मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाची विडंबिक परिस्थिती ढासळत आहे काय?

धनंजय · · काथ्याकूट
सटायर-रायटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर मिपाची विडंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते. {([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो. http://www.misalpav.com/node/20076 कमीकमी होणारे स्तंभन, व हाताबाहेर जाणारी हातभट्टी ह्यांमुळे वाचकाच्या विडंबिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा इंटरेस्ट वाढूनही उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची लक्षणे नाहीत). ह्या कारणांमुळे तसेच विशेषतः वरिजिनल साहित्याची मागणी कोसळल्यामुळे मुळे मिपावरती कथा व कवितांमधे गुंतवणूक करणारे लेखक-कवी वेगाने गुंतवणूक कमी करीत आहेत. ह्यामुळे विडंबनावर ताण येवून ते खाली जात आहे. (गेल्या चार महिन्यात १६ % अधोगती). आपले करंटे क्रिएटिव्ह डेफिसिट, अकौंटिंगच्या ह्या वर्षाच्या (एप्रिल २०११ - मार्च २०१२), दुसर्‍या तिमाहीत, पहिल्या तिमहीच्या तिप्पटीने वाढले (सुमारे १४ यू. आर. एन. एस.). सर्व वर्षभरात ते सुमारे ५४ यू. आर. एन. एस. होईल असा अंदाज आहे. लेखांत म्हटले आहे की दर्जाची पिछेहाट थांबवण्यात सर्व लेखकांस 'इकडे आड, तिकडे विहीर' अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एका टोकास काहीच विडंबन न केल्यास मिपावर काहीच लिहिले जाणार नाही. दुसर्‍या टोकास सरधोपट विडंबने केली तरी ती स्वस्त होत जातील. आपल्याकडे सध्या सुमारे दर शब्दास पाच पाणचट प्रतिशब्दांची चलनी मुळामुठाजळी आहे खरी, पण करंटे क्रिएटिव्ह डेफिसिट व नजीकच्या काळांत इम्मॅच्युअर होणार्‍या मागणीची फेड, ह्यांत जी रक्कम खर्ची पडेल त्यानंतर जेमतेम दिवसाला वीतभर विडंबन इतकीच चलनाचा भैरोबानाला शिल्लक राहील. -उदाहरणार्थ (१)- आक्रमकपणे परकीय बदचलन विकत घेण्याच्या प्रयत्नात बुधवाराच्या बाजारामधील चलन कमी होईल, त्याचे परिणाम बायकांच्या गंगावनांवर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (कुंटिणींना कपडे मिळणे इ.) दिसू लागतील. तेव्हा ह्यातून सर्व दलालांस एक मार्ग सुचवला आहे तो बायकांचे तोकडे कपडे कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही. नजीकच्या भविष्यात सौदे अगदी ५५ च्याही खाली जातील, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे. मी कामशास्त्रज्ञ नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो. चघळचविष्ट, चर्वितचूर्ण चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही "गोळा"बेरीज "माल"मसाला दिलेला आहे. काही गरम चुटके आहेत, त्या अनुषंगाने, व आपल्याकडील माहितीवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. कॉपी-पेस्टी ढकलपत्रे मांडायची असली तरी ती चटकदार असावी. -उदाहरणार्थ (२)- तसेच आगेमागे परकीय दारू घेण्याच्या प्रयत्नात देशी दारूची नशा मिळणार नाही, त्याचे परिणाम गुत्त्यांच्या "गंगा"जळावर व त्यानंतर सर्वच व्यवहारांत (चखणा चरबट होणे इ.) दिसू लागतील. तेव्हा ह्यातून रॉयल रिझर्व हातभट्टीस एक मार्ग सुचवला आहे - भट्टीतील अल्कोहल रेशो कमी करण्याची परवानगी देणे, हा. तो कितपत परिणामकारक असेल, ह्याविषयी लेखात काही म्हटलेले नाही. नजीकच्या भविष्यात अल्कोहल टक्केवारी अगदी ५५% च्याही खाली जाईल, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात आहे. मी पोचलेला बेवडा नाही, तेव्हा ह्यावर त्या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो. बरळणारी, गटांगळ्या खाणारी चर्चा अपेक्षित आहे. लेखात काही देशी खांब खर्चलेले आहेत, काही ओव्हरप्रूफ विलायती आहेत. त्या झिंगेने, व आपल्याकडील नशेवरून, ह्याविषयी चर्चा व्हावी. आपल्याच खाजगी भट्टीची खपवायची असली तरी ती पहिल्या धारेची असावी.

वाचन 18935 प्रतिक्रिया 30