वृद्ध मातापित्यांची समस्या
मुलाने सासर्याकडेच रहाण्यास काय हरकत आहे?मला तरी काहीच अडचण दिसत नाही. त्यानिमित्ताने सासू प्रेमळ असते अशी धारणा होण्यास मदत होईल.
म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?नक्कीच पाहावे. आपल्याकडे वृद्धांना सोशल सिक्युरिटी नसते तेव्हा त्यांना आधार त्यांच्या मुलांनीच द्यायला हवा. त्यांना मुलगा असेल तरीही मुलीने मदत करावी. आपल्यावरली जबाबदारी टाळू नये आणि नवरा टाळू पाहत असेल तर त्याला टाळायला देऊ नये आणि हे मुली जितक्या जास्त स्वतंत्र तितके त्यांना अधिक जमेल असे वाटते. --- माझ्या व्यक्तीगत मताप्रमाणे लग्न झाल्यावर जोडप्याने स्वतंत्र राहावे. शक्य असल्यास आपल्या आईवडिलांची प्रायवसी आणि आपली प्रायवसी यांना महत्त्व द्यावे परंतु प्रत्यक्षात तसे करणे शक्य असेलच असे नाही. तेव्हा अशाप्रसंगी सारासार विचार करून निर्णय घ्यावा. उदा. बायको एकटी मुलगी आहे पण मुलाला भाऊ/ बहिण आहे तर त्याने मुलीकडे राहायला जाणे मला योग्य वाटते. अडचण करून राहण्यापेक्षा अधिकाधिक मोकळेपणी कसे राहता येईल हा विचार करावा.
In reply to काहीच हरकत नाही by प्रियाली
तेव्हा अशाप्रसंगी सारासार विचार करून निर्णय घ्यावा.पटलं. पण सारासार विचार म्हणजे नक्की कशाकशाचा हे महत्त्वाचं आहे. 'समाजाची रीत' या फॅक्टरला अतिरेकी वेटेज देऊनसुद्धा सारासार विचार होऊ शकतो. तसा व्हावा का हा खरा प्रश्न आहे. मूळ चर्चाप्रस्तावात म्हटल्याप्रमाणे वास्तव बदललेलं आहे. एकाच वेळी एकत्र कुटुंबपद्धतीचा त्याग व त्याचबरोबर वाढती आयुर्मर्यादा यामुळे हा प्रश्न आईवडिलांसाठी बिकट झालेला आहे. स्वातंत्र्याचा निर्णय तरुण पीढी घेते, कारण त्यात त्यांचा फायदा असतो. तसा तो घ्यावाही. पण त्याचबरोबर एकत्र कुटुंबाचे काही फायदे काही प्रमाणात जपण्यासाठी व्यवस्था करणं आवश्यक आहे. खाली रमताराम यांनी म्हटल्याप्रमाणे मुलं व आईवडील शक्य तितक्या जवळ पण स्वतंत्र राहिले तर सगळ्यांसाठीच तो सुवर्णमध्य ठरू शकतो. मात्र हे सगळ्यांना शक्य नसतं. तुम्ही मांडलेला 'घरजावई होणे' हा उपाय जरूर अमलात आणावा असं मला वाटतं. शेवटी हा प्रश्न भावनिक नसून तांत्रिक आहे. जर सगळ्यांचंच भलं होत असेल तर समाजाने नाकं मुरडण्याकडे दुर्लक्ष करावं.
In reply to चर्चाप्रस्ताव आवडला. तेव्हा by राजेश घासकडवी
'समाजाची रीत' या फॅक्टरला अतिरेकी वेटेज देऊनसुद्धा सारासार विचार होऊ शकतो. तसा व्हावा का हा खरा प्रश्न आहे.समाजाची रीत असते हे टाळता येत नाही. ज्या समाजात राहायचे त्या समाजाशी फटकून लोकांना राहता येईलच असे नाही. तसे करणारे थोडके असतात. अर्थातच, सारासार विचार करताना अतिरेकी विचार टाळावे हेच योग्य.
