‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो.
असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते. तिला सिक्थसेन्स नावाचा प्रकार अवगत असतो. केवळ नजरेच्या विभ्रमानुसार पुरुषाच्या मनातली खळबळ अन् तळमळ ती जाणू शकते. त्याला नेमकं काय ओकायचं आहे हे ती जाणतेच पण तसे न दाखवता त्या पार्टीलाही आपले सूप्त हेतू पुरुषाकडून पूर्ण करवून घ्यायचे असतात. मग ती त्याचा टाय पकडून त्याला कुत्र्यासारखे हिंडवित जाते. पुरुष बिचारा आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल या आशेवर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करीत राहतो, आपल्या शरीरातील गर्मी अन् उर्मी दोघींनाही दाबत राहतो.
प्रेमळपणाचा आव आणणे हा पुरुषाचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. पुरुष निसर्ग नियमाला धरूनच वागत असतो. फक्त व्यक्ती तितक्या प्रकृति या न्यायाने त्यात भावभावनांचे मिश्रण म्हणा किंवा डिव्होशन म्हणा असे उपप्रकार घुसडून प्रेम व्यक्त केले जाते, निभावले जाते. खरा चेहरा त्याने झाकलेलाच असतो. मग ताकाला जाऊन आपलं भांडं लपवायचं कशासाठी? सरळ सांगून टाकायचं ना- ‘कभी मेरे साथ, कोई रात गुजार...’ समोरच्या पार्टीदेखत ‘इलू इलू’ करण्यात काय अर्थ आहे. ती जर हो म्हणाली तर ठीक, नाही तर नेक्स्ट!
जे निसर्गानं बहाल केलंय त्याचा बेधडक वापर करायला हवा. आडवळणाने जाऊन वेळ कशाला घालवायचा? फटाफट सांगून मोकळं व्हायचं- ‘मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. बोल तुला मंजूर आहे की नाही?’ कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही. तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो. फार फार तर दोन तीन महिने तो नवखा भिडू ‘दम’ काढेल, नंतर मात्र आपले मनोवांछित फल प्राप्त्यर्थम कसे होईल याचीच संधी शोधीत राहील. प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. झुडपाआड लपून कुणी काही ‘सोज्ज्वळ’ प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसत नसतो. किंवा त्याला ‘एकांत’ का हवा असतो, हे समोरच्या पार्टीला कळत नाही असे समजणे चूक समजावे का म्हणून? जर तिलाही हे कळलेले असेल तर आपल्याला जे हवं ते बेधडक सांगून टाकायला कचरायचं का म्हणून?
‘पोरींना प्रेम करायला कारण लागतं तर मुलांना प्रेम करायला जागा लागते!’ ही उक्ती काही चुकीची नाही. निवांत, अंधाऱ्या, निर्जन जागा पोरींपेक्षा पोरांनाच जास्ती माहिती असतात, हे काय उगाच नाही. जंगलातल्या नवनव्या वाटा, खडकाळ आडोसे, दऱ्याखोऱ्या, अर्धवट लेण्या व गुहा, ओसाड मंदिरे, चिडीचूप माळराने अशी कितीतरी ठिकाणे पोरांच्या हिटलिस्टवर असतात ते का म्हणून?
म्हणूनच ‘प्रेमाला’ जाऊन कधीच भांडं लपवायचं नसतं. कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं?
वाचने
12620
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
समोरची पार्टि लै भारिये
In reply to समोरची पार्टि लै भारिये by जेनी...
समोरचि पार्टी भारिच वाटते
याला म्हण्तात हरीदासाची कथा
मस्तच!
In reply to मस्तच! by परिकथेतील राजकुमार
पराशी कधी नव्हे ते सहमत. डॉ.
In reply to मस्तच! by परिकथेतील राजकुमार
छान !!
तुम्हाला उपचारांची गरज आहे
:-))
फूल टू
आँ?
समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर
हम्म, वाचतोय, खरंतर या
In reply to हम्म, वाचतोय, खरंतर या by ५० फक्त
>>>एक पुरुष आणि एक स्त्री
In reply to >>>एक पुरुष आणि एक स्त्री by प्यारे१
डॉ. दिवटे भावभावनांच्या/
In reply to >>>एक पुरुष आणि एक स्त्री by प्यारे१
अनेक वर्तमानपत्रांमध्ये,
In reply to अनेक वर्तमानपत्रांमध्ये, by विश्वनाथ मेहेंदळे
हॅ हॅ हॅ...! काही सायंदैनिकं
In reply to हॅ हॅ हॅ...! काही सायंदैनिकं by प्यारे१
@ प्यारे, तुम्ही जी तुलना करत
In reply to @ प्यारे, तुम्ही जी तुलना करत by ५० फक्त
तुलना चुकीची आहे हे काही अंशी
In reply to तुलना चुकीची आहे हे काही अंशी by प्यारे१
ह्यो पाईनटाचा मुद्द्दा हाय !
प्रेमीकांचे असे हाल होऊ नयेत
In reply to प्रेमीकांचे असे हाल होऊ नयेत by अविनाशकुलकर्णी
किमान गेला बाजार हत्ती तरी
पाणी पाणी...! हाय हाय...! आग
कोण म्हणतं...
In reply to कोण म्हणतं... by सर्वसाक्षी
+१
वा डॉक्टरसाहेब..
In reply to वा डॉक्टरसाहेब.. by चिगो
म्हणजे अगदी आल्या आल्या "घाल
In reply to वा डॉक्टरसाहेब.. by चिगो
हसुन हसुन मरायची वेळ आली.
खत्त्त्त्तर्र्र्र्र्र्र्र्र्र
काही लोक जसे कमतरता भरून
In reply to काही लोक जसे कमतरता भरून by शिल्पा ब
प्रकाटाआ.
चला.. प्रेमाचा गुलकंद उधळायला
In reply to चला.. प्रेमाचा गुलकंद उधळायला by पिंगू
ह्म्म
प्रेमळपणाचा आव आणणे हा
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
आणि सार्वजनीक संस्थळावर
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
+१०००००००० टु सुहास बाकी चालु
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
सुहास++१००
प्रतिक्रिया वाचन्यात पण कस्ल
In reply to प्रतिक्रिया वाचन्यात पण कस्ल by जेनी...
+१११
प्र का टा आ
क्रिप्टीक लिखाण.
In reply to क्रिप्टीक लिखाण. by आत्मशून्य
इथे हेच पचेना झाले पब्लिक ला,
In reply to इथे हेच पचेना झाले पब्लिक ला, by विश्वनाथ मेहेंदळे
@आणखीन सडेतोड लिहिले तर काय
हम्म्म्म
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
सरसकट असेच लेख आले असते तर मी
धोबीपछाड
माझ्या मते लग्न झालेल्या व न
डॉ. दिवटे हे स्त्री-पुरूष
In reply to डॉ. दिवटे हे स्त्री-पुरूष by सविता
याशिवाय हे मेडीकल डॉक्टर
In reply to याशिवाय हे मेडीकल डॉक्टर by शिल्पा ब
याशिवाय हे मेडीकल डॉक्टर
ले़ख अतिशय टाकाऊ आहे. फालतु आहे..