मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-) आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते. १)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले--- १)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं २)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते ३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं ४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट ५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला ६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय... ७) ही...लागली बघा तर्री.....१) २) ८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड ९)उसळ फरसाण पोहे १०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव ११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा १२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) ) १२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही

वाचने 42513 वाचनखूण प्रतिक्रिया 144

प्रचेतस 01/02/2012 - 13:50
लै भारी हो गुर्जी. एकदा तिथली मिसळ खाल्याचं पुसटसं आठवतय. चटकदार तर्री बघूनच आमची जिव्हानंदी टाळी लागलीय. जाऊ आता लवकरच मिसळ हाणायला.

यकु 01/02/2012 - 13:53
____/\____ काय तर्री आहे का ज्योक? तिखट आवडतं, पण त्या रक्तवर्णी तर्रीला जिभेवर घ्यायची टाप नाय होणार ब्वॉ आपली. (मिसळप्रेमी) यशवंत

In reply to by यकु

चिंतामणी 01/02/2012 - 14:17
त्यावेळी खाउन बघु. वरती वाचले नाहीस का??? :) :-) :smile: आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते. १)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ

राजघराणं 01/02/2012 - 13:56
ही नाय मिलनार.. पण मिळेल ती मिसळ खायला आम्ही हापिसातून बाहेर पड्त आहोत

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा 01/02/2012 - 19:28
@मामा मात्र एकदम सात्विक प्रवृत्तीचे दिसत आहेत. >>> तीच तर मज्जा हाय....अशी चव देणारा माणुस सात्विकच असतो,,,ते भणंग प्रवृत्तीचे कामं नोहे

In reply to by मेघवेडा

मी-सौरभ 01/02/2012 - 15:04
टाळ्यांचा कडकडाट :) अशी ही मिसळगाथा ऐकलेल्या सर्व मिसळप्रेमींना ही मिसळ खाणेसाठी हार्दीक निमंत्रण....(वेळ, सोबत्=आवड आपली आपली)

In reply to by मेघवेडा

रमताराम 01/02/2012 - 18:03
ऐसाईच बोल्ताय. फटूंनी मार डाला.

मुक्त विहारि 01/02/2012 - 14:37
आत्ताच मस्त पैकी चिकन बिर्याणि आणि झिन्गा रस्सा ओरपुन आलो आणि समोर परत अशी मिसळ,,,,,,परत भारतात जायची ओढ लागली.... सिग्रेट्....तम्बाखु...मिसळ...आणि मद्य-पान... विसरायला लावतात देह-भान....

प्यारे१ 01/02/2012 - 14:46
वढ ए वढ... हाण्ण्ण्ण्ण तिज्या मारी. ;) खंग्री तर्री नि मिसळ. भटजी , मानलं आपल्याला. आत्ताच जेवलेलो हो... परत भूक लागली की!

सुहास झेले 01/02/2012 - 15:10
भन्नाट एकदम ... काय बोलू? बोलती बंद ;) आता निव्वळ ह्या मिसळीसाठी पुणे दौरा करावा म्हणतो.... :) :)

नगरीनिरंजन 01/02/2012 - 15:17
काय टिपायचं आणि काय सांगायचं ते जमलेलं आहे!

In reply to by सुहास..

अत्रुप्त आत्मा 01/02/2012 - 19:32
पिंगु शेठ कॉल टाका च !! >>> उद्या सक्काळी ९वाजेपर्यंत मी तिथे असणारच आहे...त्यांना दाखवायचय ना...हे मिसळायण..

प्रभाकर पेठकर 01/02/2012 - 16:17
कडक मिसळवृत्तांत्त. येतोच आता आस्वादायला. मस्त, चमचमीत तपशीलांबद्दल धन्यवाद.

प्रास 01/02/2012 - 17:02
फोटो पाहून नि तुम्ही केलेलं वर्णन वाचून आमचा स्विकार करा.....

पैसा 01/02/2012 - 18:12
तर्रीचा रंग पाहून अंमळ टरकीफाय झाले आहे!

रेवती 01/02/2012 - 20:56
बापरे! काय ही मिसळभक्ती! वर्णन अगदी तर्रीदार झाले आहे.

मराठे 01/02/2012 - 22:30
खत्तरनाक मिसळ दिसतेय. मिसळ खाणार्‍याला नाकातोंडातून आग ओकणारा ड्रॅगन बनवणार बहुतेक. शिवाय
मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते.
हे ही तितकंच खरंय.

