झटपट कलाकंद
साहित्यः
१ कॅन कंडेन्सड मिल्क
१ डबा रिकोटा चीज
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक)
सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप
नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे.
पाकृ:
एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे.
मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ५ मिनिटे ठेवणे.(मधे-मधे लक्ष देणे, मिश्रण ऊतु जाऊ देऊ नये.)
५ मिनिटांनी मिश्रण चमच्याने हलवून परत हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे.(सतत लक्ष देणे)
आता मिश्रण साधारण घट्ट झालेले असेल, परत मायक्रोवेव्ह मधे हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे. ( मायक्रोवेव्ह चे टाईमिंग मधे फरक असू शकतो...मला जेवढा वेळ लागला बनवायला तसे सांगितले आहे)
आता मिश्रण कलाकंदाला लागेल असे घट्ट झालेले असेल. त्यात वेलचीपूड व रोज वॉटर / इसेन्स घालून एकत्र करणे.
तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे ओतून पसरवणे व त्यावर पिस्ता-बदामाचे काप पेरावे.
सेट झाले की वड्या पाडाव्यात.
वाचने
8319
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सुरेख!!
एकतर रात्री जेवण करून काम
उत्तम पाकृ मस्तच
मस्तच
In reply to मस्तच by विलासराव
+१
In reply to +१ by आत्मशून्य
मस्तच
ख त्त र ना क !
In reply to ख त्त र ना क ! by परिकथेतील राजकुमार
अनिवासि भारतिय
In reply to ख त्त र ना क ! by परिकथेतील राजकुमार
रिकोटा चीज
In reply to ख त्त र ना क ! by परिकथेतील राजकुमार
पराभाऊ, पणिर वापरा रिकोटा चीझ
In reply to पराभाऊ, पणिर वापरा रिकोटा चीझ by दिपाली पाटिल
पणिर वापरा
पा कृ एक नंबर
वाह ... जबरी पाककृती !!
पाणी सुटले
मस्त पाकृ.
मस्त पर्यात दुध आटवणे ह्या
वा... मस्तच ! (मिठाई प्रेमी)
सुरेख !
देवा कसं आवरू मन.....