मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
.
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          - गंगाधर मुटे
---------------------------------

वाचने 2087 वाचनखूण प्रतिक्रिया 11

गंगाधर मुटे 04/06/2012 - 21:21
सर्व प्रतिसादकांचे मनपूर्वक धन्यवाद. :) मला सुरुवातीला प्रश्न पडला होता. धमासान की घमासान ध की घ? घ चा ध झाला तर चालेल पण चुकून ध चा घ झाला तर निष्कारण तो ऐतिहासिक दस्तावेज तयार व्हायचा. ;) कृपया धमासान ऐवजी घमासान असे वाचावे. :)