीये हो, ती वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
वीणा३
>आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा
In reply to वीणा३ by वीणा३
त्याचं काय ए की जर काळ
In reply to >आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा by संजय क्षीरसागर
"खरे" म्हणजे काय, आणि "भास" म्हणजे काय
वर्षातले उत्पन्न
हीच तर मजाये ना!
In reply to वर्षातले उत्पन्न by नितिन थत्ते
माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण
In reply to हीच तर मजाये ना! by संजय क्षीरसागर
+१. मस्त मुद्देसूद चिरफाड.
In reply to माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण by आत्मशून्य
+२
In reply to +१. मस्त मुद्देसूद चिरफाड. by बॅटमॅन
कालक्रमण आणि कालापव्यय
सर पतंग तर लै वर नेला तुम्ही
In reply to कालक्रमण आणि कालापव्यय by चित्रगुप्त
काळाची भीती, टेन्शन घेऊ नका
आहो, काळ भास आहे हे नुसतं कळलं की भीती गेली!
In reply to काळाची भीती, टेन्शन घेऊ नका by नितिन थत्ते