मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात.
मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली.
एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले. त्याच्याकडे पाहुन त्याच्या परिस्थितीची जाणीव होत होती आणि चोरीचा आरोप तरी कसला असेल तर साखर, तादुळ आणि तुरडाळ त्याने दुकानातुन चोरली होती. आता चोरी ही चोरीच ती छोटी असो वा मोठी प्रत्येक गुन्हयाला शिक्षा ही हवीच हा भाग वेगळा, पण जेव्हा आमच्या जज साहेबानी त्याला बोलते केले तेव्हा त्याने जी गोष्ट सागितली त्यामुळे डोळे पाणावले.
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. त्याचा लहानगा रडुन रडुन बेशुध्द व्हायचा बाकी होता, हा गुन्हेगार हतबल होता पैसा नसल्याने विकत काही घेता ही येत नव्हते, त्याच्याकडे पाहुन उधार ही कोणी देत नव्हते मग त्याच्यातील पिता त्याला स्वस्थ बसु देईना, म्हणुन त्याने साखर, तादळ आणि तुरडाळ चोरली होती. आणि तो त्यामध्ये सापडला होता, त्याला जामिन ही कोणी नव्हते त्यामुळे त्याची रवानगी जेल मध्ये झाली. त्याची बायको आणि लहानगा कोर्टाच्या बाहेर बसुन होते, आम्ही सगळ्या स्टाफने काही पैसे काढुन त्या बाईला दिले आणि आमच्यातील एका शिपायाने त्या बाळाला एक ग्लुकोज बिस्कीतचा पुडा आणुन दिला. तेव्हा तीच्या चेह-यावर झालेला आनद अजुन माझ्या चेह-या समोर आहे तीला पैसे दिल्या पेक्षा आपल्या मुलाला कोणी तरी खाऊ आणुन दिला हे समाधान दिसत होते आणि त्यामुळे तीचे अश्रु वाहत होते.
आमचे जज साहेब ही माणुसकी राखुन होते त्यानी मला त्याच्या केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले मला अन्नासाठी केलेली चोरी मनाला दुखावते, मी ह्या जजच्या नात्याने एका चोराच्या फेमिलीला मदत करू शकत नाही त्यावेळी त्याना थाबवत मी त्याना सागितले की आम्ही स्टाफने काही रक्कम आणि त्याच्या लहानग्याला खाऊ दिला आहे. तेव्हा त्याच्या चेह-यावर आपला स्टाफ बद्दल अभिमान वाटला हे लगेच दिसुन आले.
मी कोर्टात असताना अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत की पोट्याच्या भुकेसाठी आणि अधश्रध्दा ह्या गोष्टी साठी माणुस कोणत्या ही थराला जातो.
अशीच एक अधश्रध्दे मुळे एका काकाने आपल्या पुतण्याचा खुन केला होता एका मात्रिकाच्या सागण्यावरून.
त्या गुन्हेगाराला समोर आणले तेव्हा त्याच्या चेह-यावरील भाव इतके विचित्र होते कीत्याला ह्या गोष्टी बद्दल काहीच पश्चतावा झालेला दिसत नव्हता.
त्याला कोणत्या तरी मात्रिकाने सागितले नरबळी दिलास तर तुला गुप्त धन मिळेल ह्या गुन्हेगाराने मग आपल्याच घरातल्या मोठ्या भावाच्या मुलगा जो शाळेत इ. ४ होता त्याला सायकल वरून शाळेतुन मधुनच घेऊन आला आणि काकाच आला आहे न्यायला म्हटल्यावर हा मुलगा ही त्याच्या बरोबर गेला तर काकाने असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. ज्याची एफ.आय.आर. वाचतनाही तळ पायाची आग मस्तकाला जात होती. पुढे त्या केस मध्ये त्यालाही कदाचित जन्मठेपची का फाशीची शिक्षा झाली हे आता आठवत नाही कारण असल्या केसचे निकाल डिस्ट्रीक, हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्टा पर्यत फे-या मारून मग लागतात. त्यामुळे समाजात ह्या गोष्टीची भिती उरत नाही कारण लोकाच्या डोक्यातुन अनेक वर्षाने ही गोष्ट पुसट झालेली असते त्यामुळे त्याचे गाभिर्य रहात नाही आणि त्याला झालेली शिक्षा ही जसा गुन्हा पसरतो तशी पसरत नाही.
वाचने
29034
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडला
>>गरीबी
ऑफ्कोर्स
माझे मत
शहानिशा
असेच म्हणतो
In reply to शहानिशा by मनस्वी
शिक्षा
नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते.
अगोदरच
सहमत आहे ...
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच!
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
म्हणजे काय नक्की ?
In reply to भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
"तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............
In reply to म्हणजे काय नक्की ? by छोटा डॉन
नोकरीच का ?
In reply to "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............ by कुंदन
दुष्टचक्र
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
डॉन राव ....
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
मग फरक तो काय रहिला?
सहमत
In reply to मग फरक तो काय रहिला? by छोट्या
जर
In reply to सहमत by इनोबा म्हणे
मुद्दा गैरलागू कसा?
In reply to जर by विसोबा खेचर
दाद!
In reply to मुद्दा गैरलागू कसा? by रम्या
.
In reply to दाद! by विसोबा खेचर
बरोबर
ज्याला
In reply to बरोबर by अन्या दातार
सरकारने
In reply to ज्याला by श्री
सहमत
निश्चित पणे
?
In reply to निश्चित पणे by मराठी_माणूस
सरकारि
In reply to ? by विसोबा खेचर
सरकारि
In reply to सरकारि by मराठी_माणूस
लागेबांधे
In reply to सरकारि by विसोबा खेचर
वरच्या
In reply to लागेबांधे by मराठी_माणूस
असहमत...
In reply to ? by विसोबा खेचर
सहमत
In reply to असहमत... by छोट्या
कशावरून?
In reply to सहमत by इनोबा म्हणे
भारताचा कायदा
In reply to कशावरून? by विसोबा खेचर
अरे,
In reply to भारताचा कायदा by आनंदयात्री
>>असे
का बरे ?
In reply to >>असे by शिप्रा
समर्पक उत्तरं..
In reply to का बरे ? by छोटा डॉन
किति घाइ
घाई ? कुणाची ? तुमची की माझी ?
In reply to किति घाइ by शिप्रा
एक अवांतर किस्सा
मनस्वी
In reply to एक अवांतर किस्सा by मनस्वी
>>अजुन एकदा
ठोsss ठोsss ठोsss
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
काय बोलु बॉ ???
In reply to ठोsss ठोsss ठोsss by आनंदयात्री
जिंदादीली
In reply to काय बोलु बॉ ??? by छोटा डॉन
धन्यु ... धन्यु ...
In reply to जिंदादीली by आनंदयात्री
>>सरळ चर्चा
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
सारि :)
काही विश्लेशन.
पुढच्या
In reply to काही विश्लेशन. by शितल
सर्वाचे आभार.
मला वाटते
सहमत...
In reply to मला वाटते by वरदा
अग खरच ग वरदे,
In reply to मला वाटते by वरदा
विचार करायला लावणारा प्रश्न
खूपच अभ्यासपुर्ण प्रतिक्रीया
In reply to विचार करायला लावणारा प्रश्न by सुचेल तसं
नानावटी खुन खटाला.
कायदा
खर्॑च.
धरावी आणि धरली जाते देखील!
हममममम.....................
गुन्ह्याम
गुन्हा हा
कायदा बदल आवश्यक
चुकांचे समर्थन करू नये....
ती धरली जातेच.