मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०११ - २

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. डिस्क्लेमर १. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत. त्यामुळे एकमेकांच्या धाग्यात भाग घ्यायला बाकिच्यांना संमती असावी. :) २. सर्व गाणी 'ओरिजिनल' स्परूपातील वापरायचा प्रयत्न केला आहे. जर नजरचुकीने 'असा' प्रकार झाल्यास मी दिलगीर आहे. त्याबद्दल आगाऊ माफी असावी. तर चालू होऊ दे मंडळी. कानसेन १९ - मराठे कानसेन २० - चिंतामणी कानसेन २१ - मराठे कानसेन २२ - चिंतामणी कानसेन २३ - चिंतामणी कानसेन २४ - मराठे कानसेन २५ - ब्रिटीश टिंग्या कानसेन २६ - मराठे कानसेन २७ - निमिष ध. कानसेन २८ - नितिन थत्ते कानसेन २९ - नितिन थत्ते कानसेन ३० - निमिष ध. १९. अंतरा

वाचने 16834 वाचनखूण प्रतिक्रिया 83

चिंतामणी Mon, 08/08/2011 - 23:25
एक शंका- धागा टाकायच्या आधी मराठ्यांना कॉल केला होता का हो??????: -/ (ह.घ्या.)

यकु Mon, 08/08/2011 - 23:31
अर्र र्र्र्र्र र्र मी गाणं बरोबर ओळखलं होतं.. पण तुनळीवर कंफर्म करताना रफीचा आवाज पहिल्यांदा आला त्यावरुन भडाडलो.. इथल्या अंतर्‍यात गायिका पहिल्यांदा गातेय तिथे गायक.. कै हरकत नै.. :(

स्पर्धकांनी उत्तरे प्रतिसादात देण्यापेक्षा व्यनी केला तर? त्यामुळे धागा उशिरा बघणाऱ्यांना पण समान संधी मिळेल. निर्धारित कालावधीनंतर प्रश्नकर्त्याने बरोबर उत्तर आणि विजेत्यांची नावे घोषित करावीत. वाटल्यास धागा वाचनमात्र ठेवावा मधल्या काळात.

प्रभो Tue, 08/09/2011 - 01:20
कानसेन क्र २६ : मराठे श्री. खेडूत ४ मिनीटाने हुकले. २७. मुखडा हे ओळखा, तोपर्यंत मिटींगला जाऊन येतो. :)

चित्रा Tue, 08/09/2011 - 06:37
ही कल्पना भारीच आहे. पण इथे बक्षीसे मिळवायला मिपावर पडिक राहावे लागेल असे दिसते आहे. करू, तेही करू जमेल तसे. बहुगुणींचे आभार. आणि बाकीच्या लिंका देणार्‍यांचे देखील.

प्रभो Tue, 08/09/2011 - 07:23
कानसेन क्र. २७: निमिष ध. भारतातल्या साखरझोपेतून उठलेल्या मित्र-मैत्रिणींसाठी...पुढचे गाणे २८. अंतरा (क्लिप १६-१७ सेकंदाची आहे. विजेट गंडल्याने वेळ जास्त दाखवत आहे. ) :)

प्रभो Tue, 08/09/2011 - 08:42
कानसेन क्र. २९ थत्ते चिच्चा!! माझी झोपायची वेळ झाल्याने, आज त्याच्या वेळेनुसार मेघवेडा ही मालिका पुढे चालवेल. गुडनाईट मंडळी!!