मिपाची विडंबिक परिस्थिती ढासळत आहे काय?
In reply to चायला काय आहे हे? by llपुण्याचे पेशवेll
In reply to दुवा दिसत नाही. पण वर जे काही by यकु
In reply to दुवा दिसत नाही. पण वर जे काही by यकु
In reply to दुवा दिसत नाही. पण वर जे काही by यकु
विडंबनं होतं नाहीयेत याचं कारण इथे काही काळापूर्वी आश्रयाला असलेली ट्रोल्सची जमात दुसरीकडे गेली आहे हे पहिलं कारण.अरेरे, मज्जाच मज्जा करणारी जमात निघून गेल्यावर मिसळपावचं विडंबन खातं ओस पडायला लागलं हे ऐकून वाईट वाटलं. ती मंडळी गेल्यावर मग त्यांना ट्रोल्स म्हणण्याचं कसब आवडलं. (स्वगत - हा नवीन शब्द कुठे शिकला असावा बरे?)
पण तिथे सगळेच पंडीत से पंडीत मिले हो गई दो-दो बात होताना दिसते.. या पंडीतांना 'हो गई दो-दो लाथ' करायचा मार्ग तिथेही आणि इथून मोठ्या तावातावाने निघून गेल्याने इथेही खुंटला आहे.अहो, त्याचं काय आहे, काहींना पंडितांची दो दो बात देखील झेपत नाही, आणि थोड्याशा सभ्य बातांनी आपले लेख उडवून टाकतात. तेव्हा कशाला उगाच लाथांच्या बाता कराव्यात?
In reply to अरेरे by राजेश घासकडवी
अरेरे, मज्जाच मज्जा करणारी जमात निघून गेल्यावर मिसळपावचं विडंबन खातं ओस पडायला लागलं हे ऐकून वाईट वाटलं. ती मंडळी गेल्यावर मग त्यांना ट्रोल्स म्हणण्याचं कसब आवडलं. (स्वगत - हा नवीन शब्द कुठे शिकला असावा बरे?)आपण लिहीलं तरच जगात प्रकाश पडतो आणि लोक शिकतात असं काही लोकांना वाटतं. जुनी खोड दुसरं काय.
अहो, त्याचं काय आहे, काहींना पंडितांची दो दो बात देखील झेपत नाही, आणि थोड्याशा सभ्य बातांनी आपले लेख उडवून टाकतात. तेव्हा कशाला उगाच लाथांच्या बाता कराव्यात?सभ्य बातांमुळे नव्हे, तर जमातीतले प्रतिसादच ठेऊन प्रतिकूल प्रतिसादांच्या 'धोरणीपणाने' एकतर मुसक्या आवळल्या किंवा प्रतिसाद काढून टाकले यामुळे काही लोकांनी लेख डिलीट केले असतील.
In reply to जबरदस्त निरिक्षण आणि विडंबन, by ५० फक्त
चिकन निजामी : (चिकन निकामी) ग्लु वाईन : (गू खाईन) ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..! : (ने मजसि परत मद्यभूमिला... बेवड्या प्राण तळमळला) पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न : (पापसंगतीतलं एक रंगेल रत्न) सचिनचा मार्ग 'मोकळा' : (सचिनचा 'बोळा' मोकळा) मुला मुलींची नावे : (खुळा मुलींना चावे) मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..? : (मी ऑफिसमध्ये कामलालसा का करतो..?) ...यात काहीएक कौशल्य नाही - फटाफट पाच मिनिटांत सुचलेली विडंबने आहेत. जर प्रत्येक शीर्षकच फुल्लटॉस आहे, तर नुसते फटके मारण्यात काहीच खास नाही. हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेजनंतर असली सोपी विडंबने केली तर कोण भाव देईल? - - - मराठीत तर दर्जेदार विडंबनांची परंपरा आहे. माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे. "झेंडूच्या फुलां"नी तर मराठी वाचका-विडंबकाच्या हातात मस्त उदाहरणांचे पाठ्यपुस्तक दिलेले आहे. अत्र्यांनी म्हटले आहे, की त्यांनी विडंबन मूळ केलेल्या कविता त्यांच्या आवडीच्या होत्या. (म्हणून का काय मराठी संकेतस्थळांवर "स्फूर्ती अमुकतमुक यांची अप्रतिम कविता क्षक्षक्ष" असे लिहायची सक्ती आहे. पण पुष्कळदा हा नुसता उपचार असतो.) तरी