बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी
ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्या अट्टल गिर्हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-)
आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल
हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते.
१)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ
हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव
आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा
तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर
हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले---
१)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं
२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते
३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं
४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट
५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला
६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय...
७) ही...लागली बघा तर्री.....१)
२)
८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड
९)उसळ फरसाण पोहे
१०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव
११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा
१२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) )
१२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही 

वाचने
42513
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट हो गुर्जी झटका लागला
लै भारी हो गुर्जी. एकदा तिथली
____/\____ काय तर्री आहे का
पुण्यात येणार आहेस ना.
In reply to ____/\____ काय तर्री आहे का by यकु
२) लाइट मिसळ पुण्यात आल्यावर
In reply to पुण्यात येणार आहेस ना. by चिंतामणी
तुझी बुकींगची कल्पना आहे मला.
In reply to २) लाइट मिसळ पुण्यात आल्यावर by यकु
जबर्या
+१
In reply to जबर्या by राजघराणं
लै भारी गुर्जी. भन्नाट!
चला तर मंग...
अन्नदाता सुखी भव !!!
बाकी झणझणीत तर्रीदार मिसळ
@मामा मात्र एकदम सात्विक
In reply to बाकी झणझणीत तर्रीदार मिसळ by प्रचेतस
++ १
In reply to @मामा मात्र एकदम सात्विक by अत्रुप्त आत्मा
अल्टिमेट मिसळवृत्तांत..
+ १
In reply to अल्टिमेट मिसळवृत्तांत.. by गवि
+१११
In reply to + १ by मेघवेडा
+२
In reply to + १ by मेघवेडा
खल्लास......
वढ ए वढ... हाण्ण्ण्ण्ण तिज्या
आयचा घोव...
ह्या मिसळीसाठी पुणे दौरा
In reply to आयचा घोव... by सुहास झेले
मस्त ओळख!
+१
In reply to मस्त ओळख! by नगरीनिरंजन
एकदम भारीच!!
जबरी.. हायला मला कितीतरी जवळ
हाणलीत का?
In reply to जबरी.. हायला मला कितीतरी जवळ by पिंगू
मज्जा आहे की पिंगु शेठ कॉल
पिंगु शेठ कॉल टाका च !! >>>
In reply to मज्जा आहे की पिंगु शेठ कॉल by सुहास..
कडक.
गुरूजी,
स्विकार करा..... स्विकारला
In reply to गुरूजी, by प्रास
भारी!
तर्रीचा रंग, मिसळीचे फोटो,
तर्रीदार मिसळ.... उद्याच
बापरे! काय ही
एंटर द ड्रॅगन मिसळ :-)
हा हा हा!!!
In reply to एंटर द ड्रॅगन मिसळ :-) by मराठे
हाथ मारता है लाथ मारता
चला धागा काढल्याचं सार्थक
म्हणजे....!!
मांगल्या टायमले
नुकतीच जेऊन बसलीये ,तरी तुमचे
मिसळपुराण आवडले!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तर्रीदार मिसळीचा वृतांत आवडला
जबरदस्त अमोल केळकर
हाण्ण तिच्यायला!!!
ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>>
In reply to हाण्ण तिच्यायला!!! by धमाल मुलगा
...
In reply to ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>> by अत्रुप्त आत्मा
@क्काय??>>> देव येगळा असला
In reply to ... by मी-सौरभ
आमाला कदी बलावताय ?
@आमाला कदी बलावताय ? >>> हवं
In reply to आमाला कदी बलावताय ? by इरसाल
मिसळ भाउ
In reply to @आमाला कदी बलावताय ? >>> हवं by अत्रुप्त आत्मा
पुढच्या वेळेस मिसळ खाल्ली
काल रात्री आणि आज सकाळी मस्त
@काल रात्री आणि आज सकाळी मस्त
In reply to काल रात्री आणि आज सकाळी मस्त by प्यारे१
अहो भ. बुवा
@आता अश्याच दुसर्या
In reply to अहो भ. बुवा by मी-सौरभ
मामा इकडे बघा !
?
आज हि "करंट मिसळ" खाण्या चा
पुन्यात का मुम्बैत???
पुण्यात...मंगला टॉकिज जवळ.
In reply to पुन्यात का मुम्बैत??? by टवाळ कार्टा
गुर्जींनो मला खायचीये ही मिसळ
3 तारखे नंतर
In reply to गुर्जींनो मला खायचीये ही मिसळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
चालेल. फोनविन तुम्हाला
In reply to 3 तारखे नंतर by अत्रुप्त आत्मा
मामा मिसळ ही गंडलेली मिसळ आहे
In reply to चालेल. फोनविन तुम्हाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
ही गंडलेली मिसळ आहे असे
In reply to मामा मिसळ ही गंडलेली मिसळ आहे by प्रचेतस
माझेही हेच मत आहे.
In reply to ही गंडलेली मिसळ आहे असे by यसवायजी
म्हणजे???? बुवांना कट* मिळतो
In reply to माझेही हेच मत आहे. by सतिश गावडे
*इथे श्लेष अपेक्षित आहे :D
In reply to म्हणजे???? बुवांना कट* मिळतो by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to *इथे श्लेष अपेक्षित आहे :D by सतिश गावडे
चालु द्या तुमचे निरर्थक
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
+१ ००८
In reply to चालु द्या तुमचे निरर्थक by प्रसाद गोडबोले
मयुर ची मिसळ मला पण जाम आवडते
In reply to चालु द्या तुमचे निरर्थक by प्रसाद गोडबोले
ही
In reply to मयुर ची मिसळ मला पण जाम आवडते by गणामास्तर
एक शाखा चिंचवड स्टेशन कडून
In reply to ही by नाखु
एक शाखा चिंचवड स्टेशन कडून
In reply to एक शाखा चिंचवड स्टेशन कडून by गणामास्तर
सकाळी जायचं असेल तर
In reply to एक शाखा चिंचवड स्टेशन कडून by प्रसाद गोडबोले
+१
In reply to सकाळी जायचं असेल तर by गणामास्तर
मिसळ संध्याकाळी खाण्यात काही
In reply to +१ by नाखु
+१
In reply to मामा मिसळ ही गंडलेली मिसळ आहे by प्रचेतस
तुम्हाला मिसळ कशी खायची हे
In reply to +१ by तुषार काळभोर
(त्याआधी) कशी मागवायची हेच्च
In reply to तुम्हाला मिसळ कशी खायची हे by सतिश गावडे
मी "ओ, एक मिसळ दया" अशी
In reply to (त्याआधी) कशी मागवायची हेच्च by यसवायजी
"मिसळ कशी मागवावी" यावर एक
In reply to मी "ओ, एक मिसळ दया" अशी by सतिश गावडे
तुम्ही निरर्थक कटवादाचे बळी
In reply to तुम्हाला मिसळ कशी खायची हे by सतिश गावडे
आपण मिसळ खाल्लेली नाही.
In reply to तुम्ही निरर्थक कटवादाचे बळी by बॅटमॅन
बुवा biziee आहेत म्हणुन डाव
In reply to आपण मिसळ खाल्लेली नाही. by सतिश गावडे