In reply to by मराठे

धमाल मुलगा 07/02/2012 - 16:51
प्र्याक्टिकली बोलायचं झालं तर 'एंटर' न म्हणता 'एक्झिट द ड्रॅगन' म्हणावं लागेल ज्यांना झेपणार नाही त्यांच्यासाठी. ;)

पाषाणभेद 01/02/2012 - 22:35
हाथ मारता है लाथ मारता है लडका अत्रूप्त ये साला करंssट मारता है मामाची मिसळ खाउन झनझनाट!

अत्रुप्त आत्मा 02/02/2012 - 00:24
चला धागा काढल्याचं सार्थक झालं,,,अनेकजण मिसळ चाखुन गेले. तरिही सोकाजीराव, धनाजीराव,सूड,गणेशा पन्नासराव(ज्यांची अमची ओळखच मुळी मामांच्या गाडिवर भेटुन झाली...)आनी आमचे किसनद्येव--- ते का कुणास ठाऊक आले नाहीत... :-( एरवी मीच माझ्या धाग्यावर अशी प्रतिक्रीया देण्याचे कारण नाही. परंतू मिसळ हे आमुचे देवाघरचे देणे त्यामुळे ते जितक्या जमेल तितक्या आप्तांसह खाणे हा धर्म,,, त्यामुळे अठवण झाली शिवाय हे सगळे खादाड कंपूचे सदस्य----स्वारी---मेंबर...मग होणारच अठवण...

अन्नू 02/02/2012 - 19:18
आता तुंम्ही पण! काका- मामा- नाना- दादा- भाई- आत्या- मामी- काकी- मावशी- वहीनी- ताई- माई- आक्का.. मला वाचवा...................................

अमित दळवे 03/02/2012 - 02:34
जवा पुण्यात आलो होतो तवा सकाळ-संध्याकाळ निरा मिसळपाव हाणली होती राजेहो... आता वर्‍हाडी ठेच्या वानी तीखटजाळ हाय म्हणता तर जा लागल ना ब्वा.

चतुरंग 04/02/2012 - 01:12
तर्रीदार चित्रे बघून पुढच्या टायमाला ही मिसळ चापायचा विचार पक्का झालाय! (मिसळप्रेमी)रंगा

धमाल मुलगा 04/02/2012 - 14:34
काय तिच्यायला ते फोटू म्हणायचं का काय म्हणायचं द्येवा.... ती तरी बघूनच इथं बसल्याबसल्या आमची अवस्था इठूरायाच्या दर्शनला तळमळणार्‍या पुंडलिकागत झाली वो... भटजीबुवा अत्तरवाले, च्यामायला, चलाच आता. मामांकडं पैल्या धारेची लालभडक कॉटरमिसळ खाल्याबिगर आमच्या पिंडाला कावळा शिवायचा न्हाईच खरं. ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. :)

In reply to by धमाल मुलगा

अत्रुप्त आत्मा 04/02/2012 - 20:28
ठरवा बॉ कधी जायाचं त्ये. >>> ह्हा ह्हा ह्हा....ध.मु. तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मला एकच म्हणावसं वाटतं,,, धम्माल मुलगा=मामांची मिसळ मामांची मिसळ=धम्माल मुलगा मामांकडे मिसळीला हवं तेंव्हा जाऊ... फक्त आधी कळवा...म्हणजे तर्री कडक असतानाचा टाइम गाठता येइल... अवांतर-तुमच आमच जमणार बघा ;-)

In reply to by प्यारे१

अत्रुप्त आत्मा 08/02/2012 - 22:59
@काल रात्री आणि आज सकाळी मस्त पैकी मिसळ हाणण्यात आली आहे तरीही 'मण' भरलेले नाही. >>> कुठे खाल्ली...? माझ्या बरोब्बर एकदा चलं... सर्व काही भरेल ;-) अवांतर-तसंही इतक्या जणांना, आपण बरोबर जाऊ असं म्हणलोय,की सगळ्रे एकदम गेलो,तर मामांकडे एक कट्टाच होऊन जाइल... :-)

मी-सौरभ 22/02/2012 - 19:52
आता अश्याच दुसर्‍या उपहारगृहाची ओळख करुन द्या ना..