रविकिरण मंडळाच्या कवितांमध्ये काही थोडे दोष होते, ते गडद करणारी अशी त्यांची काही विडंबने होती. प्रत्येक विडंबकाने असा काही आदर्श ठेवला पाहिजे असा काही कायदा नाही. पण अत्र्यांच्या मताचे थोडे तरी मनन केले पाहिजे. आधीच सुमार दर्जा असलेल्या कवितेचे-पाठ्याचे विडंबन केले, तर त्या विडंबनाचा पोत तरी काय असणार आहे? चंद्रावरील डाग दाखवले तर कोणी निरखून बघेल. पायपुसण्यावरचे डाग मोठ्या कौशल्याने दाखवले, तर? छ्या : आधीचे कळकट, नंतरही कळकट. खास बाब अशी : झेंडूच्या फुलांतील कितीतरी विडंबने स्वतंत्र विनोदी कविता म्हणून सुद्धा उभी राहातात. कित्येकदा मला मूळ कविता ठाऊक नाही. तरी विनोदी कविता म्हणून विडंबन समजते. म्हणजे वाक्याला वाक्य, कडव्याला कडवे, असे अत्र्यांनी रचलेले नाही. उलट मूळ कविता-निबंधातील प्रत्येक कडव्यात-वाक्यात एक-एक असंबद्ध कोटी घुसवली, तर मजा येत नाही. विडंबकाच्या स्फुर्तीत काहीतरी घोटीव-घडीव एकसंध अनुभव आला पाहिजे. मिसळपावावरती (सर्व मराठी संकेतस्थळांवरील) कितीतरी लेखका-कवींना यमके जुळवणे, वृत्त सांभाळणे, कोट्या सापडणे - या सगळ्यांची हातोटी आहे. स्वत:चे लेखन करताना कविता-निबंध-कथा एकसंध बनवायची कशी, हेसुद्धा त्यांना कळते. मग विसविशीत विडंबने करताना त्यांच्या आतला क्वालिटी कंट्रोल गप्प कसा बसतो, हे मोठे कोडे आहे. अहो कुशल विडंबकांनो! रला ट जोडणारी आणि (माझ्यासारख्याला सुद्धा जमणार्या : वरची यादी बघा) स्वस्त कोट्यांनी बरबटलेली विडंबने का करता? ते काम माझ्यासारख्यांकरिता सोडा. वाचकांनी कीव म्हणून दिलेल्या फोपशा शाबासक्या आम्हाला मिळवू द्या. मिसळपावावर (सर्व मराठी संकेतस्थळांवर) दर्जेदार विनोदाची जाण आणि तहान असलेले कित्येक वाचक आहेत. त्यांच्यासाठी तुमचे कौशल्य खर्च करा. अशी कळकळीची (द्वैवार्षिक) विनंती आहे. - - - मी केल्यासारखे (साध्यासुध्या) अर्थशास्त्रीय निबंधाचे विडंबन करणे म्हणजे खरोखर अस्थानी खटाटोप आहे. अर्थशास्त्र म्हणा, भौतिकी म्हणा, रसायनशास्त्र म्हणा... यांच्यात यमक-किंवा-अनुप्रास जुळवून दारू-वेश्या वगैरे कथानक घुसवणे किती सोपे आहे, ते मी वर दाखवलेच आहे. सोपे आहे, म्हणून प्रशस्त आहे काय? या संबंधात माझा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या तरुण वयातली गोष्ट आहे. एकदा कंपूमधील एक गिटारवादक काही तंत्र समजावून सांगत होता. छान सांगत होता, आणि आम्हा सर्वांना त्याचे बोलणे आवडतही होते. बोलताबोलता त्याने सांगितले की "गमकाकरिता चांगली wrist action लागते". आणि आमच्यापैकी एक जण म्हणाला - "हो, हस्तमैथुनात पण wrist action चांगली असावी लागते." सगळेच हसू लागले. कोट्यांवर लैंगिक कोट्यांची चढाओढ सुरू झाली. संगीताचा विषय बंद पडला. पण "wrist" आणि "action" हे साधे शब्दच जर फुल्लटॉस समजून विडंबनाचे षटकार मारू लागलो, तर काय होईल? गमक-मींड विरुद्ध हस्तमैथुनाच्या चढाओढीत हस्तमैथुन नेहमीच जिंकेल. त्या दिवशी हस्तमैथुनाबाबत विनोदात मजा आली, हे मान्य करतो. पण संगीताचा विषय बंद झाला, हा तोटा झाला, असेही मला वाटते. ज्या मित्राला त्या दिवशी हस्तमैथुनाची कोटी सुचली, त्याने संयम राखला असता, तर बरे झाले असते. कारण संगीताबद्दल मस्तपैकी गप्पा जमण्याचा योग रोज येत नाही.
