मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कचरावाला

विनायक पाचलग · · काथ्याकूट
नमस्कार , खुप दिवसानी मिसळपाव वर लिहित आहे ..खुप म्हणजे अगदी बरेच दिवस झाले .... इंजिनिअरींग ,त्यासोबत असणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि बरेच पालथे धंदे ... तर आज इथे काही लिहायचे कारण म्हणजे माझ्या डोक्यातली एक कंसेप्ट ...कचरावाला .कॉम ... या कंसेप्टवर बोलायचे आहे आज.... "सेव्ह द बेबी गर्ल " मध्ये काम करत असताना सुचलेली ..पण प्रत्यक्षात आणली नव्हती . पण ,मध्ये आय आय टी टेकफेस्ट ला "सोशल बझ " नावाची स्पर्धा जाहीर झाली ,आणि देशभरातुन आलेला ५५०-६०० प्रकल्पातुन टॉप ६ मध्ये ही कंसेप्ट निवडली गेली आणि प्रत्यक्षात आली . तर ,आपणा सर्वाना अशी विनंती आहे की http://www.kacharawala.com/ येथे जाऊन आपण ही संकल्पना पाहावी ..आणि ,आपले त्याबद्दल काय मत होते ते सांगावे ... ती कितपत उपयोगी ठरेल ,अजुन काय बदल करता येइल ? आणि असे बरेच काही ... जाणकार मिपाकरांमध्ये या विषयावर साधक बाधक चर्चा व्हावी अशी इच्छा आहे .... ज्यायोगे जेव्हा जानेवारीत मी हा प्रकल्प आय आय टीत सादर करीन तेव्हा तो प्रत्यक्षात आणण्यायोग्य (फिजिबल) झालेला असेल. तर दोस्तहो ,आपल्या मतांची वाट पाहत आहे .कचर्‍यासारख्या विषयावर या निमित्ताने जाहीर चर्चा घडावी हिच इच्छा ... संदर्भासाठी - http://www.kacharawala.com/kacharawala-project.pdf ( जाता जाता - ही या संस्थळाची जाहिरात नाही . पण जर संकल्पना आवडली ,तर ती शेअर नक्की करा .. ही एक समाजोपयोगी सेवा असुन यातुन आता व भविष्यात कोणताही नफा मिळवला जाणार नाही आहे ) आपलाच , विनायक

वाचने 6105 वाचनखूण प्रतिक्रिया 33

गणेशा Wed, 12/28/2011 - 14:32
संकल्पना आवडली.. वाचतो आहे... तुमची working style छान आहे, थोडे additional मत देतो आहे. Task force सुद्धा जर सेंट्रलाईज पद्धतीने काम करत असेन तर प्रत्येक पालिका/ग्रांपचायत/जिल्हापरिषदे कडील रीलेटेड नंबर वर तुम्ही (म्हणजे सॉफ्टवेअर) एस.एम्.एस. करता आहात , असे समजले. याच बरोबर या प्रोजेक्ट मध्ये फक्त सरकारी यंत्रणेवरच नाहि तर वयक्तीक लोकांच्या कचरां टाकण्याच्या व्रुत्तीवर ही लक्ष ठेवता येइल का भविश्यात ते पहा... पुढे जावुन रोडवरील/सिग्नलवरील सरकारी कॅमेरा किंवा तुम्ही ही मंदिर/इतिहासकालीन वास्तु/शहराच्या मेन प्लेसेस येथे कॅमेरा लावुन अश्या कचरा टाकणार्या आणि त्याच बरोबर तुम्ही आता जे कचरा हलवण्यासाठी सिस्टीम वापरता आहे ती दोन्ही ही साध्य होयील. म्हणजे जर कोणी मुद्दाम कोठेतरी सार्वजनिक ठिकाणी कचरा करत असेन तर , त्या व्यक्तीचा फोटो कोणी उपलोड केला तर तो योग्य कारवाईसाठी संबंधीत ठिकाणी ही पाठवावा. दूसरे म्हणजे, सध्याच्या सिस्टीम मध्ये जर कोणी चुकीचे एस.एम्.एस करत असेन किंवा चुकीची माहीती मुद्दाम देत असेन तर त्यावर काय प्रतिबंध करता येइल याचे anaalysis करावे असे वाटते. हे सुद्धा महत्वाचे आहे. कारण पुढे जावुन हा प्रोजेक्ट खुप मोठ्या स्तरावर काम करेन तेंव्हा ह्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, task force कडुन ही कचरा नव्हता तेथे, वगैरे विधाने ऐकायला मिळणार नाहिच, शिवाय प्रत्येक लोकांना ही त्यांचे योग्य कर्तव्य निट बजवता आले पाहिजे असे ही वाटत राहिलच... आनखिन बरेच काही.. पण हे मुद्दे आवडले असतील तर .. बाकी माझे मत आवडु न आवडु .. आपला प्रोजेक्ट सुंदर आहे.. तुमच्या सर्व टीमला मनापासुन शुभेच्छा ! - गणेशा