रमताराम यांनी म्हटल्याप्रमाणे मुलं व आईवडील शक्य तितक्या जवळ पण स्वतंत्र राहिले तर सगळ्यांसाठीच तो सुवर्णमध्य ठरू शकतो. मात्र हे सगळ्यांना शक्य नसतं.जो पर्यंत धडधाकट आहेत तोपर्यंत स्वतंत्र राहणे योग्यच पण तसे नसेल शारीरिक किंवा आर्थिक परावलंबनामुळे मुलांचा आधार गरजेचा असतो/ होतो. निदान आपल्या देशांत तरी मुलांकडे म्हातारपणाची काठी अशाच नजरेने पाहिले जाते.
तुम्ही मांडलेला 'घरजावई होणे' हा उपाय जरूर अमलात आणावा असं मला वाटतं. शेवटी हा प्रश्न भावनिक नसून तांत्रिक आहे. जर सगळ्यांचंच भलं होत असेल तर समाजाने नाकं मुरडण्याकडे दुर्लक्ष करावं.धन्यवाद आणि सहमत. फक्त आपण घरजावई हा शब्द टाळायला हवा असे वाटते. सुनेला कोणी घरसून म्हणत नाही. घरजावई शब्दातून जी हेटाळणी आणि तुच्छता दाखवली जाते ती त्या शब्दाचा वापर न केल्याने टळेल आणि कदाचित मग हा सासरी राहू इच्छिणार्या जावयाला ते लाजिरवाणे वाटणार नाही अशी आशा करते.
In reply to अतिरेकी विचार by प्रियाली
In reply to चांगला विषय by विकास
जावई माझा भला, लेकीपाठी आला अन मुलगा माझा दिवटा, सुनेपाठी गेला!अहो सायबाच्या भाषेतही म्हणतात की, a son is a son till he takes him a wife, a daughter is a daughter all of her life. 'जाता जाता' म्हणून मी जे काही लिहीलं आहे ते याच गोष्टीचं व्यवहार्य उदाहरण नाही का?
In reply to चांगला विषय by विकास
In reply to >>सासर्याची असली तर? मुलीचं by नगरीनिरंजन
In reply to >>सासर्याची असली तर? मुलीचं by नगरीनिरंजन
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
In reply to मुली आजकाल आर्थिक दृष्ट्या by शुचि
मुलीच्या घरी पाणी न पिणे वगैरे खुळचट कल्पना अजूनही काही जण पाळतात. माझी एक मैत्रिण आहे जिची वृद्ध, विधवा आई तिच्या घरी पाणीही पित नाही आणि हे ती मुलगी अभिमानाने सांगते. हे खटकण्यासारखे नाही काय?हे तुम्हाला खटकते हे तुम्ही तिला सांगितले का? कारण सांगितले नसेल तर ही गोष्ट इतरांना खटकण्यासारखी आहे हे तिच्या गावीही नसेल तर?
In reply to खटकले तर.... by प्रियाली
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
... अशा परिस्थितीमधे वडील आधी निधन पावले तर इस्टेटीच्या मारामार्यांमधे मुलींना त्यांचा हक्क मिळायला झगडायला लागू शकल्याची उदाहरणे आहेतच.असा विषय निघाला आहेच म्हणून. कायद्याप्रमाणे वडलोपार्जित* मालमत्ता सर्व भावंडांमधे समसमान विभागली जाते. जर मृत पालकांनी स्वकष्टार्जित मालमत्तेची विभागणी कशी करावी हे लिहून ठेवलं नसल्यास ती मालमत्ताही सर्व भावंडांमधे समसमान विभागली जाते. भावांनी हा हक्क बहिणींना न दिल्यास त्यांना झगडायला लागू शकतं हे ही मान्य आहे. मालमत्तेवर हक्क सांगता येतो तर नैतिक जबाबदारी का पार पाडू नये? मुली जर सासू सासर्यांच्या घरी राहू शकतात तर मुलगे का नाही? मुलग्यांमधे काही कमतरता असते असं नाही, तर जी गोष्ट मुलींना जमते ते मुलग्यांना का नाही? व्यक्तीगत मतः शक्यतोवर सर्व जोडप्यांनी आणि/किंवा मिळवत्या व्यक्तींनी आपापली घरं बनवून तिथे रहावं. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कमीतकमी झालेला उत्तम. * या शब्दावरही आता आक्षेप आहे, कारण आताच्या काळात आईनेही कष्ट करून मालमत्ता जमा केलेली असते.