In reply to माझा वार्षिक-द्वैवार्षिक रतीब by धनंजय
In reply to माझा वार्षिक-द्वैवार्षिक रतीब by धनंजय
In reply to माझा वार्षिक-द्वैवार्षिक रतीब by धनंजय
In reply to विडंबंकांचं विडंबन by राजेश घासकडवी
मला तरी असं वाटतं की सोपं म्हणजे भंकस किंवा अत्यंत कष्ट घेऊन केलेलं म्हणजे कल्पक व स्तुतीस पात्र असा सरळ सरळ हिशोब लावता येत नाही.माझ्या मुद्द्यांशी विसंगत, तुमचा गैरसमज झालेला आहे. मी म्हटलेले आहे : "माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे." कल्पक असणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट आहे. डाव्या शेपटीचा मारुती मला आवडल्याचे मी तेव्हा म्हटले होतेच. पण त्या विडंबनात कथानक सुसंगत करण्याचे "कष्ट" घेतले होते. नुसते दोन शब्द बदलून बाकी वाक्यांची जोडणी करायची सोडून दिली असती, तर ते बेढब राहिले असते. पुन्हा स्पष्ट करतो : "कष्ट" घेण्याचा उदो-उदो मी करत नाही आहे. बेढबपणा नाही, याची काळजी घेतली, याची प्रशंसा करतो आहे.
विडंबनामागचा विडंबकाचा हेतू लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं.होय. त्याच प्रमाणे मी गातो तेव्हा माझ्या मनात सुरेल-तालबद्ध गायचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. (पण मी गातो ते बरेच बेसुरे आणि बेताल आहे ते कुठल्या हद्दीपर्यंत खपवून घ्याल? पूर्णपणे दुर्लक्ष करणार असाल, तर माझ्या ध्वनिफितींचा संच विकत घ्या - पुट वन्स मनी व्हेर वन्स माऊथ इझ ;-) )
दुसरा टीकेचा मुद्दा असा वाटतो की एकंदरीतच विडंबनांचा सुकाळ झाला असल्यामुळे या प्रकाराचा कंटाळा आला आहे. ... आता बार थोडा उंच झाला आहे. मानदंडच थोडे लांब झाले आहेत.नेमके असे नव्हे. माझा मानदंड गेल्या पाच वर्षांत फारसा बदललेला नाही. ज्या लेखक-कवींचे आणि रसिकांचे बिगर-विडंबन रचनांसाठीचे अंतर्गत मानदंड बुलंद आहेत, तेच विडंबनासाठी इतके तोकडे मानदंड कसे काय वापरतात, हे माझे अरण्यरुदन आहे. आणि २००८ सालापासून मी हे रडगाणे रडत आहे.
मात्र अत्र्यांनी केलेली सर्वच विडंबनं श्रेष्ठ होती असं नाही. काही उत्कृष्ट होती, काही छान होती, काही सुमार (केशवसुमार यांच्या नावाचा इथे काहीही संबंध नाही) होती.अर्थात. पण हे ना धड इथे ना तिथे. त्यातील उत्कृष्ट विडंबनांबाबत वरील संदर्भ आहे. आणि त्यांच्या स्वतः केलेल्या विडंबन-विश्लेषणाचा संदर्भ आहे.
