प्रिय माधुरीस
प्रिय माधुरीस,
तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते. त्यानंतर त्याच शिनेमात लोठिया पठाणचा अड्डा उध्वस्त करुन मुन्नाबरोबर जाणारी प्रचंड धास्तावलेली, घाबरलेली मोहीनी तु साकारलीस आणि तुझ्या अभिनय क्षमतेची चुणुक दिसली.
त्यानंतर तुझे सिनेमे येत गेले आणि तु तुझ्या अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्याच नव्हे तर तमाम चाहत्यांच्या काळजाचा तुकडा बनत गेलीस. दाक्षिणात्य ताराकांच्या दाक्षिणात्य हिन्दी उचारांनी बॉलीवुडमधे बडबड करुन सुपरस्टारपद मिळवण्याच्या मालिकेला सुरुंग लावुन तु बॉलीवुडची अनभिषिक्त साम्राज्ञी बनलीस ते केवळ तुझ्या अभिनय, नृत्य क्षमतेने आणि मधाळ हसण्याने.
अनिल कपुर ह्या तगड्या अभिनेत्याबरोबर तु अभिनयाची तितकीच तगडी टक्कर देउन तु राम - लखन, परिंदा, खेल, जिंदगी एक जुआ, बेटा ह्या सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिलीस. प्रेम-प्रतिज्ञा, दिल बेटा, दिल तो पागल है, देवदास ह्या चित्रपटांमधुन फिल्मफेअरच्या बाहुलीला जिंकलस! तुझ्या मादकतेने घायाळ करत करत तु असंख्य गाण्यांवर उन्मादक नृत्य करत करोडो लोकांच्या दिल की धडकन बनलीस. तुझ्या ह्या गाण्यांमुळे संस्कृती रक्षकांनी अश्लील - अश्लील म्हणुन तुला आणि तुझ्या नाचाला टीकेचे लक्ष केले. मी आणि करोडो चाहत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तुही त्या टीकेला भीक घातली नाहीस.
तुझ्या मधाळ हसण्याने, नितांत सुंदर अभिनय आणि नृत्य क्षमतेने माझ्या हृदयावर राज्य करीत असल्यामुळे तुझ्या अनेक प्रमादांकडे डोळेझाक केली. वर्दी सारखा चिल्लर सिनेमा तु केलास. दयावानसारखा चित्रपटात थिल्लर भुमिकाही केलीस. चुकुन तु संजय दत्तच्या प्रेमातही पडलीस (पण त्यातुन सावरुन तु सुखरुप बाहेरही आलीस) हे सगळे मी माफ केले. कह दो के तुम हो मेरे वरना, धक धक करने लगा, हमको आजकल है किसक इंतजार, मुझको चांद लाके दो ह्या आणि अश्या अनेक गाण्यांमधील तुझ्या अदांपुढे हे सगळे प्रमाद काहीच नाही. देवदास तर केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या लाजवाब अभिनयामुळे दर्शनिय आणि लक्षणीय झाला.
त्यानंतर अचाकन तु श्रियुत नेन्यांना आपले करुन अमेरिकेत निघुन गेलीस. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे (लग्न करुन अमेरिकेत जाणे) तुही वागलीस. क़ाळजावर दगड ठेउन 'जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा' असा डोळेभरला निरोप तुला दिला. अचानक तु पुन्हा आलीस आणि नच बलिये म्हणालीस. सिनेमा चालला नाही तु परत गेलीस. काळाची पावले ओळखत परत आलीस ती छोट्या पदड्यावर. पण कुठे माशी शिंकली काय माहित. तु आलीस ते तुझा अमेरिकन "अक्सेंट" घेउन. कार्यक्रम नृत्याशी निगडीत होता त्यामुळे तुझा कार्यक्रमाचा चॉइसही बरोबर होता पण अमेरिकन अक्सेंट मात्र नाही झेपला. पण तरीही तुझे अढळपद अजुन शाबुत असल्यामुळे हेही कसेबसे सहन केले.
