बटाटे वडे आपण सगळेच जण घरीदारी खात आणि करत असतोच, त्यात नवीन असे काहीच नाही. तरीही प्रत्येक ठिकाणची खास चव जिभेवर असतेच, विशेषतः गाडीवरच्या वड्याची.. आणि घरी तस्सा वडा होत नाही असे सगळेच हळहळतात आणि पावलं परत एकदा नाक्यावरच्या गाडीवर नाहीतर टपरीवर वळतात. पण काही वेळा आणि ठिकाणे अशी असतात की तेथे अशा वडापावच्या गाड्या,टपर्या नसतात, :( मग वड्याची तल्लफ भागवायला बटाटे उकडत ठेवावे लागतात आणि खाताना परत तेच.. तस्सा वडा नाही झाला..
म्हणून एकदा आमच्या खास आवडीच्या वड्याच्या मालकाला त्याची कृती विचारली आणि तेव्हापासून 'घरी तसा वडा नाही होत..' अशी हळहळ संपली एकदाची..
(ज्यांना नाक्यावर, कोपर्यावर जाऊन चटकन वडापाव खाणं सहज शक्य आहे अशांनी पुढचे नाही वाचले तरी चालेल.. :) )
साहित्य-वड्यांसाठी:
५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे,
४ ते ५ लसूणपाकळ्या,
२ पेरं आल्याचा तुकडा,
३/ ४हिरव्या मिरच्या (मिरच्यांच्या आणि तुमच्या प्रकृतीनुसार प्रमाण कमी जास्त करु शकता)
कढिपत्त्याची २-४ पाने,
फोडणीचे साहित्य
मीठ
वरच्या कव्हरसाठी:
डाळीचे पीठ (बेसन), थोडा ओवा, थोडे तिखट, हळद, चवीनुसार मीठ
तळणीसाठी: तेल
बटाटे उकडून घ्या, साले काढून कुस्करुन घ्या.
आले+ मिरची+लसूण यांचे वाटण करुन घ्या.
नेहमीसारखी फोडणी करुन त्यात कढिपत्ता घाला व आले, मिरची व लसणीचे वाटण घाला. परता.
कुस्करलेल्या बटाट्यांवर ही फोडणी ओता, चवीनुसार मीठ घाला व कालवा.त्याचे वडे करा.
डाळीच्या पिठात ओवा,मीठ, हळद, तिखट घाला व घट्ट सर भिजवा. (पीठ घट्ट भिजवले की वड्याचे कव्हर गाडीवरच्या वड्यासारखे होते.)
तेल तापत ठेवा व एक चमचाभर मोहन डाळीच्या पिठात घाला.
तेल तापले की वडे पिठात बुडवून काढा व तेलात घाला व तळा.
आता वाट कोणाची पाहता?
चटणी बरोबर हादडा.

स्पेलिंग मिश्टेकै.
आता उद्या वडे करणे
आचारी
संध्याकाळी सहज म्हणून २
मस्तच....गेल्या मोठ्या
बटाटेवड्याबरोबर बिया काढलेले
In reply to बटाटेवड्याबरोबर बिया काढलेले by ५० फक्त
टोमॅटो
In reply to टोमॅटो by स्वाती दिनेश
'ते बिया काढलेले टोमॅटो
तोंडाला पाणी सुटले...
In reply to तोंडाला पाणी सुटले... by सुहास झेले
+१
मस्तच!
वेगळ काहितरी बनवा हो , हे तर
आवड आपली आपली...
In reply to आवड आपली आपली... by प्रभाकर पेठकर
खायचा सोडा
In reply to खायचा सोडा by स्वाती दिनेश
सोडा घातला की वडे तेल पितात असे वाटते
In reply to आवड आपली आपली... by प्रभाकर पेठकर
तुम्हि कोल्हापुरचे का? कारण
In reply to तुम्हि कोल्हापुरचे का? कारण by आचारी
नाही...
झकास !
ये हुव्वी ना बात !!
वडे इतके चविष्ठ झाले आहेत की
वडा पाव म्हणजे आपला विक
...
अहाहा!
फारच छान पाककृती..अवांतर -
खल्लास!!
बटाटा वड्या चा विजय असो.
बटाटा वड्या चा विजय असो.
वड्ड्यांबाबत