सुमार विडंबनाच्या अतिरेकापोटी चांगल्याला त्या सुक्याबरोबर जाळणं योग्य नाही. ... मला खात्री आहे की अत्र्यांची झेंडुची फुले मधील वीस चांगली विडंबनं घेतली तर त्याला दर्जाच्या बाबतीत जवळ जाणारी विडंबनं मिपावर शोधून सापडतील.हा मुद्दा मुळीच माझ्या मुद्द्यांशी संबंधित नाही. सुके आणि ओले यांच्यात काही लेखक-कवी खुद्दच क्वालिटी कंट्रोल करत नाहीत. अशी तक्रार आहे. सुक्याबरोबर मी ओले जाळत नाही आहे. सुक्या-ओल्यामध्ये फरक हवा तसा होत नाही, अशी माझी तक्रार आहे. - - -
आता प्रस्तुत लेखकाने केलेलं विडंबन हेदेखील जाणूनबुजून त्याच 'सोप्या' विडंबनांतच बसतं, मात्र लेखकाचा उद्देश कळल्यावर त्याची व्यापकता जाणवते.प्रस्तुत विडंबनाबाबत प्रशंसा जर "सेकंड ऑर्डर" असेल तरच मान्य आहे. "फर्स्ट-ऑर्डर"मध्ये प्रस्तुत विडंबन भिकार आहे. प्रस्तुत विडंबनात कित्येक वाक्ये निष्काळजी आहेत, इतके, की कित्येक शब्द वाक्यातील आदल्या-मागल्या शब्दांशी असंबद्ध आहेत. उदाहरणार्थ :
आक्रमकपणे परकीय बदचलन विकत घेण्याच्या प्रयत्नात बुधवाराच्या बाजारामधील चलन कमी होईल, त्याचे परिणाम बायकांच्या गंगावनांवर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (कुंटिणींना कपडे मिळणे इ.) दिसू लागतील."गंगावन" हा मुळातल्या "गंगाजळी"च्या ठिकाणी अनुप्रास साधून घातलेला आहे. "कुंटिणींना कपडे मिळणे" हे मुळातल्या "कंपन्यांना कर्जे मिळणे" याच्याशी अनुप्रासाने योजलेले आहे. पण पूर्ण वाक्यातून कुठले विनोदी कथासूत्र कळते आहे? ही रचना विनोदाची कुचंबणा करणारी आहे. अर्थातच मी ही रचना मुद्दामून गचाळ केली आहे. "हा बेढबपणा हेतुपुरस्सर आहे, हे कळले. अशा प्रकारच्या असंबद्ध लिखाणात विनोदाचा खून पडतो हे उलगडून दाखवले आहे" अशी तुमची प्रशंसा असेल, तरच ती मान्य आहे.
In reply to नाही - सोपेपणा हा दोष नाही by धनंजय
In reply to प्रतिसाद जास्त आवडले by पैसा
In reply to नाही - सोपेपणा हा दोष नाही by धनंजय
१. मूळ प्रतीचा दर्जा चांगला असणे, मगच त्यातील विरूपता दाखवण्यात हशीलपण त्यात विडंबन हे नेहमीच बांडगुळाप्रमाणे मूळ कलाकृतीवर जगणारं असावं असं काहीसं येतं. माझ्या मते तुम्ही आधी अत्र्यांचं केलेलं कौतुक हे जास्त लागू ठरतं - मूळचे संदर्भ विसरले असले तरी ती स्वतंत्र विनोदी कविता म्हणून उभी राहिली पाहिजे. मूळ प्रतीतली विरूपता दाखवणं हेच केवळ रेसॉं दे ऐत्र असेल तर मूळ कविता किंवा लेख विस्मृतीत गेल्यावर विडंबनाचाही आत्मा नष्ट होईल. म्हणून मला विडंबन हे मूळ कृतीचा आधार घेऊन उभं राहिलेली पण स्वतंत्र विधानही करणारी कृती मानायला आवडते. मग मूळ प्रतीच्या दर्जाची अट थोडी ढिली होते.
२. विडंबनामध्ये एकसंधता असायला हवी - नुसते खिळखिळे भाग नकोत (मी पाच मिनिटांत केलेली शीर्षकांची विडंबने म्हणूनच हिणकस आहेत. सोपेपणामुळे नव्हेत.)हे मान्य.
३. विडंबनातील फक्त फिदीफिदी हसवणार्या विनोदामुळे आदली चर्चा खुंटणार असेल, तर विचार करावा : त्या फिदीफिदी हसण्याचे मूल्य मूळ विषयाच्या मूल्यापेक्षा अधिक आहे काय?फिदीफिदी हसण्याला इतकं कमी लेखलं का जातं हाच प्रश्न मला विचारावासा वाटतो. विनोदाला कायमच गौण स्थान मिळतं. उत्कृष्ट दर्जाचा विनोद करणं हे उत्तम शोकांतिका लिहिण्याइतकंच कठीण असतं. पण तरीही समर्थांनी म्हटलेलं 'टवाळा आवडे विनोद' लागू होतं. आत्तापर्यंतच्या साहित्याच्या पुरस्कारांची यादी बघितली तर विनोदी लेखकांची अतिरेकी वानवा दिसते. मला वाटतं हा कळीचा मुद्दा आहे. जर विनोदाला क्षणभर खिदळणं यापलिकडे मान मिळत नसेल, तर त्यातून कल्पकतेची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे?
