बटाटावडा

वाचने
15931
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
बटाटावडा नै कै, बटाटवडा म्हणायचं. (भाईकाकांनीच शिकवलंय असं म्हणायला.) :P
मी चाल्लो पाव आणायला. :)
अवांतरः स्वातीताई, रेशिपी अंमळ अपुर्ण आहे. बटाटवड्यांसोबत तब्येतीत हाणायला तळलेल्या,मीठात घोळवलेल्या मिरच्या नाहीयेत दिसत. ;)
आता उद्या वडे करणे आलचं.
खालचा फोटु लैच टेंप्टिंग आहे.
आजच सकाळि बटाटा वडा याच पध्दतिने केले होते......................
संध्याकाळी सहज म्हणून २ वडापावचा फन्ना उडवून आलोय..
- पिंगू
मस्तच....गेल्या मोठ्या विकांती मित्रमंडळी जमवून मस्तपैकी ४०-५० वडे बनवून हाणण्यात आले आहेत... त्यामुळे जास्त जळजळ झाली नाही.. ;)
बटाटेवड्याबरोबर बिया काढलेले टमाटो (धम्या असंच लिहितात ना रे ), पटले नाही.
एवढ्या साध्या पाकृची तुमच्या कडुन अपेक्षा नव्हती स्वातीतै. हे म्हणजे विश्वनाथन आनंदनं हत्ती अन उंट पटावर कसे चालतात हे शिकवण्यासारखं झालं.
बाकी संध्याकाळी सहकारनगरला जाणं आलं, अगदी कोप-यावर नसलं तरी वाट वाकडी करुन जावं असं नक्कीच आहे, ( हो ना रे धमु)
In reply to बटाटेवड्याबरोबर बिया काढलेले by ५० फक्त
ते बिया काढलेले टोमॅटो नाहीत, चिरलेली लाल रंगाची भोपळी मिरची आहे.
साधी पाकृ.. ह्म्म.. कधीतरी साधं सुधं खावं माणसानं.. ;)
आणि धमु, तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, तळलेल्या, मिरच्या हव्यातच पण.. इथे आमच्याकडे मिरच्या आणायच्या झाल्या तरी लै लांब जावं लागतं आणि रविवारी वडे करायची हुक्की आली तर 'भारत बंद' सारखी स्थिती असते त्यामुळे .. :(
स्वाती
In reply to टोमॅटो by स्वाती दिनेश
'ते बिया काढलेले टोमॅटो नाहीत, चिरलेली लाल रंगाची भोपळी मिरची आहे.' - हे आमचं असं भलं मोठ्ठं अज्ञान आहे याबाबतीत; ते अधोरेखित झालं पुन्हा एकदा.
'साधी पाकृ.. ह्म्म.. कधीतरी साधं सुधं खावं माणसानं.. ' - आम्ही भले खाउ ओ, (तसं आमच्या स्वाक्षरीतच लिहिलं आहे), पण स्वाति दिनेश या आयडिच्या नावाखाली बटाटेवडे ही पाकृ खुपलीच डोळ्यात..
तोंडाला पाणी सुटले... :) :)
In reply to तोंडाला पाणी सुटले... by सुहास झेले
अगदी जिव घेणारा फोटो.. :(
तोंडाला पाणी सुटले... अजून येउंदेत
तसेच खालील गाणे आठवले ;)
वेगळ काहितरी बनवा हो , हे तर आपल राष्ट्रीय खाद्य आहे (कणेकरी)
आमच्याकडे बटाटेवड्याच्या सारणात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची पाने, कांदा, मोहरी, उडीदाची डाळ, कोथींबिर, हळद, मीठ, लिंबू, साखर एवढे जिन्नस असतात.
आवडत असेल तर ओल्यानारळाचे (काड्यापेटीतील काडीच्या आकाराचे) १ सेंटी मी चे तुकडे, भाजून सालं काढलेले शेंगदाणे सुद्धा काही ठिकाणी वापरतात.
आवरणाच्या पीठात खायचा सोडा, मीठ आणि किंचित हळद घालतात. ओवा घालीत नाहीत. पीठ जरा जाडसर ठेवावे. हाताने एकाच दिशेने भराभर फेसून घ्यावे म्हणजे सोडयाची प्रक्रिया होऊन पीठ हलके होते. वडे खरपुस तळणे ही कला आहे. वड्यांचा कच्चा पिवळा रंग कमी होऊन जरा लालसर झाक येऊ लागली की वडा झाला असे समजावे.