चौकटराजा 24/02/2012 - 09:28
मिसळी वर पातळ पोह्याचा चिवडा व टोंमॅटो व कोथिबीर यांचे गार्निशिंग मस्त दिसते. व मामा, वाईच कांदा बारीक चिरा ना राव ! मामा, लई " पब्लिकशिट्टी " झाली. आत्म्यानं फुकाट किती मिसळी मारल्या ?

पुष्कर जोशी 06/01/2013 - 23:09
?
आज हि "करंट मिसळ" खाण्या चा योग आला .. तीन प्रकारात तर्री ची तिखट मिसळ हीच फक्त खऱ्या मिसळ खाणाऱ्याला आवडेल ! मिसळ वाले मामा सगळ्यांना उत्साहात ह्या मिसळी चा ३२ वर्षा चा इतिहास सांगत होते .. त्यांनी हे सुद्धा आवर्जून सांगितले कि इंटरनेट वर मिसळपाव साईट वर त्यांचा फोटो आहे म्हणून ! मिसळ खवय्यान साठी एक सावधानते चा इशारा : ह्या मामांच्या मिसळ गाडी शेजारीच एक "डुप्लिकेट" मिसळ गाडी आहे..चुकू नका ! :)

In reply to by यसवायजी

सतिश गावडे 26/05/2015 - 09:13
माझेही हेच मत आहे. जेव्हा मी बुवांना तसं सांगितलं तर बुवा म्हणाले "तुम्हाला मिसळ कशी खायची हे माहिती नाही." =))

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 26/05/2015 - 10:06
म्हणजे???? बुवांना कट* मिळतो का तिथे ;) का बुवा कोणाचा खास पुणेरी सत्कार करायचा असेल तर तिथे नेतात =)) *इथे श्लेष अपेक्षित आहे :D

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 26/05/2015 - 10:17
*इथे श्लेष अपेक्षित आहे :D
आम्ही तुम्हाला इतके हे* वाटलो काय? *इथे श्लेष अपेक्षित नाही. हे म्हणजे बावळट असे अभिप्रेत आहे.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले 26/05/2015 - 10:29
चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन ! बाकी आमच्या चिंचवड मधील मयुर मिसळ अम्हास अत्यंत अवडलि आहे ... कधी येताय बोला !!

In reply to by गणामास्तर

नाखु 26/05/2015 - 12:01
मयूर मिसळ नक्की कुठे आहे. आजच हल्ला बोल करू, प्रगो,वल्ली येताय ना विथ गणामास्तर (लै दिसांनी दर्शन हुईल मास्तुरेचे) आप्ला. सुंमडी सोपान नाखु

In reply to by नाखु

गणामास्तर 26/05/2015 - 12:06
एक शाखा चिंचवड स्टेशन कडून आकुर्डी चौकाकडे येताना डाव्या हाताला आहे आणि दुसरी थरमॅक्स एनर्जी हाउस च्या बाहेर आहे.

In reply to by गणामास्तर

प्रसाद गोडबोले 26/05/2015 - 12:18
एक शाखा चिंचवड स्टेशन कडून आकुर्डी चौकाकडे येताना डाव्या हाताला आहे
मी ह्याच शाखेत गेलो होतो . नाखु , गणामास्तर , संध्याकाळि मला जमत नाही राव , सकाळी जायचा प्लान करु ? उद्या भेटुयात का !!

In reply to by नाखु

प्रचेतस 26/05/2015 - 13:09
मिसळ संध्याकाळी खाण्यात काही अर्थ नाही राव. सकाळी मिसळ आणि संध्याकाळी भेळ खायची असते असा अलिखित नियमच आहे म्हणे.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर 26/05/2015 - 10:17
गंडलेली तर आहेच, शॅम्पल पन जरा पांचटच वाटलं होतं. (करंट-बिरंट लांब राहिला! तो पुण्यात आत्तापर्यंत फक्त काताकिर्र्र ला मिळालाय) अवांतरः नेवाळेची मिसळ करंट असते, असं ऐकलंय, पण लई लांब आहे.

In reply to by सतिश गावडे

प्रसाद गोडबोले 26/05/2015 - 13:49
बुवा biziee आहेत म्हणुन डाव साधता काय रे रामखोरांन्नो ! थांबा , बुवा आले की सुधारणावादी आसुड कसा लागतो ते तुम्हाला पहायला मिळेल ...