ज्या लेखक-कवींचे आणि रसिकांचे बिगर-विडंबन रचनांसाठीचे अंतर्गत मानदंड बुलंद आहेत, तेच विडंबनासाठी इतके तोकडे मानदंड कसे काय वापरतात, हे माझे अरण्यरुदन आहे.या प्रश्नाचं उत्तर विडंबनाकडे बघण्याचा, फक्त फिदीफिदी हसण्याच्या अपेक्षेतच दडलेलं आहे असं वाटतं. आता साधं उदाहरण देतो. पुलंनी विनोदी लेखन केलं, तसंच वैचारिक विडंबक लेखनही केलं. फार लोकांना माहीत नसेल, पण एकअक्षरकळलतरशपथ हे सौंदर्यवाचक विधान ही मर्ढेकरांच्या सौंदर्याची व्याख्या करण्याच्या प्रयत्नाची टिंगल आहे. मात्र त्यांना पुरस्कार मिळाला तो त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली सारख्या 'हृद्य' समजल्या जाणाऱ्या पुस्तकाबद्दल. ते पुस्तक वाईट आहे अशातला भाग नाही. पण आइन्स्टाइनला सापेक्षतावादाच्या सिद्धांताबद्दल नोबेल न मिळता फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल मिळावं तसंच हे अस्थानी. वाचकांच्या अपेक्षेप्रमाणेच माल मिळाला तर त्यावर नक्की तक्रार कसली करावी?
In reply to पटण्यासारखं पण... by राजेश घासकडवी
या प्रश्नाचं उत्तर विडंबनाकडे बघण्याचा, फक्त फिदीफिदी हसण्याच्या अपेक्षेतच दडलेलं आहे असं वाटतं.मला प्रत्येक विनोद हीन दर्जाचा वाटतो - प्रत्येक हसणे हे मला "फिदिफिदी हसणे वाटते" या गुप्त शोधावर तुम्हाला हे दडलेले उत्तर सापडले आहे. पण तो गुप्त शोध होण्यापूर्वी माझे स्पष्ट शब्द अप्रामाणिक मानावे लागतात, आणि मी सांगितलेला प्रसंग संदिग्ध मानावा लागतो. (त्याच्या पुढचे पुलंनी केलेल्या विडंबनाचे उदाहरण विनोदाचा सार्वत्रिक शत्रू असलेल्यासाठी लागू आहे. तुम्हाला सापडलेले दडलेले उत्तर मला लागू नाही ही माझी ग्वाही मान्य करा, अशी विनंती. पुलंचेच "खुर्च्या" हे विडंबन मला उत्कृष्ट वाटते, अशी तुमची-माझी बहुधा चर्चा झालेली आहे - खरडचर्चा नसेल, तर प्रत्यक्ष चर्चा झाली आहे.) कदाचित "फिदीफिदी हसणे" आणि "हसणे" यांच्यामध्ये जो करडा भाग आहे, तो संदिग्ध आहे, हे तुम्हाला सुचवायचे असेल. पण "ग्रे झोन आहे" हे मी मान्यच केलेले आहे. "मूळ विषयाच्या आणि असंबद्ध शाब्दिक कोटीच्या मूल्याची तुलना करून बघावी" असे काही म्हटले आहे. "तुळायचे मूल्य" हे द्वि-संख्यामूल्य असल्याचा संदर्भ कधीच नसतो. तुळायचे मूल्य जवळजवळ कंटिन्युअस-स्केलवर असते. त्यामुळे ग्रे झोन ची जाणीव पुन्हा करून देणे म्हणजे विषयांतर होते.
