सत्यसाईबाबांची ती भेट !
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-27-04-2011-f631f&ndate=2011-04-27&editionname=main
आजच्या लोकमतमधील बातमी जशीच्या तशी खाली डकवित आहे.
सत्यसाईबाबांची ती भेट !
(27-04-2011 : 12:43:11) (दिनकर रायकर)::-
पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल. त्यांच्याकडून होणारे चमत्कार आणि त्यातून निर्माण होणारे वादविवाद हे जसे कायम चर्चेत राहिले तेवढे त्यांनी उभे केलेले समाजोपयोगी, गोरगरिबांना मदत करण्यासाठीचे काम मात्र कधीच चर्चेत आले नाही. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे कदाचित त्यांच्याही बाबतीत सत्य ठरले असावे.
बाबा कधी कोणाला हवतून अंगठी काढून द्यायचे तर कधी कोणाला सोन्याची साखळी. अनेकांना ते अंगाराही द्यायचे. या अशा त्यांच्या चमत्काराच्या कथा प्रत्येकजण आपापल्यापरीने रंगवून सांगत असे. मात्र हे सांगत असताना पुट्टपर्थी येथे किडनी, हृदरोग यासारख्या दुर्धर आजारावर पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जायचे याची कधी तशी चर्चा कोणी करत नसे. या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात म्हणून सत्यसाई बाबांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध वर्तमानपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पुट्टपर्थीला नेण्याची योजना सत्यसाई बाबांवर श्रद्धा असणाऱ्या कॅनको अॅडव्हरटायझिंगचे रमेश नारायण व इंडियन बँक्स असोसिएशनचे अधिकारी जोशी यांनी आखली होती. आधी त्यांनी बाबांची यासाठी परवानगी घेतली. या दौऱ्यात माझ्यासह नवभारत टाइम्सचे त्यावेळचे संपादक विश्वनाथ सचदेव, टाइम्स ऑफ इंडियाचे एस. बालकृष्णन्, महाराष्ट्र टाइम्सचे अशोक जैन, बिझनेस इंडियाचे सरोष बाना, मुंबई समाचारच्या पिकी दलाल, इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ मॅनेजर राजा राव यांचा समावेश होता.
त्यात मीही एक होतो. जातानाच आम्ही सगळ्यांनी त्यांना कोणकोणत्या अँगलने तपासून पाहायचे याचे आडाखे बांधले होते. कोणी खुर्चीकडे लक्ष ठेवायचे, कोणी हाताकडे तर कोणी लांब हाताच्या बाह्यांकडे लक्ष द्यायचे हे ही आम्ही ठरविले होते. सत्यसाई बाबांनी देखील आमच्या या पत्रकारांच्या टीमसाठी एक तास वेळ ठेवला होता. बाहेर लाखोंची गर्दी असताना देखील त्यांनी तो वेळ ठेवला होता.
