निवॄती
लेखनविषय:
छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे
वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे
कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे
मित्रांनी ही सावध केले होते मजला
आठवणींनी त्या सार्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे
शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे
करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्यातून आता
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे
साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे
वाचने
10986
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
केवळ अप्रतीम...!
In reply to केवळ अप्रतीम...! by विसोबा खेचर
पिंजरा
उत्तम
सुंदर
In reply to सुंदर by आंबोळी
कविता
In reply to सुंदर by आंबोळी
अहो
अचानक
केसु
In reply to केसु by सहज
+१
प्रवृत्ती (अशी का बरे होत आहे?)
सही
केशवा, अप्रतिम काव्य!
कविता आवडली
निर्णय बदला...
कविता म्हणून
वा..
In reply to वा.. by प्राजु
+१००
व्वा!
In reply to व्वा! by बेसनलाडू
सहमत...
In reply to सहमत... by विसोबा खेचर
देणार्याने देत जावे..
सुंदर कविता
सुरेख!
In reply to सुरेख! by पिवळा डांबिस
काळजी नको..
हे विडंबन नाही
In reply to हे विडंबन नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
वा.
निवृत्ती नको ...
धन्यवाद!!
केशवसुमार
In reply to केशवसुमार by धोंडोपंत
कुंडली वगैरे सोडा