In reply to by गवि

मन१ Wed, 12/28/2011 - 14:15
IIT Bombay (हो bombayच, mumbai नाही) च्या Tech Fest ह्या समारोहात सर्व तांत्रिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या स्पर्धा असतात. तिथे ह्यांनी भाग घेतलाय असे म्हणताहेत. आयआयटीत असल्याचे त्यांचे म्हणणे नाही.

In reply to by शाहिर

मराठी_माणूस गुरुवार, 12/29/2011 - 09:24
मुंबई हे नाव अधिकृत झाले तरी प्रत्येकाला वेगळे सांगावे लागणार आहे का ? हा प्रश्न वैयक्तीक तुम्हाला नाही .

In reply to by मराठी_माणूस

गवि गुरुवार, 12/29/2011 - 10:54
या प्रतिसादाशी थेट संबंधित नसले तरी म्हणू इच्छितो की "मुंबई" ही आमच्यासाठी (सामान्य लोकांसाठी) "मुंबई"च होती. चार स्टाईल मारणारे आणि नेसेसरिली "अमुंबईकर" लोक "बॉम्बेवरुन कपडे आणले" असं गावाकडे म्हणायचे तेवढंच ऐकलं होतं.. किंवा मग फक्त इंग्रजीच बोलणारे अमुक क्लब, तमुक क्लब वाले मलबारहिल जुहूचे लोक.. (उदा. "द बाँबे फ्लाईंग क्लब" किंवा जी नावं इंग्रजीत आणि इंग्रजी प्रभावाच्या काळात ठेवली गेली होती ती.) हे वगळता माझ्या पाहण्यातले सर्व मुंबईकर आधीही मुंबईच म्हणायचे आणि अजूनही मुंबईच म्हणतात. "मुंबै", .. टू बी प्रिसाईज..

दादा कोंडके Wed, 12/28/2011 - 14:48
कल्पना आवडली पण नविन वगैरे नाही. काही वर्षापुर्वी बंगळुरुमध्ये असा प्रकल्प मी बघितला होता. आता चालू आहे का ते माहीत नाही. तिथे आयटी इंजिनर्सची संख्या प्रचंड असल्यामुळे त्यांच्या सुपिक डोक्यातून असल्या पुष्कळ कल्पना येत असतात आणि ते राबवतात सुद्धा! मला माहीत असलेले (ऐकलेले) प्रकल्प. १. एका संस्थळावर कुठेही/काहीही अस्वच्छ किंवा बेकायदा दिसलं की त्याचा फोटो काढून तिथल्या पत्यासकट पाठवायचा. साचलेल्या कचर्‍याचा, तुंबलेल्या पाण्याचा, दिवसा रस्त्यावरचे दिवे लागलेले असतील, अतिक्रमण असेल किंवा काहीही. पाठवणारा निनावीही राहू शकतो. दर दोन दिवसांनी ती माहिती सॅग्रिगेट करून संबंधीत विभागाला पाठवून त्याचा पाठपुरावा करत असंत. २. कार पूलिंगः प्रदुषण, इंधन बचत, वाढतं ट्रॅफिक सगळं ठिक आहे पण सगळ्यांनाच पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणं शक्य नाही. त्यामुळे एका संस्थळावर आपण आपलं नाव, चारचाकी वाहनाचा प्रकार, घर आणि कामाचं ठिकाण, आणि यायच्या जायच्या वेळा रजिस्टर करू शकतो. मग हे सगळं मॅच होणारी लोकं एकत्र ऑफिसला जाउ शकतात. ही कल्पना नंतर तिथल्या ट्रॅफिक पोलिस डिपार्टमेंटनी सिद्धा उचलून धरली. ३. फक्त रिक्षावाल्यांनी केलेल्या फसवणुकीसाठी: एका संस्थळावर अशा प्रकारा नंतर रिक्षाचा नंबर, शक्य असल्यास ड्रायव्हरचं नाव, ठिकाण आणि थोडक्यात फसवणुकीचा प्रकार लिहायचा. नंतर ती तक्रार संबधित लोकांकडे पाठवली जाते. ४. ज्यांना मुलांसाठी काहितरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. संस्थळावर आपली माहिती थोडक्यात द्यायची. प्रत्यक्ष भेट आणि थोडी शहानिशा केल्यानंतर आपण शनिवारी दिलेल्या महानगरपालिका शाळेत एका वर्गाचे २-३ तास घेता येतात. त्यात आपण शिकवू शकतो, गोष्टी सांगू शकतो. बाकी जुने कपडे-पुस्तके देणे, कुणाचा तरी शैक्षणिक खर्च उचलणे असे असंख्य प्रकल्प आंतरजाल वापरून अतिशय उत्तम रितीने चालू आहेत आणि कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय.

