जे ज्योतिषी शास्त्राचा अभ्यास करून अचूक भविष्य सांगतात त्यांना सादर वंदन करुन अन्य होतकरु रोजगारेच्छुक तरुणांसाठी एक स्वयंपूर्ण व्यवसायप्रस्ताव सुचवू इच्छितो. तुम्ही चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरु करा.
गंमत नाही. खरंच..
एकदा का एखादी व्यक्ती भविष्य जाणण्यासाठी तुमच्या समोर जातीने आली तर तुम्ही कसल्याही विशेष शास्त्राचा वापर न करता अत्यंत इंप्रेसिव्ह आणि "वॉव" व्हॅल्यू असलेलं कथन करु शकता. याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये. या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या प्रस्तावाला "जेन्युईन" ज्योतिषशास्त्राची खिल्ली समजू नये अशी आपली उगीच एक विनंती झालं...
आता एकच उदाहरण घेऊ..
समजा एक पुरुषमाणूस तुमच्याकडे आला.. (प्रत्यक्ष येणे आवश्यक हां.. त्यासाठी "नुसत्या जन्मतारखेने अचूकता येत नाही. हात पहावा लागतो किंवा मुख पहावे लागते", असे म्हणावे म्हणजे मग सगळे समक्ष येतात..)
आता..पुढे.. समजा त्याने सांगितलेली जन्मतारीख: ९ ऑगस्ट १९७५
म्हणजेच वय ३६.. आता एवढ्यावरुन कायकाय सांगता येईल याची झलक पाहू..
हा मनुष्यविषय विवाहित असण्याची शक्यता साधारणतः बरीच जास्त..उगाच असे किती लोक बिनलग्नाचे रहात असतील? सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बाईल अशा न्यायाने देखील एक जोडीदार मिळून साधारण बहुतेकांची लग्नं या वयापर्यंत होतातच.
तेव्हा आता बिंधास सांगा:
तुम्ही विवाहित आहात..
पुढे..
व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे त्यामुळे त्याच्या पोटाचा घेर, तुंदिलपणा, निरुत्साह यावरुन लग्नाला झालेली वर्षं साधारण ५, १० किंवा १५ इतपत ओळखता यावे..
त्यावरुन तुमचे लग्न लवकर / साधारण पंचविशीच्या आसपास / उशिरा झाले यापैकी काही सांगता येईल. पुन्हा एकदा शक्यतेचे वजन बरेचसे वजन आपल्या बाजूस ठेवून.
छत्तीस हे वय साधारणत: रक्तदाब / लठ्ठपणा / मधुमेह यांपासून पाच ते दहा वर्षे अलिकडे आहे. त्या व्यक्तीचं पोट काहीसे बाहेर असेल तर मग आणखीनच निर्धास्त व्हा..
तर मग अशा निरिक्षणाअंती आज रोजी असे वर्तवण्यास हरकत नाही की २०२० नंतर हृदयाशी संबंधित विकारांपासून जपावे.. किंवा रक्तजन्य विकारांपासून जपावे. आता गंमत बघा..
हृदयविकार झाला की तो कोलेस्टेरॉलशी जोडला की रक्ताशी संबंधित होऊ शकतो..
समजा नुसताच रक्तदाब जडला, तरी तो रक्ताशी संबंधित वाटतोच.
मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणे. त्यामुळे यापैकी काहीही डायाग्नोसिस पाचदहा वर्षांनी झाले की "अर्र..गविगुरुजींनी दहा वर्षांपूर्वीच सांगितलं होतं बरं का.. मीच करंटा वेळेवर जागा नाही झालो..नाही व्यायाम केला..", वगैरे स्वदूषणयुक्त संवादात असं आपलं नाव नक्की निघणार.
झालस्तर ३६ हे वय चाळिशीच्या चार वर्षं अलिकडे आहे. त्यामुळे पुढचा आरोग्यविषयक भाकितसल्ला सुरक्षितपणे फेकता येईल, "२०१६ सालापर्यंत तुमचे आरोग्य ठीक राहील. त्यानंतर डोळ्यांचा त्रास संभवतो."
चाळिशीच्या आसपास चाळिशी लागतेच. ती नाही लावली तरी पेपर डोळ्यापासून दूर धरून वाचताना तरी निदान आपली आठवण होईल अजून एकदा.
हे एक उदाहरण झालं. तसे शरीराच्या ठेवणीवरुन अनेक आडाखे निघतात. हा आपापल्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा भाग आहे. बुटका, लहान चणीचा मनुष्य असेल तर तो लहानपणीही तसाच असणार हे सांगायला कुंडलीची गरज नाही. त्यामुळे "लहानपणीच तुम्हाला जगाकडून फार वाईट वागणूक, अवहेलना, मानहानी वाट्याला आली", असं वर्तवायला हरकत नाही.
मग नेमकेपणा संपण्याची चिन्हं दिसली की निम्ननिर्दिष्ट सुपरजनरलाईज्ड वाक्यांमधील काही आपल्या मास्टर डेटाबेसमधून काढावीत. त्यासाठी सुसज्ज डेटाबेस बनवायला हवा. कॉम्प्युटर हे या बाबतीत वरदान म्हणून आपल्याकडे आलं आहे.
कोणालाही लागू पडतील अशी (किंवा पडताहेत की नाही हे कळणं अशक्य आहे अशी) खालील वाक्यं पहा.
१) तुम्ही नारळासारखे / फणसासारखे बाहेरून कठोर पण आतून मऊ आहात.