In reply to ... अशा परिस्थितीमधे वडील आधी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ... अशा परिस्थितीमधे वडील आधी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुलग्यांमधे काही कमतरता असते असं नाही, तर जी गोष्ट मुलींना जमते ते मुलग्यांना का नाही?या वाक्याला पूरक असे वाक्य बाजूच्या चर्चेत वाचले. (शब्दशः देण्याचा कंटाळा आल्याने त्याचे सार लिहिते -) एका प्रतिसादात मुलींना सांभाळायला, मोठं करायला अधिक कष्ट पडतात असे म्हटले आहे. त्याचा नेमका रोख मला कळला नाही पण त्याचा एक पैलू असाही आहे की मुलगी हे परक्याचे धन म्हणून वाढवल्या जातात. (परक्याचे धन म्हणण्यापेक्षा परक्याची दुभती, आखूडशिंगी गाय असे म्हणता यावे.) त्यांनी सोशिक असावे, उद्धट नसावे, मिळून मिसळून राहणारे असावे, त्यांना स्वयंपाकादी कामे जमायलाच हवीत या अनुषंगाने त्यांना आजही ट्रेन केले जाते. याचबरोबर जमाना बदलल्याने मुलींनी शिकावे, स्मार्ट असावे, पैसा कमवण्याची हिम्मत ठेवावी, धडाडी ठेवावी ही अपेक्षाही हळूहळू रुजली आहे. याउलट, मुलांनी सोशिक असावे, अपमान गिळावा, स्वयंपाकादी कामे शिकावी ही अपेक्षा त्यांच्यावर लादलेली दिसत नाही. दुसर्याच्या घरात जाऊन मिळून मिसळून राहावे लागेल ही शिकवणूक मुलांना दिल्याचे आढळत नाही त्यामुळे म्हटली तर कमतरता आहे असे वाटते.
In reply to मुलींना जे जमते... by प्रियाली
In reply to मुलींना जे जमते... by प्रियाली
In reply to अगदी अगदी. "बायकोच्या by शुचि
भाषेच्या माध्यमातून आपण आपले सुप्त मन प्रकट करत असतो.सूप्त मन काय, संस्कृती म्हणा शुचिताई. भाषा आणि संस्कृती वेगळी काढता येणार नाही. मग भाषेतून (पुरूषप्रधान) संस्कृतीच दिसली तर त्यात आश्चर्य काय? आता पहा ना, जॉन अब्राहम हा लक्ष्मी बार आहे तर राजेंद्रकुमार टिकली, तर हे फटाक्यांचा परिभाषेत वाचायला कसं वाटेल?
In reply to भाषेच्या माध्यमातून आपण आपले by ३_१४ विक्षिप्त अदिती
जॉन अब्राहम हा लक्ष्मी बार आहे तर राजेंद्रकुमार टिकली, तर हे फटाक्यांचा परिभाषेत वाचायला कसं वाटेल?असे शब्दप्रयोग सवयीने लिहायला-वाचायला सहज वाटतील.
In reply to असे लेखन-वाचन व्हायला हवे by धनंजय
In reply to लॉकर रूम परिभाषा by मुक्तसुनीत
In reply to चुकून वृद्ध मातापित्यांची by नितिन थत्ते
In reply to अमावस्याच by चित्रा
सासर्याकडेच का हे कळले नाही. लेखातील विचारांशी विसंगत आहे असे वाटते.विसंगती आहे हे मान्य. सासरी जावे हा शब्दप्रयोग वापरायला पाहिजे.