In reply to by दादा कोंडके

विनायक पाचलग Wed, 12/28/2011 - 15:10
नमस्कार १. मी आय आय टी यन नाही ..मी कोल्हापुरात के आय टी या संस्थेत इंजिनिअरींग च्या द्वितीय वर्षाला शिकतो . २. गणेशा : आपले मुद्दे पटले ..त्यादृष्टीने काम सुरु करत आहे :) ३. @दादा कोंडके - ही संकल्पना नवीन नक्कीच नाही ..यासाठी अभ्यास करत असताना बेंगलोर मध्ये झालेल्या उपक्रमाबाबत माहिती मिळालेली होती .( तो प्रकल्प आज चालु आहे का नाही हे माहित नाही :( ) मात्र ती कंसेप्ट मॉडिफाय केली आहे असे म्हणता येईल . मोबाईल /एस एम एस चा वापर हे त्याचे एक उदाहरण ... आपण जो पहिला प्रकल्प बोललात त्याचा पाठपुरावा होतो का ,त्यानंतर काय होते याबद्दल नीटशी माहिती मलाही मिळाली नव्हती . त्यावर उत्तर म्हणुन आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे .मात्र ,त्याची अजुन चाचणी झालेली नसल्याने व स्पर्धेच्या नियमात ते नसल्याने आता संस्थळावर त्याची माहिती नाही . याशिवाय ,वरील प्रकल्प ( आपण संदर्भ दिलेला ) हा सर्व विषयाना वाहिलेला आहे .त्यातुन निर्माण होणारी गुंतागुंत व लागणारे मनुष्यबळ टाळण्यासाठी हा प्रकल्प कचरा या विषयापुरता मर्यादित ठेवला आहे . याशिवाय , प्रत्येक ठिकाणी काम करणार्‍या संस्थेवर फक्त दबाव आणण्यापेक्षा त्यांनाच यामध्ये अधिकृत रित्या सामावुन घेण्याचा प्रयत्नही चालु आहे . खुप खुप धन्यवाद या प्रकल्पाचा मुख्य निर्माता जरी मी असलो, तरी यामध्ये माझ्या अजुन २-३ मित्रांचा समावेश आहे व त्यांच्यातर्फे मी येथे बोलत आहे .

In reply to by विनायक पाचलग

जे.पी.मॉर्गन गुरुवार, 12/29/2011 - 11:25
प्रकल्पाबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! बंगलोर मधला तो प्रकल्प "द अग्ली इंडियन" नावानी अजूनही चालू आहे. मला चेपुवर त्यांच्या घडामोडी कळत असतात आणि त्यांचं कामदेखील कौतुकास्पद आहे. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा! जे पी

चिरोटा Wed, 12/28/2011 - 15:25
विनायक, चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा. उत्सुकता म्हणून विचारतोय- हे सॉफ्टवेयर कुठल्या भाषेत बनवले आहे?

रानी १३ Wed, 12/28/2011 - 16:56
विनायक, चांगला उपक्रम आहे. पुणॅ येथे हा उपक्रम चालु आहे का? असल्यास महिति द्यावी.

In reply to by रानी १३

विनायक पाचलग Wed, 12/28/2011 - 17:02
हा उपक्रम सध्या कोल्हापुर येथे चालु आहे ...... या स्पर्धेचे फायनल प्रेझेंटेशन ६ तारखेला आहे . त्यानंतर हा उपक्रम पुढे राबवायचा का ? राबवायचा तर कुठे आणि कसा ... यावर निर्णय होईल

पिंगू Wed, 12/28/2011 - 18:35
अरे विपा, हे तर चेपुवर पण पाहिले आहे आणि तेही तूच पोस्ट केले होते. कल्पना तर चांगली आहे. पण मुळात कचरा कसाही फेकून देऊ नये, ही सवय लावून घेतली तर ही कल्पना योग्य पद्धतीने अमलात आणता येईल. - पिंगू