२) तुमच्याविषयी वेगवेगळ्या लोकांची अत्यंत भिन्न मते आहेत.
३) तुम्ही खूप कष्ट करता पण त्या प्रमाणात श्रेय मात्र तुम्हाला मिळत नाही.
४) तुम्ही खूप भावनाशील आहात, पण लोकांना ते समजत नाही.
५) नकार देणं तुम्हाला जमत नाही त्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं आहे आणि लोक तुमचा फायदा घेतात.
६) वैवाहिक जीवनात तुम्ही सुखी आहात असं जगाला दिसतं पण वास्तविक आतून तुम्ही तितके सुखी नाही आहात.
७)वाढत्या शारिरिक अडचणींनी तुम्ही त्रस्त होत चालला आहात.
८) तुमची मनःस्थिती सध्या बरी नाही पण एक्सवायझेड महिन्यानंतर शुभ काळ आहे. (ही तारीख तातडीच्या भविष्यातली नसून प्रचंड दूरची असावी अशी काळजी घेणे आवश्यक. शक्यतो काही वर्षांनंतरची.)
आणखी काही उद्योगवाढीस आवश्यक तत्वे आचरावीत.
- येईल त्या प्रत्येकाला सल्ला देऊ नये. तुमचे ध्यान / एकाग्रता / मूड असे सर्व त्या वेळी जमून येणे आवश्यक आहे अशी भानगड तयार करावी. त्यासाठी काही चेले असणे आवश्यक. सल्ला मिळालेल्याला आपण "सिलेक्टेड नशीबवान" असे वाटले पाहिजे.
- स्वतःभोवती गूढतेचे वलय जपा
-अपॉईंटमेंटशिवाय कोणालाही घेऊ नका. भले महिन्यातून एखादा येत असेल तरी. आपली डायरी पॅक असल्याचे भासले पाहिजे.
-पैसे थेट हाताने घेऊ नयेत. एखादी गुरुंची तसबीर खोलीत ठेवून दक्षिणा गुरुचरणी ठेवण्यास सांगावे. नंतर ग्राहक गेल्यावर ती आपणच तातडीने उचलून घेत असलो तरी अशा वर्तनाने आपल्याला तिचा अजिबात मोह नाही असे जनमत होते.
- या सर्व लॉजिकसाठी काँप्युटरची फारशी गरज नाहीच. पण तरीही मधूनमधून तिकडे नजर टाकून काहीतरी बटण दाबावे. टूंक असा आवाज येणे आवश्यक. मात्र नुसत्या काँप्युटरने काहीही होत नाही. मुख्यतः तुमच्या मर्जीवर आणि एकाग्रतेवर सर्व अवलंबून आहे असा रोख ठेवावा. नाहीतर कॉम्प्युटरच फुटेज खाऊन जाईल. भविष्यासाठी कॉम्प्युटर वृद्ध लोकांबाबतीत (६५+) वापरावा. त्यांना त्यातले ज्ञान गूढता वाढवण्याइतपतच असते. तरुण लोकांसमोर संगणक भविष्यासाठी वापरला तर त्यांच्या लेखी आपण एकदम फ्रॉड ठरु शकतो.
मला वाटतं अशा अनेक सूचना आणि तंत्रांची जंत्री तयार करुन मस्तपैकी एक्सेल शीट बनवून एक उत्तम व्यवसाय सुरु करायला हरकत नसावी..
अजूनही खूप फॉर्म्युले आणि टिप्स आहेत. पण मी ते वाचकांवर सोडतो.. येऊ द्यात असतील तर..
वाचने
18027
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडेश!!!
लय भारी राव....
या सर्व लॉजिकसाठी काँप्युटरची
नारळ
अशा प्रकारे एक मस्तंस केळं
आणखी निम्ननिर्दिष्ट सुपरजनरलाईज्ड वाक्ये
लै भारी
गवि,
+१
In reply to गवि, by इष्टुर फाकडा
झक्कास....
लेख वगैरे म्हणून उत्तम आहे.
+१
In reply to लेख वगैरे म्हणून उत्तम आहे. by बिपिन कार्यकर्ते
अठरा वर्षे वयात आण्भव वेग्रे
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
नो निड्ड सार्र...
In reply to अठरा वर्षे वयात आण्भव वेग्रे by वपाडाव
मस्त...आवडले...पटले..... अरे
बाकी
गवि पण तुम्ही चिकूसारखे आहात
In reply to बाकी by आनंदयात्री
तुम्ही लोकांसाठी खूप करता.पण
लेख आवडला
common मजकूर जबरा आहे.
In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी
सहमत.
In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी
प्र्याक्टीस व्हाट यू प्रीच...
च्यायला...
?
In reply to च्यायला... by धमाल मुलगा
_/\_
In reply to ? by पंगा
खी खी खी!
In reply to ? by पंगा
पॉइंट!
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
तुला पण _/\_
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
इश्श्य!
In reply to तुला पण _/\_ by पल्लवी
____/|\____ रु टा आ
झकास!
मला वाटते
?
In reply to मला वाटते by विकास
.
In reply to ? by पंगा
ह्हा ह्हा ह्हा....+१००००००००० टू विकास
In reply to मला वाटते by विकास
होम्स नंतर तूम्हीच
गमतीदार आहे
?
In reply to गमतीदार आहे by धनंजय
फरक आहे असे ऐकून आहे
In reply to ? by पंगा
धन्यवाद
In reply to फरक आहे असे ऐकून आहे by धनंजय
हाहाहा
मस्त!
छान छान अमोल केळकर
आवडलं व्यक्ती प्रत्यक्ष