Skip to main content

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 28/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
.
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          - गंगाधर मुटे
---------------------------------
लेखनविषय:

वाचने 2089
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

आवडली.

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते हे कडवे नाहि उमगले. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

कशाला 'अभय' काल गेलास तेथे जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते असे वाचावे. तो तांत्रीक घोळ आहे.

In reply to by गंगाधर मुटे

अभय कोण्या व्यक्तीला उद्देशुन म्हणताय, कि वृत्तीला? तो कुठे गेला? तिथे क्रुद्ध होण्यासारखे काय आहे? अर्धवटराव

In reply to by गंगाधर मुटे

अभय कोण्या व्यक्तीला उद्देशुन म्हणताय, कि वृत्तीला? तो कुठे गेला? तिथे क्रुद्ध होण्यासारखे काय आहे? अर्धवटराव

सर्व प्रतिसादकांचे मनपूर्वक धन्यवाद. :) मला सुरुवातीला प्रश्न पडला होता. धमासान की घमासान ध की घ? घ चा ध झाला तर चालेल पण चुकून ध चा घ झाला तर निष्कारण तो ऐतिहासिक दस्तावेज तयार व्हायचा. ;) कृपया धमासान ऐवजी घमासान असे वाचावे. :)