ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन
बीयरचा कॅन उघडुन त्यातुन चांगले २-४ मोठ्ठे घोट रिचवावे. पण आवडते म्हणुन सगळी गट्टं करु नये. अर्धी शिल्लक ठेवावी. (थोडीशी सावधानी म्हणुन म्हणुन एक एक्स्ट्रा कॅन बाजुला ठेवलेला आहे हे चणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल ;) ) हा तर काय म्हणत होतो, दोन घोट मारल्या नंतर कॅनला वरुन २-३ भोके पाडुन घ्यावीत.
जो थोडा फार मसाला उरला असेल तर तो त्या कॅनमध्ये रिकामा करावा. एकदम भक्सन टाकुनये. अन्यथ्या ती बीयर, कोण्या अडाण्याने मीठ मसाला टाकला ते पहायला लगेच बाहेर येईल. आणि तुम्हाला नसता त्रास सहन करावा लागेल.
ओव्हन मधील उष्णतेने कोंबडीतील आर्द्रता कमी होऊन ती वातड होते. बीअर वापरल्याने ही आर्द्रता टिकुन रहाते. शिवाय तिच्यातील मॉल्ट आणि यीस्टच्या रासायनीक प्रक्रियेमुळे कोंबडीची चामडी पातळ आणि क्रिस्पी होते.
तरी ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल.
खालील ईडो मध्ये कोंबडी आतुन किती मॉईस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
वीसु :
* धाग्याच शिर्षक आणि काही फोटू पाहुन अश्लील अश्लील म्हणुन ओरडणार्यांना आधीच योग्य त्या जागी मारण्यात आले आहे.
** ही पाककृती अंडे घालुन करता येईल पण ज्याच्या त्याचा जवाबदारी वर हे पाऊल उचलावे.
*** कोंबडीला पर्याय म्हणुन शाकाहार्यांनी कुठलीही भाजी (उदा. भोपळा / कोहळं / दुधी) घ्यायची असल्यास होणार्या कलाकृतीला तो स्वत:च जवाबदार असेल. मागाहुन धागाकर्त्यास बोल लावू नयेत.
In reply to दंडवत by नंदन
In reply to दंडवत by नंदन
In reply to दंडवत by नंदन
ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढणार्या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही.या काळात तू काय केलंस? तो एकच अवांतर टिन पुरला, की दुसरं काही होतं? ;)
In reply to अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ by पाषाणभेद
In reply to गणपाशेठ, पुढच्या जन्मी आमचे by Nile
In reply to असा ही मांसाहारी नाहीच मी, by ५० फक्त
ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेलसफरचंदाचा स्वाद असणारी गोडसर वूडचक बीअर मला अतिशय आवडते. कदाचित तिचा वापर केल्यास पाककृती चविष्ट होईल.
In reply to बम चिक चिकं बम, बम बम चिकं by अत्रुप्त आत्मा
धिस इज द लिमिट!या बिकांच्या वाक्याशी शतशः सहमत. मसाल्याचे उटणे, ऑलिव्ह ऑईलचा मसाज आणि बीयरची आंघोळ अशी सगळी कोंबडीची बडदास्त आहे हे वाचून आधी खूश झालो पण आठवा फोटो पाहिल्यावर कोंबडीची कीव आली. असो. नंतर 'तयार' झालेली कोंबडी पाहून मात्र "हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त" असं झालं. कोंबडीला अदेह आणि तिला खाणार्याला सदेह स्वर्ग दाखवणार्या गणपाभाऊंचा जाहीर सत्कार करण्यात यावा आणि त्यांची बल्लवाचार्य ही पदवी अपग्रेड करून बल्लवेंद्र अशी नवी पदवी त्यांना देण्यात यावी असा प्रस्ताव मांडून माझे लाळेत लडबडलेले दोन शब्द संपवतो.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to मला पण "चला! आता इथे चिकन / by बिपिन कार्यकर्ते
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
शिर्षकात 'बम' वैग्रे शब्द बघूनच संताप आला. पण गणप्या हा मिपावरचा बाब्या आणि कंपूचा लाडका असल्याने शिर्षकाचे सुद्धा कौतुक होणार हे निश्चित.एखाद्या नरभक्षक जमतीने ह्या पासून प्रेरणा घेवन असले उद्योग केले तर गणापाजींच फालतू कवतिक करणारे मीपा(कर) त्याला जबाबदार असतील सांगून ठेवतोय :)
In reply to शिर्षकात 'बम' वैग्रे शब्द by माझीही शॅम्पेन
In reply to गणपा by सोत्रि
In reply to भन्नाट पाकृ. बियर पीत नाही, by Mrunalini
In reply to अगं मृणालिनी बियर उडून जाते. by स्वाती२
In reply to अगं मृणालिनी बियर उडून जाते. by स्वाती२
बियर उडून जाते.स्वाती तै अशी कशी बिअर उडून जाइल? ती कोंबडी काय उगाच ट्म्म फुगलीय का? व्हिडीओ बघितला नाहीत का धाग्यातला? कोंबडी कापल्यावर कशी बियर पाझरतेय ते बघा. :) तरी बर गणपाने कोंबडीचे पंख कापुन तीथे फॉइल पण गुंडाळली होती, नाहीतर बियर बरोबर कोंबडीपण उडाली असती ;) - (न उडणारी बियर पिणारा) सोकाजी
ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका रे$$$$
बारा महीने मे बारा तरीकेसे तुझ्हको प्यार जतांउंगारे 
In reply to गणपाला by चतुरंग
In reply to ''कुकभास्कर' पदवी देण्यात by पाषाणभेद
In reply to इथे काय लिहावं कळेना! by पैसा
In reply to बियर ऐवजी सोडा वगैरेही चालतो by गवि
बियर ऐवजी सोडा वगैरेही चालतो म्हटल्यावर स्पेसिफिकनेसच गेला. मग काय पाणीही चालेल असं वाटलं.ह्याच चाली वर असेही म्हणतो की देशी कोंबडी घेतलीत आणि बियर ऐवजी देशीच वापरलीत तर कोंबडी सोबत तुम्हाला ही झिंगण्याचे समाधान मिळू शकेल. काय म्हंता? ;) शंकेच निरसन माझ्यापरीने : निदान माझ्या बाबतीत तरी कॅन वेडा वाकडा झाला नाही. की त्यावरील रंग उडाला नाही. सगळ काही ठिक ठाक जागच्या जागी शाबुत होत. हा कधी कधी कोंबडीचा तोल जाऊन ती कॅन सहीत आडवी होण्याची शक्यता असते, तेव्हा जर तुमच्या शहरात वर एका चित्रात दाखवलय तसा स्टँड मिळाला तर उत्तम त्यात मध्य भागी कॅन ऐवजी एखादा पेला ही ठेऊ शकता म्हणजे तुम्हाला जी अॅल्युमिनीयम बद्दल शंका आहे ती ही दुर होईल. :)
In reply to बियर ऐवजी सोडा वगैरेही चालतो by गणपा
दंडवत