साहित्य कचोरीचे सारणः
१ वाटी पिवळी मुगाची डाळ चांगली धुवून, ४ तास भिजवून, निथळून घेणे
दीड टीस्पून लाल तिखट
(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून भरडसर धणेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१ टीस्पून जीरेपूड
१/२ टीस्पून गरम-मसाला
१/२ टीस्पून आमचुर पावडर
मीठ चवीनुसार
कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल
पाकृ:
डाळ मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी.
(पाणी अजिबात घालायचे नाही)
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता घालावा.
तो तडतडला की त्यात वाटलेली डाळ घालून मंद आचेवर परतावी.
झाकून वाफेवर ५-७ मिनिटे शिजु द्यावी.
शिजलेली डाळ हळू-हळू कोरडी होऊन मोकळी होऊ लागेल.
त्यात लाल तिखट, धणेपूड, जीरेपूड, गरम - मसाला, बडीशेप पावडर, आमचुर पावडर व मीठ घालावे.
चांगले एकत्र करून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे .
बारीक चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
तयार सारण एका ताटात काढून ते गार होऊ द्यावे.
साहित्य कचोरीचे आवरणः
१ वाटी मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तेल
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
बर्फाचे पाणी कणीक भिजवण्यासाठी
(रवा आणी गार पाण्यामुळे कचोर्या खुसखूशीत होतात)
पाकृ:
मैदा, रवा , ओवा, मीठ व तेल एकत्र करावे. बर्फाच्या पाण्याने कणीक भिजवावी.
कणीक फार घट्ट किंवा सैल मळू नये, मध्यम सैल भिजवावी.
झाकून १५-२० मिनिटे ठेवावी.
पाकृ कचोरी:
मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करावे.
तळहातावर थोडे तेल लावून घेणे.
एक गोळा घेऊन चपटा करून त्याची पारी तयार करुन घ्यावी.
त्यात चमच्याने सारण भरून, कडा उचलून बंद करून घ्याव्यात.
हलकेच तळहाताने चपटे करावे.
(मी कचोर्या अजिबात लाटत नाही , नाहीतर त्या फुगत नाही तळताना)
अश्याच सगळ्या कचोर्या तयार कराव्यात.
तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे.
एक एक करून कचोर्या तेलात सोडाव्यात व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.
साधारण ७-८ मिनिटे लागतात.
कचोर्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत.
सर्व्हिंगः
तयार कचोर्या, पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही
( दह्यात चवीनुसार मीठ, साखर घालून फेटणे. त्यात जीरेपूड व लाल तिखट भुरभुरावे)
बारीक चिरलेली कोथींबीर,
बारीक शेव

कचोरीला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे.
त्यावर चमचाने भोक पाडून त्यात पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही घालावे.
वरून बारीक चिरलेली कोथींबीर व शेव भुरभुरावी.

चटपटीत दही खस्ता कचोरी खाण्यासाठी तयार आहे :)
नोटः
आवडत असल्यास ह्यात कच्चा कांदा ही घालू शकतो.
खस्ता कचोरी नुसत्या चिंचेच्या चटणीसोबत ही सर्व्ह करु शकता.