पण आज ही बातमी ऐकली, माधुरी मुंबइला परत येणार आणि बिग बॉस मधे येणार. मग मात्र रहावले नाही.
काय झाले आहे तुला? नेन्यांशी काही भांडण - बिंडण? अग होतात भांडणे नवरा बायको मधे त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे? की नेन्यांची डॉक्टरी नीट चालत नाहीयेय? उगाच परत येउन बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रम करुन तुझे अढळपद घालवु नकोस ही कळकळीची विनंती.
तुला एक उदाहरण देतो. आपली साधना, हो तीच तीच साधना क़ट वाली. तिने जेव्हा चित्रपट संन्यास घेतला त्यानंतर ती कधीही रसिकांसमोर आली नाही. मुलाखती दिल्या पण फोटो काढु दिले नाहीत. कारण तीचे म्हणणे होते की तीची जी छबी रसिकांच्या ह्र्दयात विराजमान आहे ती कायमची तशीच रहावी, तीला तडा जाउ नये.
अजुन काय बोलु, सुज्ञास सांगणे न लगे...
तुझा,
(बातमी वाचुन कळवळुन गेलेला) सोकाजी
वाचने
46398
वाचनखूण
प्रतिक्रिया
144
सोक्या, लेका... आपलं दु:ख
In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भांडण झाले नही
In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
चांगला फोटो शोधलाय बाकी
In reply to चांगला फोटो शोधलाय बाकी by मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ विनोद खन्ना विसरले
In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
आँ????????????????????
तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच
In reply to तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच by रेवती
हिरविणी
@-तुला एक उदाहरण देतो. आपली
In reply to @-तुला एक उदाहरण देतो. आपली by अत्रुप्त आत्मा
हॉलीवूड ने मेरील स्ट्रीपला अस
पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं...
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
वयाचा आणि प्रिय असण्याचा काय संबंध ??
In reply to वयाचा आणि प्रिय असण्याचा काय संबंध ?? by शाहिर
तत्वज्ञान नव्हे विनोद
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
बरेच
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
आपल्याला कोणी तरूण असे लिहीत
In reply to आपल्याला कोणी तरूण असे लिहीत by सोत्रि
आजोबांचा काका?
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
हॅ हॅ हॅ
एक्झिट
>>>>>अनिल कपुर ह्या तगड्या
In reply to >>>>>अनिल कपुर ह्या तगड्या by प्राजु
अंशतः सहमत
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी योग्य मूल्यमापन
In reply to अगदी योग्य मूल्यमापन by चेतन सुभाष गुगळे
गुगळे महोदय ,
In reply to गुगळे महोदय , by शाहिर
सहमत. पण
In reply to गुगळे महोदय , by शाहिर
अभिनय आणि व्याख्या
In reply to अभिनय आणि व्याख्या by चेतन सुभाष गुगळे
मला तर ब्वॉ नाना पाटेकर हा
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा,
In reply to मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा, by विनीत संखे
नक्की कळलं नाही.
In reply to मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा, by विनीत संखे
वि.सं.- एक राहीला.
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो ताई,
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
माधुरीच्या अभिनयाबद्दल मी
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
+ १
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
अगदी बरोबर. मी तर आजही तिचा
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
पुन्हा एकदा ...
In reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो ताई
In reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी माधुरीच्या नम्रपणाविषयी
In reply to मी माधुरीच्या नम्रपणाविषयी by विनीत संखे
दंडवत!
In reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
असहमत!
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
जया भादुरीची प्रतिक्रीया माहीत आहे का?
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
जया भादुरीची प्रतिक्रीया माहीत आहे का?
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
माधुरीच्या अभिनयाबद्दल मी
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by रेवती
बरीचशी सहमत आहे.
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रतिसाद प्रकाशित झाला
In reply to हा प्रतिसाद प्रकाशित झाला by रेवती
अवांतर
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्मिता पाटिल, शबाना आझमी,
In reply to स्मिता पाटिल, शबाना आझमी, by प्राजु
तुझ्या मताचा आदर आहेच.