श्रावण मोडक Wed, 12/28/2011 - 19:25
आंतरजालावरील कचऱ्याविषयी काही करता येतं का या सॉफ्टवेअरमार्फत? तसं झालं तर लई बरं होईल... ;)

जोशी Wed, 12/28/2011 - 19:30
आपल्या कामासाठी शुभेच्छा, कोल्हापुर महानगर पालीकेच्या बरोबरीने हे काम करता आले तर बघा. अलीकडेच मिळालेल्या माहीतीनुसार अशीच वेबसाइट पुणे महानगर पालीकेनेही केलेली आहे. http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx तक्रार लॉग केल्यावर 'तक्रार नंबर' दिला जातो, फोटो अपलोड करायची व्यवस्था आहे. workflow management नुसार तक्रार assign/escalate केली जाते. तक्रार करणार्‍यास update मिळतो. कचर्‍या बरोबरच, सार्वजनिक बागा, गटार, रस्ते, इ. अनेक तर्‍हेच्या तक्रारी नोंदवता येतात. साधारण ५ पैकी ३ तक्रारी वेळेत resolve झाल्या असा अनुभव आहे. वापर वाढल्यास response time/ resolution time कमि होउ शकेल. जोशी

पिलीयन रायडर Wed, 12/28/2011 - 19:36
चांगली कल्पना आहे, पण कचरा उचलला आणि नुसता नजरे आड झाला तर प्रश्न सुटतील का? तो कमी करायचे प्रयत्न करावे लागतील ना... किमान ओला -सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिक च्या पिशव्या कचर्यात न टाकणे.. http://theuglyindian.com/index.html ही एक साईट पाहण्यात आली होती... ही कल्पना मला फारच आवडली होती...

विकास Wed, 12/28/2011 - 19:44
कल्पना तुम्ही देखील म्हणालात तशी जरी नवीन नसली तरी उत्तम आहे आणि त्यात प्रत्येक वेळेस नाविन्य नक्कीच आणता येते. काही मुद्दे - प्रश्नः
  1. १७ डिसेंबर ला तुम्ही हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरात चालू केला आहे असे म्हणत आहात. त्याबद्दल अधिक माहिती अथवा त्यात मिळालेल्या जनतेच्या सहभागाबद्दल अधिक कळले तर उत्तम.
  2. ह्या प्रकल्पाचे आर्थिक स्वरूप कसे असेल. ना नफा तत्व ठिक आहे, पण चालू ठेवण्यासाठी पैसा गोळा करण्याचा कसा विचार केला गेला आहे?
  3. ह्या प्रकल्प सातत्याने कसा चालू राहील आणि तो तुमच्याकडून अथवा तुमच्या मदतीने इतरांकडून इतर शहरात राबवला जाईल या संबंधात काही विचार? (sustainability & Transferability of the project)
  4. "About Us" section नीनावी आहे. ते काही पटले नाही. प्रकल्प संयोजक आणि टिमची माहिती असणे महत्वाचे आहे. (विशेष करून जेंव्हा स्पर्धेत भाग घेत आहात तेंव्हा).
  5. मोबाईल अ‍ॅपचा विचार केला आहे का? (विशेष करून अँड्रॉईड अथवा जे काही भारतात स्मार्ट फोन्स प्लॅटफॉर्म्स चालतात त्या संबंधात?)
*मी येथे (MIT, Northeastern, वगैरे मधे) अशा social entrepreneurs साठी स्पर्धा आयोजीत केल्याने, परीक्षक राहील्याने, तसेच काहींच्या प्रकल्पाला सल्लागार राहील्याने* अजून बरेच प्रश्न डोक्यात येऊ शकतील. त्यामुळे अधिक संवाद हवा असेल तर अवश्य व्यनी करा. प्रकल्पास परत एकदा शुभेच्छा!

In reply to by विकास

विनायक पाचलग Wed, 12/28/2011 - 20:01
धन्यवाद ... @सोकाजीराव - काही जुन्या धाग्यांची आठवण काढुन दिल्याबद्दल लै आभारी आहे ..जाम हसु आले ... @जोशी - कोल्हापुर महापालिकेबरोबर बोलणी सुरु आहेत ... ते यासाठी पॉझिटिव्ह आहेत . पुण्याची साईट सांगितल्याबद्दल धन्यवाद ..याबाबत माहित नव्हते ..पुण्यातील काही लोकांशी प्रकल्प सुरु करण्याआधी बोललो होतो .पण त्यानाही काही माहित नसावे ... @पीलियन - अग्ली इंडियन पाहिली आहे . संदर्भ संस्थळ म्हणुन ते वापरतो मी ...शशी थरुरानी ट्विटर वरुन सुद्धा या साईटबद्दल लिहिले होते ;) @विकास - सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देईन :) व्यनि पाठवत आहे आभार विनायक

