मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट कलाकंद

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १ कॅन कंडेन्सड मिल्क १ डबा रिकोटा चीज १ टीस्पून वेलचीपूड १ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक) सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे. Image removed. पाकृ: एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे. Image removed. मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ५ मिनिटे ठेवणे.(मधे-मधे लक्ष देणे, मिश्रण ऊतु जाऊ देऊ नये.) ५ मिनिटांनी मिश्रण चमच्याने हलवून परत हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे.(सतत लक्ष देणे) Image removed. आता मिश्रण साधारण घट्ट झालेले असेल, परत मायक्रोवेव्ह मधे हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे. ( मायक्रोवेव्ह चे टाईमिंग मधे फरक असू शकतो...मला जेवढा वेळ लागला बनवायला तसे सांगितले आहे) Image removed. आता मिश्रण कलाकंदाला लागेल असे घट्ट झालेले असेल. त्यात वेलचीपूड व रोज वॉटर / इसेन्स घालून एकत्र करणे. Image removed. तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे ओतून पसरवणे व त्यावर पिस्ता-बदामाचे काप पेरावे. Image removed. सेट झाले की वड्या पाडाव्यात. Image removed.

वाचन 8319 प्रतिक्रिया 0