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे चित्रपट पाहीले आहेत का?
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण ती अभिनय करते असा संशय
In reply to पण ती अभिनय करते असा संशय by सोत्रि
स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस"
In reply to स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" by विनीत संखे
__/\__
In reply to पण ती अभिनय करते असा संशय by सोत्रि
कोण मार्क? धन्यवाद
In reply to कोण मार्क? धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
चुकलो, माती खाल्ली! मार्क
In reply to चुकलो, माती खाल्ली! मार्क by सोत्रि
ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
१०० डेज मधला ती झोपेत असताना
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
प्राजू ताई,
In reply to प्राजू ताई, by सिद्धार्थ ४
अगदी अगदी....
In reply to प्राजू ताई, by सिद्धार्थ ४
+१
In reply to +१ by सोत्रि
सोक्या.....
In reply to सोक्या..... by ढब्बू पैसा
सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही
In reply to सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही by बिपिन कार्यकर्ते
ठ्या....
In reply to ठ्या.... by सोत्रि
सांभाळ
In reply to सांभाळ by श्रावण मोडक
नक्की कोणाचा?????
In reply to सांभाळ by श्रावण मोडक
मोडक, मी 'अण्णा हजारे' होणार
In reply to मोडक, मी 'अण्णा हजारे' होणार by सोत्रि
हा हा हा ... अहो सोकाजी,
In reply to हा हा हा ... अहो सोकाजी, by सुहास झेले
'अण्णा निघाले पाकिस्तानला'
In reply to सोक्या..... by ढब्बू पैसा
हा हा हा
In reply to +१ by सोत्रि
(-१) जीवघेण्या विधानाशी असहमत
In reply to (-१) जीवघेण्या विधानाशी असहमत by चेतन सुभाष गुगळे
भावनाओन्को समझो .
In reply to भावनाओन्को समझो . by सिद्धार्थ ४
मग तुम्हीही घेऊ नका शब्दश: अर्थ
In reply to मग तुम्हीही घेऊ नका शब्दश: अर्थ by चेतन सुभाष गुगळे
परत तेच?
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
वडापाव, आजपासुन मी तुमचा
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
तुमचा प्रतिसाद वाचतानाही
In reply to तुमचा प्रतिसाद वाचतानाही by मी ऋचा
बास्स का? घ्या त्यांच्यात
In reply to बास्स का? घ्या त्यांच्यात by वपाडाव
बाबारे विषय जरा बघुन मग
In reply to बास्स का? घ्या त्यांच्यात by वपाडाव
वप्या, आपलं अॅक्टींग बद्दल
In reply to वप्या, आपलं अॅक्टींग बद्दल by मी ऋचा
तुम्हाला संवादफेकनाबद्दल
In reply to तुम्हाला संवादफेकनाबद्दल by वपाडाव
>> (माधुरीवर सोकाजीपेक्षा
In reply to >> (माधुरीवर सोकाजीपेक्षा by मी ऋचा
ऋचा
In reply to तुम्हाला संवादफेकनाबद्दल by वपाडाव
ऐकावे ते नवलच !
In reply to ऐकावे ते नवलच ! by वाहीदा
डिसक्लेमर : ऍफेडेविट
In reply to डिसक्लेमर : ऍफेडेविट by सोत्रि
हा हा हा
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
वपाडाव
In reply to वपाडाव by नंदन
वर वपाडावकाकांनी उदाहरण
In reply to वर वपाडावकाकांनी उदाहरण by वपाडाव
:)
In reply to वर वपाडावकाकांनी उदाहरण by वपाडाव
;)
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
मी देवदास पूर्ण पाहिलाच
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
लज्जा मधे "चारीत्र्यहीन"
In reply to लज्जा मधे "चारीत्र्यहीन" by विनीत संखे
प्रतारणा करणारी प्रताडना असे
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
एम एफ हुसैन नावाच्या महान