In reply to गरज आणि सोय by पल्लवी
In reply to >> परंतु मुलगी जर पुरेशी by शुचि
In reply to अन्य समस्या by रमताराम
In reply to मिपाश्रम by सहज
In reply to सहजमामा अमर रहे, आपलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by रमताराम
In reply to अहो ररा बरे सुचवलेत by सहज
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
तर मग मुलाने सासर्याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल.तरी बरं हिदूंचे दोन देव (शंकर आणि विष्णु ) त्यांच्या सास-यांच्या कडेच मुक्काम ठोकून आहेतह. बाय द वे : माझ्या तेरा वर्षाच्या मुली ने तरी ठरवले आहे की लग्न झाल्यावर नव-याला घेऊन माझ्या कडेच राहायचे ( मनोमन सुखावायला आणखी एक कारण)
जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?- प्रश्नच नाही. दोन्ही प्रश्नांना कोणतेही कारण नाही. असे आपोआपच झाले पाहिजे. चर्चेत दोन मुद्दे मांडू इच्छितो - १. ही चर्चा स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णयाचा अधिकार या दिशेने जाते काय? किंवा स्वतंत्र कुटुंबात जी स्त्री कमावती नाही तिला निर्णयाचा अधिकारच नाही असे सुचवले जात आहे काय?अशी शंका वाटली. कुणीही असे मानण्याचे कारण नाही. कारण यशस्वी विवाहात एका विशिष्ट वयानंतर (४५-५०) नवरा-बायको यांच्या विचारांत सामंजस्य आपोआपच निर्माण होते. (मग बायको-नवरा कमावते असोत की नसोत.) लेखात नमूद केलेली समस्या उपस्थित होईपर्यंत हे वय आलेले असते. (कुणी याला बायकोच्या मुठीत असणे/ताटाखालचे मांजर होणे असे भले म्हणाले तरी ते सत्य आहे.) २. असे गृहित धरलेले आहे की आईवडिलांना मुलगे आणि मुली दोन्ही आहे. काही कुटुंबात जिथे केवळ मुलीच आहेत त्या मातापित्यांनी काय करावे? किंवा ज्यांना मुलेच नाहीत त्यांनी काय करावे? - अ. ज्यांना केवळ मुलीच आहेत अशा मातापित्यांना मुलींचा आधार घेणे गरजेचेच आहे. तेथे मुलीचा नवरा घरजावई आहे?की मुलगी कमावती आहे? की आपण जावयाच्या घरी/जिवावर रहात आहोत? हे प्रश्नच डोक्यातून काढून टाकावे. बाहेरचे लोक काहीही म्हणत असले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. ब. ज्यांना मुलेच नाहीत त्यांनी काय करावे हा प्रश्न मात्र गुंतागुंतीचा आहे. कदाचित वृद्धाश्रम हा पर्याय असू शकेल.
In reply to छान by Nile
आता पन्नाशीच्या आत सुखाने मरायला मी मोकळा!तू आजही पन्नाशीच्या आतच आहेस रे!
In reply to नायल्या मेल्या by प्रियाली
In reply to +१ by श्रावण मोडक
तू आजही पन्नाशीच्या आतच आहेस रे!तुम्हा म्हातार्यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो! ;-)
In reply to काय करावं या म्हातार्यांच बुवा! by Nile
तुम्हा म्हातार्यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो'तरुणाई' शब्दातलं कारुण्य (की करुणाई) जाणवलं असं नोंदवते. ;)
In reply to कारुण्य by प्रियाली
In reply to एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून by बिपिन कार्यकर्ते
In reply to इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते. by अप्पा जोगळेकर
In reply to शिवाय स्वतःची सांपत्तिक by सविता
In reply to शिवाय स्वतःची सांपत्तिक by सविता
In reply to इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते. by अप्पा जोगळेकर
- गोरी आणि सुंदर बायको हवी.
- किमान ५-१० तोळे सोनं तिच्या अंगावर पालकांनी घालायला हवं.