निल्या१ Wed, 12/28/2011 - 21:28
प्रोजेक्ट संबंधी माहिती मुख्य पानावर ठेवा. गाईच्या चित्रामुळे फोकस रहात नाही. नेमकी वेबसाईट कशासाठी आहे हे कळायला खाली वाचायला लागते. वेबसाईटच्या पहिल्या पानावर तुमच्या कार्यपद्धतीचं एक वर्क फ्लो दाखवा. त्या फ्लो मध्ये चित्रं वगैरे वापरा. बिफोर /आफ्टर असे कच-याच्या जागेची छायाचित्रे वर्कफ्लो मध्ये वापरु शकता. स्लाईड शो मधे २,३,४ ची चित्रे सेमच वाटतात.सध्या हा प्रकल्प फक्त कोल्हापुरा पुरता आहे असे वर कुठे तरी लिहा. एस एम एस कुठे करायचा ते दिलेत पण त्यात काय टाकायचे हे दिले नाहीत. उदा. गल्लीचे नाव रस्ता क्रमांक जवळचा ललँडमार्क व कच-याचे छायाचित्र. सध्याला एवढेच. शुभेच्छा.

लंबूटांग Wed, 12/28/2011 - 22:10
पण ते साईटीवरचे विन्ग्रजी जरा सुधार मित्रा. मान्य आहे साईट अजून बाल्यावस्थेत आहे पण title मधेच It's ऐवजी Its, जिथे-तिथे chatting/ texting/ sms मधे वापरतो तसे abbreviations (उदा. You ऐवजी U) खटकतात. बर्‍याच ठिकाणी व्याकरणाच्या चूका सुधारण्यासही वाव आहे. मराठीतील वाक्ये word to word ईंग्रजी मधे translate केल्यासारखे वाटत आहे. उदा. त्या जागेचा sms करा = make sms of that place.

In reply to by लंबूटांग

मी ऋचा गुरुवार, 12/29/2011 - 13:25
अगदी हेच म्हणते. इतक्या "स्वच्छ" उपक्रमाची माहिती "शुद्ध" भाषेत मिळाली तर अधिक प्रभावी होईल यात शन्का नाही. नाहितर आप चान्द दिखाओगे और लोग आपकी उंगलीकी गलती निकालते रहेन्गे. बाकी उपक्रमाबद्दल प्रशंसा!

मदनबाण गुरुवार, 12/29/2011 - 09:44
कल्पना चांगली आहे,उपक्रमास शुभेच्छा ! याच बरोबर सीएफएल बल्ब आणि मोबाईल बॅटरीज ची योग्य विल्हेवाट लावता येण्यासाठी काही पर्याय देता आले तर नक्की प्रयत्न कर. हल्ली वीज वाचवण्यासाठी आणि बील कमी येण्यासाठी सीएफएल बल्बचा वापर प्रचंड वाढला आहे,माझ्या माहिती नुसार अश्या बल्ब मधे पार्‍याचा वापर केला जातो.पारा विषारी आहे,हा जमिनीतुन पाण्यात शिरुन पाण्याला विषारी बनवतो,जसे आता आर्सनिक पाण्यात मिसळल्याने शरिरास अपाय होतो आहे त्याच प्रमाणे भविष्यात या पार्‍यामुळे पिण्याचे पाणी विषग्रस्त होण्याची शक्यता वाढत चालली आहे. अधिक माहितीसाठी हा लेख वाचावा. याच प्रमाणे मोबाईलच्या बॅटर्‍यांमुळे सुद्धा प्रचंड प्रदुषण होत आहे...(बर्‍याचश्या बॅटर्‍यांमधे कॅडमियम,पारा असतो.)हिंदुस्थानात असलेल्या मोबाईल ग्राहकांची संख्या पाहता, ही समस्या येत्या काळात बिकट ठरणार आहे. :( सध्या ज्युस (http://joos.co.in/products.html) ही मोबाईलच्या बॅटर्‍या बनवणारी कंपनी इको फ्रंडली मोबाईल बॅटरीज बनवत आहेत.

दिपक गुरुवार, 12/29/2011 - 10:32
छान कल्पना आहे विनायक. सतत काहीतरी करण्याची तुझी धडपडी वृत्ती कौतुक करण्याजोगी आहे. शुभेच्छा आहेतच. :)