झटपट कलाकंद
साहित्यः
१ कॅन कंडेन्सड मिल्क
१ डबा रिकोटा चीज
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक)
सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप
नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे.
पाकृ:
एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे.
मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ५ मिनिटे ठेवणे.(मधे-मधे लक्ष देणे, मिश्रण ऊतु जाऊ देऊ नये.)
५ मिनिटांनी मिश्रण चमच्याने हलवून परत हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे.(सतत लक्ष देणे)
आता मिश्रण साधारण घट्ट झालेले असेल, परत मायक्रोवेव्ह मधे हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे. ( मायक्रोवेव्ह चे टाईमिंग मधे फरक असू शकतो...मला जेवढा वेळ लागला बनवायला तसे सांगितले आहे)
आता मिश्रण कलाकंदाला लागेल असे घट्ट झालेले असेल. त्यात वेलचीपूड व रोज वॉटर / इसेन्स घालून एकत्र करणे.
तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे ओतून पसरवणे व त्यावर पिस्ता-बदामाचे काप पेरावे.
सेट झाले की वड्या पाडाव्यात.

वाचन
8319
प्रतिक्रिया
0