मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदनबाण

जागु · · कलादालन
मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते. फुलाच रुपही तितकच मनमोहक असत. १) २) ३) ४) ५) ६) ७)
लेखनविषय:

वाचने 11443 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अमोल खरे Tue, 04/24/2012 - 15:29
मला आधी वाटलं की आपल्या मिपावरच्या मदनबाणाचे फोटो टाकलेत म्हणुन. पानांच्या आड कुठे त्याचा चेहरा दिसतोय का पाहात होतो ५ मिनिटे. बाकी फोटो मस्तच.

पियुशा Tue, 04/24/2012 - 15:37
मला वाट्ल मामुनेच( म.बा.) फोटो टाकलेत अन चुकुन शिर्षकात त्याचच नाव घातलय ;) अशा नावाच फुल असत हे आजच कळल्.मस्त आहे फोटु :) जागु तै एखादी फक्कड रेसेपीपण टाक ना :) बरेच दिवस झालेत

मदनबाण Tue, 04/24/2012 - 15:48
वा... माझ्या नावाचे सुगंधी फुल ! ;) मस्त फोटो ! :) बाकी माझ्या मदनबाण आयडी घेण्यामागची कथा याच धाग्यावर आटपुन टाकतो. जेव्हा मिपावर आलो होतो, तेव्हा अनेक फंडु फंडु आयडीज होते,मग इचार केला कंच नाव घ्याव? एक आठवडा फकस्त इचार करण्यातच घालवला... मला आयडीत ५ अक्षरेच हवी होती. मग एक व्यक्तीरेखा आठवली... अभिनेता चंदु पारखी यांनी साकारलेल्या एका व्यक्तिरेखेचे नाव मदनबाण होते,काळाच्या पडद्याआड अनेक जेष्ठ अभिनेत्यांची नावे जातात, पण त्यांची एक वेगळी आठवण राहवी म्हणुन मी हे आयडी नाम धारण केले. :) (सुगंध प्रेमी) ;)

In reply to by मदनबाण

जागु तै...नेहमी प्रमाणेच सुंदर धागा... मस्त :-) @अभिनेता चंदु पारखी यांनी साकारलेल्या एका व्यक्तिरेखेचे नाव मदनबाण होते,काळाच्या पडद्याआड अनेक जेष्ठ अभिनेत्यांची नावे जातात, पण त्यांची एक वेगळी आठवण राहवी म्हणुन मी हे आयडी नाम धारण केले. >>> मदनबाण,,, तुमच्या नावनिवडीला सलाम आपला --^--

स्मिता. Tue, 04/24/2012 - 16:43
नेहमीप्रमाणे सुंदर फुलं. कळी कुंदासारखी दिसतेय तर फुल अनंतासारखं :)

राही Wed, 04/25/2012 - 18:30
ह्या फुलाला काही ठिकाणी कस्तुरी मोगरा म्हणतात. नेहमीच्या मोगर्‍यापेक्षा तो खूपच महाग मिळतो.