- सासूसासर्यांच्या आज्ञेत राहणारी हवी
- बँकेत नाहीतर शाळेत नोकरी करणारी हवी
In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
In reply to >> आता परिस्थिती बदलली आणि by विश्वनाथ मेहेंदळे
Two wrong do not make one right अशा अर्थाची म्हण आठवलीतसं सांगायचा प्रयत्नही नाही पण एक बाजू राँगच होती हे मान्य केल्याबद्दल विशेष धन्यवाद. ;)
In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
In reply to लग्नाच्या बाजारात आता अटी by अप्पा जोगळेकर
त्यामुळे समानता येईल ही आशा फोल वाटते.आमचे मानसगुरुवर्य श्री. जॉर्ज मिकॅश यांनी भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातला भेद अतिशय थोडक्यात पण चपखलपणे समजावून सांगितला आहे, त्याची या निमित्ताने आठवण झाली. "They say that Capitalism is the exploitation of one man by another. Communism is the other way round."
(टीप: उद्धरण आठवणीतून उतरवलेले आहे. या क्षणी पुस्तक डोळ्यांसमोर नाही. शब्दांत किंचित फेरफार निघाल्यास चूभूद्याघ्या.)
In reply to लग्नाच्या बाजारात आता अटी by अप्पा जोगळेकर
In reply to जन्माला आलेल्या मुलींना खचाखच by रेवती
आपले जगणे (हक्क), अस्तित्व आईवडीलांकडून नाकारले जाते किंमान नावडले जाते हे आणि सासरीही त्यानुसारच वागणूक मिळते हे पाहिल्यापासून मुलींनी दुसरे टोक गाठले आहे.या कार्यकारणभावाबद्दल साशंक आहे. तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्या मुली (हूएवर दे मे बी) (गट 'अ'), आणि 'आपले जगणे (हक्क), अस्तित्व नाकारले गेलेले पाहणार्या, सासरी त्यानुसारच वागणूक मिळते हे अनुभवणार्या' एवंगुणविशिष्ट मुली (गट 'ब') हे दोन्ही एकच गट आहेत, या प्रतिपादनातील तथ्याबद्दल खात्री नाही. ('अ' आणि 'ब' हे) दोन्ही गट हे मुलींचेच उपगट आहेत, याव्यतिरिक्त त्यांच्यात कितीसा परस्परसंबंध असावा, याबद्दल शंका आहे.
(अगदी टोकाचे आणि ट्रिवियल उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, खचाखच मारल्या जाणार्या मुली या पुढील आयुष्यात 'दुसरे टोक' गाठीत असतील, असे वाटत नाही. उलटपक्षी, तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्या मुली या जन्मतःच खचाखच मारून टाकल्या गेल्या असतील, ही शक्यतादेखील धूसर वाटते. किंचित गंभीर व्हावयाचे झाल्यास, (अ.) तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्या मुलींपैकी (पुन्हा, हूएवर दे मे बी) किती टक्क्यांना स्वतःच्या कुटुंबांत जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम दर्जाची वागणूक हे प्रकार अनुभवायला मिळाले असावेत, आणि उलटपक्षी (ब.) स्वतःच्या कुटुंबात जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम वागणूक मिळालेल्या मुलींपैकी किती टक्के मुली या पुढे जाऊन तथाकथित 'दुसरे टोक' गाठत असाव्यात, याबद्दल काही आकडेवारी किंवा परस्परसंबंध प्रस्थापित करणारी अन्य काही माहिती मिळू शकल्यास ती उद्बोधक ठरावी.)
In reply to कार्यकारणभावाबद्दल साशंक by पंगा
In reply to गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे by रेवती
In reply to असे बोला ना! by पंगा
In reply to असे बोला ना! by पंगा
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हेठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.जोरदार प्रयत्न करावा काय?
In reply to ? by पंगा
ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?अहो म्हणजे आजूबाजूला, इतस्ततः प्रतिसादांमधे पसरलेले हो.
जोरदार प्रयत्न करावा काय?तो तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. :p
In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
In reply to धागा तेवत कसा ठेवावा याचे by विजुभाऊ
काहीच हरकत नाही