बाबा ज्या खोलीत बसतात तेथे आम्ही सगळे गेलो. एक साधी लाकडी खुर्ची होती. ती देखील आम्ही आधी तपासली होती. कारण त्या खुर्चीच्या दांडीला कुठे अंगठी, चेन तर लपवली नाही ना अशी आमची शोधपत्रकारिता तेथे पार पडली. आम्ही सगळे खुर्ची समोरील सतरंजीवर बसलो. काहीवेळाने बाबांचे आगमन झाले. स्मितहास्य करीत, काहीही विचारा, दिलखुलासपणे बोला असे म्हणत त्यांनी सुरुवात केली. स्वत:हून त्यांनी आपली दिनचर्याही आम्हाला सांगितली. मी झोपत नाही, केवळ एका अंगावर डोळे उघडे ठेवून विसावतो, दिवसभर जेवत नाही, गूळ-शेंगदाण्याचा एक लाडू खातो... मी ९३ वर्षे जगणार आहे... पण त्याआधी दुसऱ्या साईने कुठेतरी जन्म घेतलेला असेल... असे ते खूप काही बोलले... बोलता बोलता त्यांनी हवेत हात फिरवला आणि एक हिरव्या खड्याची अंगठी रमेश नारायण यांना दिली. आमच्या गप्पा चालू होत्या. त्याचवेळी अंगठी आल्याने आम्ही आणखी शोधक नजरेने त्यांच्याकडे पहात बोलत होतो. पुन्हा त्यांनी क्षणात दुसरी अंगठी काढून बालकृष्णन् यांना दिली. ती त्यांच्या बोटात जात नव्हती. सरोष बाना यांनी ती अंगठी बालकृष्णन् कडून घेतली व स्वत:च्या बोटात घातली. मात्र त्यावर बालकृष्णन् यांनी पत्रकारी भाषेत ती अंगठी मला दिली आहे असे ठासून सांगितले. मग सत्यसाई बाबांनी ती अंगठी बाना यांच्याकडून परत घेतली. सगळ्यांच्या देखत ती दोन बोटात धरुन त्यावर नऊवेळा फुंकर घातली आणि तीच अंगठी नवरत्नाची झाली. ती त्यांनी बालकृष्णन्ला दिली जी त्याच्या बोटात अगदी माप घेतल्यासारखी व्यवस्थित बसली देखील !
विश्वनाथ सचदेव मागेच बसले होते. हम भी पिछे बैठे है स्वामीजी... असे ते म्हणाले. मात्र बाबांनी तिकडे दुर्लक्ष केले. चर्चा पुढे सुरुच होती. बोलता बोलताच त्यांनी पिकी दलाल यांच्यासाठी सोन्याची चेन काढून दिली. तासाभराची चर्चा संपत आली तसे ते सरोष बाना यांना म्हणाले, आप नाराज मत होना... आणि त्यांनाही बाबांनी अंगठी दिली जी त्यांच्या बोटात व्यवस्थित बसली...!
बोलता बोलता ते हवेत हातवारे करत असत. त्यावर विश्वनाथ यांनी विचारले देखील, आप ऐसे हवा में हाथ क्यों उडाते हो... अच्छा नहीं दिखता... त्यावर ते म्हणाले होते... माझ्या समोर जे भक्त नाहीत पण जे माझा मनापासून धावा करत आहेत त्यांच्याशी मी त्याद्वारे संवाद साधत असतो...
काही वेळाने आम्ही सगळे खोलीच्या बाहेर आलो. बाहेर त्यावेळचे कंेद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर बसलेले होते. अन्य राज्यातून आलेले असंख्य व्हीव्हीआयपीज् होते. नंतर शिवराज पाटील यांच्याशी गप्पा मारताना ते आम्हाला म्हणाले, इथे आल्यामुळे मला मन:शांती मिळते, माझी सतत उन्नती होत गेली आहे... त्यांचे व्याही देखील तेथे होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी ही तीच भावना व्यक्त केली होती.
आम्ही सगळे मुंबईत आलो. आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली की नाही हा वादविवाद पत्रकार म्हणून आजही माझा माझ्याशीच चालू आहे. पण जे दिसले, जे अनुभवले ते अदभुत होते. कोणाच्या तरी बोटाच्या मापाची अंगठी आपल्या डोळ्यादेखत समोर येते कशी आणि फुंकर घालण्याने तीच नवरत्नाची कशी होते हा वैज्ञानिक सवाल आजही मला सतावतो. मात्र जे बालकृष्णन् विचाराने लेनिनवादी, माक्र्सवादी होते, जे नियमित मद्यप्राशन करायचे, नॉनव्हेज आवडीने खायचे त्यांनी या भेटीनंतर आजतागायत ना कधी मद्याला हात लावला ना नॉनव्हेजला...
कालांतराने एकदा बालकृष्णन स्वत:च्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांच्या बोटातून अंगठी गळून बाजूच्या डस्टबीनमध्ये पडली. रात्री घरी गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले. सकाळी लवकर उठून ते ऑफीसमध्ये आले. तर सगळे ऑफीस स्वच्छ झालेले होते. मात्र त्यांचे डस्टबीन तसेच होते. साफ न केलेले... आणि त्यात त्यांना ती अंगठी सापडली. नंतर ही गोष्ट बालकृष्णन् यांनीच मला सांगितली.
बाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल. पण जे पाहिले, जे अनुभवले तो सगळा पट आजही डोळ्यासमोर आहे. अगदी काल घडल्यासारखा... चमत्कारांच्या बाबतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन जसा मला छळत राहिला तसाच त्याच्या दुसऱ्या बाजूने वेगळा दिलासाही दिला... ज्ञानदेवांनी भित चालवली किवा रेड्याच्या तोंडून वेद वदवले म्हणून शहाण्या माणसाने ज्ञानेश्वरीला हातच लावायचा नाही की काय?
==========================
तर वर आलेली ही लोकमत मधील बातमी.
सत्यसाईबाबा एक मानव होते. ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी काही वाईट बोलणे योग्य नाही पण हे जे काही चमत्कार होते ते खरोखर सत्य होते का? अन अशा प्रकारचे लेख लिहून लोकमतसारख्या वृत्तपत्राने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातली नाही का?
वाचने
26782
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
च्यायला, लोकलमधून लोकांचे
लोकमत
In reply to लोकमत by रामपुरी
रामपुरी साहेब
In reply to रामपुरी साहेब by आनंदयात्री
दिनकर रायकर चिल्लर माणुस
In reply to दिनकर रायकर चिल्लर माणुस by आळश्यांचा राजा
सहमत्/शंकास्पद
In reply to सहमत्/शंकास्पद by आनंदयात्री
कोणी कोणाच्या तोंडाला काळे
In reply to लोकमत by रामपुरी
काही मुद्द्यांशी सहमत
In reply to लोकमत by रामपुरी
९३ वर्षे जगणार होते तर आधीच
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
अरे देवा पांडुरंगा !!!!
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
वा वा!
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
"फक्त मिपावरचे लोक तुला
In reply to "फक्त मिपावरचे लोक तुला by पाषाणभेद
असहमत. "मिपावरचे काही लोक
ससाबा दैवी चमत्काराने अंगठी,
In reply to ससाबा दैवी चमत्काराने अंगठी, by पाषाणभेद
अनुमोदन
हम्म रोचक आहे!! चर्चा
दोन्ही बाजू
कोण सत्यसाईबाबा? धन्यवाद.
<<<ज्ञानदेवांनी भित चालवली
In reply to <<<ज्ञानदेवांनी भित चालवली by शिल्पा ब
अवांतर : रेड्याच्या तोंडून
लोकमत पेपर वाचायला नका वापरु
In reply to लोकमत पेपर वाचायला नका वापरु by मुलूखावेगळी
मग कशासाठी वापरायचा, हे
In reply to मग कशासाठी वापरायचा, हे by सुधीर१३७
स्व्तः ठरवा कब और कहां .
"सत्यसाईबाबांची ती भेट
बाबा चमत्कारी असो नसोत पण
In reply to बाबा चमत्कारी असो नसोत पण by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. पाभेंनी बाबांवर
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
याला संमोहन / वशिकरण विद्या म्हणतात
थोतांड
In reply to थोतांड by झुळूक
हे पहा
गप्प राहायचे ठरवले
In reply to गप्प राहायचे ठरवले by भडकमकर मास्तर
+१
जौ द्या हो..... आता मेल्या नंतर इतकी चर्चा कशापाय ?
ज्ञानेश्वर आणि रेडा
In reply to ज्ञानेश्वर आणि रेडा by श्रावण मोडक
ज्ञानेश्वर आणि रेडा या कथेवर
रायकर
In reply to रायकर by चिरोटा
<<<"बरोबर दोन दिवसांनी
In reply to <<<"बरोबर दोन दिवसांनी by शिल्पा ब
हम्म्म
In reply to हम्म्म by चिरोटा
आणीबाणीच्या काळात शंकरराव
रायकर
दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं.
In reply to दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. by मन१
मनोबा, खरे आहे आपले