म्हणून मला विडंबन हे मूळ कृतीचा आधार घेऊन उभं राहिलेली पण स्वतंत्र विधानही करणारी कृती मानायला आवडते. मग मूळ प्रतीच्या दर्जाची अट थोडी ढिली होते.स्वतंत्र दर्जाबाबत होय! हेसुद्धा वर म्हटलेले आहे. पण मग ते विडंबन स्वतंत्र रचनांच्या मानदंडापुढे उभे राहिले पाहिजे. प्रत्यक्षात आणखी मोठा मानदंड लागेल. तो असा : स्वतंत्र कृतीकरिता कोणी मुद्दामून कुचकामी सांगाडा का निवडेल? शो-ऑफ करण्यासाठी. "बघा बघा, तराजूच्या एका पारड्यात माझ्या प्रतिभेची सोन्याची रास आणि दुसर्या पारड्यात भंगार सांगाडा, आणि वाहावा! भंगारापेक्षा सोने ढीगभर अधिक भरते." पण अशी शो-ऑफ करायची महत्त्वाकांक्षा असेल, तर तेवढी असामान्य प्रतिभा खरेच समोर ठेवावी लागते. दिखाऊपणासाठी स्वतःला हँडिकॅप करून घ्यायचे, आणि मग सामान्यच काही करून दाखवायचे, तर बरे दिसत नाही.
In reply to पटण्यासारखं पण... by राजेश घासकडवी
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
या चर्चेशी खूप जास्त संबंध नसेल पण तरीही...या "तरीही"चा अर्थ काय आहे? जो थोडा संबंध आहे, तो जोडण्यालायक आहे, असे तुम्हाला वाटते. मी विडंबनाचा दर्जा सुधारण्याबद्दल बोलतो (द्वैवार्षिक) आणि त्याचा थोडा तरी संबंध हुकुमशाहीच्या मुस्कटदाबीशी तुम्ही कसा लावता? हुकुमशाहीविरुद्ध केलेल्या व्यंग्यांना माझा छुपा विरोध आहे, किंवा माझ्या निष्काळजी लेखनामुळे तशा स्वातंत्र्यलढ्यांचा विरोध होतो आहे, हे तुम्हाला "तरीही" कसे काय सुचले? ऑनियन मधले दाखले दुव्यासकट मला देऊन काय साधले? दर्जेदार विनोद मी कधी वाचले नसतील, तर "इथून सुरुवात", असे हे शैक्षणिक दुवे आहेत काय? तुम्ही म्हणता
पण म्हणून एकजात सर्व प्रकारच्या विनोदाचं सरसकटीकरण करून विनोदाला कमी का लेखावं?मी काळजीपूर्वक सरसकटीकरण टाळले आहे. सरसकटीकरण न-केल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे (औपचारिक नव्हे). उदाहरणार्थ : मराठीत तर दर्जेदार विडंबनांची परंपरा आहे. माझ्या शिघ्रविडंबनांपेक्षा त्यात खूप जास्त कल्पकपणा पाहिजे. मग विसविशीत विडंबने करताना त्यांच्या आतला क्वालिटी कंट्रोल गप्प कसा बसतो, हे मोठे कोडे आहे. म्हणजे क्वालिटी कंट्रोल चालू ठेवला तर विडंबने विसविशीत राहात नाहीत, हा निर्देश. मिसळपावावर (सर्व मराठी संकेतस्थळांवर) दर्जेदार विनोदाची जाण आणि तहान असलेले कित्येक वाचक आहेत. त्यांच्यासाठी तुमचे कौशल्य खर्च करा. अशी कळकळीची (द्वैवार्षिक) विनंती आहे. हे सगळे स्पष्ट म्हटल्यावर सरसकटीकरणाचा मुद्दा कुठून उपटला?मी काहीही म्हटले, तरी खरे सरसकटीकरणच करतो, असे म्हणायचे, तर हा तर "वरची वाक्ये अप्रामाणिक आहेत" असा गंभीर आरोप आहे. या आरोपाने चिडलो हीच बाब माझ्या विनोदशून्यतेचा पुरावा म्हणून घेता येत नाही. अप्रामाणिकपणाचा आरोप केल्यास सरासरी व्यक्ती कधी हलके घेईल आणि कधी चिडेल - साधारण तितक्या प्रमाणात या दोन्ही भावना मी अनुभवू शकतो.
In reply to आरोप कुठून आला? by धनंजय
In reply to माझा वार्षिक-द्वैवार्षिक रतीब by धनंजय
In reply to माझा वार्षिक-द्वैवार्षिक रतीब by धनंजय
ने मजसि परत मद्यभूमिला... बेवड्या प्राण तळमळलायात 'प्राण तळमळला' यापेक्षा 'कान फडफडला' असं हवं. ;)
चायला काय आहे हे?