दही खस्ता कचोरी
साहित्य कचोरीचे आवरणः
१ वाटी मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तेल
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
बर्फाचे पाणी कणीक भिजवण्यासाठी (रवा आणी गार पाण्यामुळे कचोर्या खुसखूशीत होतात)
पाकृ कचोरी:
मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करावे.
तळहातावर थोडे तेल लावून घेणे.
एक गोळा घेऊन चपटा करून त्याची पारी तयार करुन घ्यावी.
त्यात चमच्याने सारण भरून, कडा उचलून बंद करून घ्याव्यात.
हलकेच तळहाताने चपटे करावे. (मी कचोर्या अजिबात लाटत नाही , नाहीतर त्या फुगत नाही तळताना)
अश्याच सगळ्या कचोर्या तयार कराव्यात.
तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे.
एक एक करून कचोर्या तेलात सोडाव्यात व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.
साधारण ७-८ मिनिटे लागतात.
कचोर्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत.
सर्व्हिंगः
तयार कचोर्या, पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही ( दह्यात चवीनुसार मीठ, साखर घालून फेटणे. त्यात जीरेपूड व लाल तिखट भुरभुरावे)
बारीक चिरलेली कोथींबीर,
बारीक शेव
वाचने
20859
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
हे असले फोटो दाखवुन आम्हाला जळवल्याबद्दल देवबाप्पा तुम्हाला नक्कीच शिक्षा करेल
सुंदर छायाचित्रे व पाकृ.
"डेरी फारम" छाप दुकानातून मिळणारा ,हा पदार्थ घरी करता येईल असे नव्हते वाटले.
आजच पांडेजी कडे जायला हवे.
माझा आवडता पदार्थ. बाकी सगळंच म्हणजे कृती , फोटो नेहमीप्रमाणे झक्कस !!!
नो "खस्ता "कचोरी असं नाव हवं होतं ;-)
कृती मस्त आहेच, पण पहिल्या क्रमांकाचा फोटो खूप छान...
अगदी दुकानातल्या कचोर्यांना लाजवतील अश्या.
पावसाळी वातावरणात भुकेच्या वेळी हे असले फोटो नका दाखवत जाऊ... :)
घरी करेन तेव्हा करेन पण आज मात्र हापिसातुन घरी जातांना कचोरी पार्सल घेऊन जाणार...
पहिला फोटो एकदम कडक... :)
मार डाला !!!!
कसल्या जबर्या दिसताहेत यम्म्मीईईईईईईईईईईईईईईईईई :)
पाककृती अन छायाचित्रे पण.
अवांतर -फार खस्ता खाव्या लागतात का हो ह्या कचोऱ्या बनवताना?
मस्तच
रेसीपी वाचली.
शेवटचा फोटो बघितला.
सगळ विसरुन गेलो.


वॉव!!
फोटो तर एकदम प्रोफेशनल वाटले..
कचोरीत नंतर दही,चटणी,शेव हे सगळं आत भरायचचं असल्याने.. आधीचं मुगाच्या डाळीचं सारण नसलं तरी चालेल अस वाटलं..
सदेह खस्ता झालेलो आहोत.
जमल्यास 'चिंच खजुराची चटणी ' पाकृ व्यनी / खरड करावी. इथे अज्जीबात देऊ नये. चार नादान माणसे चार अजून काहीतरी सुधारणा सुचवतात आणि सगळ्याची माती करतात.
मार डाला!! _/\_
जेवण झाल्यावर सुद्धा बादलीभर लाळ गळली.
असो.
बाकी नेहमीप्रमाणेच.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
फटू पाहून नाना सदेह स्वर्गात गेला
.
कचोरी मस्तच ग, पहिला फोटो तर.. अहाहा..
स्वाती
मस्तच.
माझा आवडता पदार्थ.नक्की करणार.
पाककृती मस्त आहेच, पण फोटो त्याहुनही मस्त ! :smile:
मस्त मस्त..
हा धागा वाचण्यात आला आहे याची नोंद.
मस्त, पहिलाच फोटो खल्लास !
:)
दिल खल्लास आणि मी स्वर्गात.... ;)
खुप मस्त ..... :)
अमोल केळकर
काय मस्त फोटो आहेत! पाणी सुटलं तोंडाला! मस्त!
धन्य आहेस सानिका!
पहिला फोटू भारी आलाय.
पाकृही छान सांगितलीस.
In reply to धन्य आहेस सानिका! पहिला फोटू by रेवती
जबरदस्त!!! कातील.
खत्रा कचोरी आहे!
जेवणाच्या वेळी असले फोटो दाखवून जळवल्याबद्धल तुमचं घर उन्हात बांधायला सांगणार!
नेमका आजच संध्याकाळी कर्वे पुतळ्या जवळचा माझा फेवरिट ,याच स्टाइलचा दहि/चटणी/शेव टाकलेला कट पॅटिस खाल्ला. ही कचोरी त्यापेक्षा कातिल लागणार यात शंका नाही. :-)
अतिशय सुंदर्,,,,नेहमीप्रमाणेच
मस्त. एव्हढा संयम , पुरा दिवस जाइल माझा तर. पण घरच्या खाण्याची चवच वेगळी.
मस्त सानिका, खरच मस्त.
कचोरी मला आवडत नाही, पण फोटो अप्रतिम देखने आलेत!
ओए होए!
मर जावा कचोरी खाके!
फोटो पाह्यले.. :)
क्या बात है ..........मस्त !!!!! एकदम मस्त.
सानिकातै,
मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून येऊ का थोडे दिवस.. :)
भन्नाट फोटु आणि पाकृ..
व्वा..! 'खस्ता' कचोरीसाठी फार काही खस्ता खाव्या लागत नाहीतसे दिसते आहे.
लवकरच करून पाहावी (आणि खावी) असा विचार करतो आहे.
अभिनंदन.
पहिला आणि शेवटचा फोटो जीवघेणा आहे !! :)
अत्यंत आवडीचा प्रकार आहे हा.
त्यात सादरीकरण आणि सजावट पाहून या पाकृवर फिदा झालेलो आहे. वाचनखूण साठवत आहे.
-वर्धमानसमोरच्या रगडाकचोरीच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला
मस्तच दिसते कचोरी, फोटो मस्तच.
सानिका,
वर दिलेल्या प्रमाणात किती कचो-या होतात?
हे असले फोटो दाखवुन