In reply to आवड आपली आपली... by प्रभाकर पेठकर
खायचा सोडा वड्यांच्या कव्हरमध्ये, भज्यांच्या कव्हरमध्ये घालतात आणि ओवा फक्त भज्यांच्या पिठात घालतात.. पण मी पिठात सोडा घालत नाही. सोडा घातला की वडे तेल पितात असे वाटते आणि ओवा घातलेली चव आवडते म्हणून कव्हरचे पिठ भिजवताना थोडा ओवा घालते.
बाकी तुम्ही म्हणता तसेच, आवड आपली आपली. .
स्वाती
In reply to खायचा सोडा by स्वाती दिनेश
वाटते काय. पितातच.
असो.
दर वेळी तुझ्या पाकृवर वेगवेगळी प्रतिक्रीया काय द्यायची असा प्रश्ण असतोच.
त्यामुळे एव्हढीच प्रतिक्रीया
In reply to आवड आपली आपली... by प्रभाकर पेठकर
तुम्हि कोल्हापुरचे का? कारण त्या भागात उडदाचि डाळ घालतात वड्या मध्ये
In reply to तुम्हि कोल्हापुरचे का? कारण by आचारी
माझं आयुष्य मुंबई-पुण्यात व्यतित होत आहे (मधे मधे मी अरबस्थानातही असतो).
कालच कावेरीत मस्त वडे हिडकलेले आहेत.
ये हुव्वी ना बात !!
:)
वडे इतके चविष्ठ झाले आहेत की पहिल्या फोटुतले ९ वडे मी हादडल्याने दुसर्या फोटुत फकस्त २ शिल्लक राहिले आहेत... ;)
( जास्त हवरटपणा बरा नव्हे म्हणुन ते २ वडे शिल्लक ठेवले आहेत. ;) )
वडा पाव म्हणजे आपला विक प्याईन्ट.........
फोटो खरच छान आहेत..
पण डागदरनी वडापाव खायला बंदी घातली आहे इतके मी पोटाचे हाल केलेत...
कोपर्यावर जाऊन चटकन वडापाव खाणं सहज शक्य असुनही पाकृ वाचली :)
मी कधीतरी रुचीपालट म्हणून बटाट्यांसोबत बारीक चिरलेला कांदाही घालतो आणि मग फोडणी देतो.
शिवाय फोडणीत कडीपत्ता चुरून घालतो. म्हणजे मधेमधे तोंडात येत नाही आणि चवही मस्त लागते.
या शिवाय क्वचित चवीत वेरीएशन म्हणून कधी फोडणीत कोथिंबीर घालतो तर कधी मेथीचे दाणे घालतो. कधी बटाट्यांसोबत थोडासा (वास येण्यापुरता) पुदीना घालतो. प्रत्येकाचा स्वाद, वास वेगळा असल्याने वडे नेहमीचेच असले तरी त्या त्या काँबिनेशनची वेगळी मजा येते.
अवांतरः वडे जरा गोरे गोरे दिसताहेत ;) जरा जास्त तळायला हवे होते असे वाटले
फारच छान पाककृती..
अवांतर - एखादा धनाढ्य बांधकाम व्यावसायिक/किंवा कॉर्पोरेट प्रायोजक शोधतो आणि अशा चवदार वड्यांचा एमएमआरडीएच्या मैदानावर एखादा स्टॉल लावीन म्हणतो. तिथे तूर्तास अण्णांचे उपोषण सुरू असले, तरी त्या उपोषणाला हजेरी लावणार्या जनतेची खाण्यापिण्याची चंगळ व्हावी याकरता अण्णा 'टीम'ने तिथे काही स्टॉल्सना परवानगी दिली आहे. असा स्टॉल लावून सदर पाककृतीतील अत्यंत चवदार वड्यांचा आस्वाद उपोषणाच्या उत्सवातील काही टोपीवाल्यांना व मेणबत्तीवीरांनाही चकटफू घेता यावा इतकाच आमचा उदात्त हेतू आहे!
--कॉमॅ.
खल्लास!!
बटाटा वड्या चा विजय असो.
जियो.....
बटाटा वड्या चा विजय असो.
जियो.....
ही तर ए क द म साधी रेसिपी आहे
आम्ही हि तर घ री च करतो
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! !
स्पेलिंग मिश्टेकै.