प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी
मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.
काही दिसांपुर्वी मुलुखावेगळी यांचा सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी हा लेख वाचला आणि तेव्हाच हे लिहायची इच्छा झाली.
पण वेळ न मिळाल्यामुळे आणि या गाण्यांनी विचार करायला (पक्षी: आठवण्यासाठी) खूप वेळ घेतला म्हणून उशीर झाला.
तर झाले असे, की ही जी गाणी मी तुमच्यासमोर टंकत आहे, ती सुमधुर, रसाळ, ऐकीव वगैरे प्रकारात मोडत नाहीत.
पण आमच्यासारख्या (टुक्कार)लोकांत फारच (चिक्कार) लोकप्रिय आहेत. चांगल्या गाण्यांवर तर सर्वच जण प्रकाश टाकतात. पण अश्या गाण्याचं काय ज्यांची गोडी तर बर्याच जणांना आहे पण उल्लेख मात्र कोणीच करायला धजत नाही.
ही गाणी वेगळी का? तर त्यांची काही प्रमाणे आहेत.
एक तर त्यांची चाल, दुसरे त्यांची रचना, तिसरे आणि महत्वपूर्ण म्हणजे त्यांचे शब्द किंवा अभिप्रेत असलेले अर्थ.
तर, या समूहातली जवळपास सर्वच गाणी सर्वांनीच ऐकली असतील, पण उजाळा म्हणून मी हा एक प्रयत्न केला आहे.
आपल्याला माहिती असल्यास उत्तम आणि आणखी काहींची भर घातल्यास अत्त्युत्तम.
संपादकांना विनंती की धागा जर मिपा नियमावलीच्या बाहेर वाटतोय आणि उडवावयाचा असेल तर कल्पना द्यावी.
उडवण्यास काहीच हरकत नाही.
१. मुझको राणाजी माफ करना.
करण-अर्जुन सिनेमातलं हे गाणं. ममता कुळकर्णी (वाचणार्यांची पक्षी: पाहणार्यांची अवस्था बिकट करणारी यक तारका)
आणी गाण्याचे बोल (काला काला घुंघट काहेको डाला, का करी आई गोरी मुंह कही काला) ही जमेची बाजु. "गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप, छत पे सोया था......" म्हंटले की कसंससं व्हायला होतं. अ.सां.न.ल.(अ फॉर असुज्ञ) बाईंचे नृत्य कौशल्य तर वाखाणण्याजोगे. या चित्रपटातलं जाती हू मै हे गाणं सुद्धा कमी-अधिक प्रमाणात याच पठडीतलं. फक्त बोल छान आहेत.
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर.
दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.
३. भोलीभाली लडकी खोल तेरे दिल की.
ममता अन अक्कीचं ह्ये गाणं 'टाप आफ आल'. चाल, बोल, लोकेशन अन नृत्य सर्वच बाबींत येक क्रमांक काढतंय हे गाणं. वेन्जॉय करता येण्यासारखं पण टपोरी. आपलं आल टैम फेवरेट. यातलं जहेर है के प्यार है तेरा चुम्मा एकदम छिछोर गाणं.
४. चमक चम चमके अंगुरी बदन.
असंच एक साध-सुधं गाणं. लिहिण्यासारखं जास्त काही नाही म्हणुन.
५. सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है.
राजाबाबु-गोविंदा नि करिश्मा वैनी काय तुफान नाचले आहेत या गाण्यात. बनेल घालुन गोविंदा नि लेहंगा का काय ते घालुन क्रिश्मा. बाज, उश्या, चादरी यांचा यथासांग वापर करुन घेतलाय. या चित्रपटातील ईतरही गाणी छान आहेत, जसे पक चिक पक राजाबाबु आणी अ आ ई उ उ ऊ मेरा दिल ना तोडो.
६. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है.
अनु मलिक यांच्या आवाजातील देव कोहलींच सुंदर गाणं-जुडवा. सल्लुमियाँचा डँस नि रंभाकाकु नि करिश्मावैनी. सगळे 'एका पेक्षा एक'.
७. जब तक रहेगा समोसे मे आलु.
चित्रपट-मिस्टर & मिसेस खिलाडी. अनु मलिकचं गाणं. लिरिक्स (अतिशय फालतु )त्याचंच असावं बहुतेक. नो आयड्या.
८. मेरी छतरी के निचे आजा, क्यु सोचे है ---खडी खडी.
तहेलका नावाचा मल्टी स्टारर पिक्चर. वेणिवाला अमरिश, शक्तिमान, जावेद जाफरी, नसीरुद्दीन शाह (तद्दन फालतु चित्रपटात ह्याने काम करायला होकार का दिला? हे न कळालेलंच बरं). ४ जण मजा करण्याच्या मुडमध्ये असतील तर पाहता येण्याजोगा चित्रपट.
९. बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर.
१०. भरो माँग मेरी भरो, करो प्यार मुझे करो.
वरील दोन्हिही गाण्यांविषयी न लिहिलेलंच बरं.
११. मैने पैदल से जा रा था, उने आटो से आ री थी.
वाहहहह !!! वाहहहह !!! गाणं लिहावं तर असं. पक्क्या दख्खणी हैदराबादी भाषेतील. या भाषेच्या संदर्भासाठी 'द अंग्रेज' पहावा. एक्स्प्रेशन वाईज (लै विचार केला पण मराठी शबुत गावलाचं न्हाय) गोविंदा वेक लवंबर.
१२. एक चुम्मा तु मुझको उधार दई दे.
छोटे सरकार चित्रपटातील माथेफिरु लिरिक्स असलेलं गाणं. शिल्पा शेट्टी म्हतारी (सध्या) असुन इतकी छान दिस्त्ये. तेव्हा तर तिचा काळ होता. गोविंदाचे ठुमके एकावर एक. त्याच तर्हेचं शुल चित्रपटातील दिलवालों के दिल का करार लुटने.
१३. चांदी की डाल पर सोने का मोर.
सल्लुची टपोरी भुमिका, राणीचा लाडीक अभिनय आणी होळीचा धिंगाण्याचा माहौल.
१४. खिडकी खुली जरा, जरा पर्दा सरक गया.
गोविंदा वन्स अगेन-दिवाना मस्ताना. त्याच्या डँसने धुमाकुळ (हंगामा) घातला. अनिल कपूर, गोविंदा अन चावला आजी सर्वच जण खास.
या यादीत अजुन अलिकडे एक-दोनगाण्यांची वाढ झालेली आहे.
१५. नॉटी नॉटी सैया सैया - कॅश
ह्या गाण्याचे शब्दांकन चांगले आहे, पण चित्रीकरण ज्या पद्धतीने केलंय, ते अगदी अपर्तीमरित्या अर्वाच्य तर्हेने.
नट्यांच्या कापडांवर २ रुपये जरी जास्त खर्च केला असता तर आपल्या जुन्या (कसब्याच्या) बाजारातील नवी कापडं विकत घेता येत होती. त्या देओल काकुंच्या मर्दानी शरीराला पाहुन म्हणे खलीला घेर्या आलेल्या. गाणं छान, रितेशला दाढी करण्यासाठी मिपावरुन मदत करण्याचं आश्वासनसुद्धा.
तर मग मित्रहो कसं वाटलं ते कळवा. बाकीची या सदरातील गाणी आपण सुचवावी.
अवांतर : लिवायला लई कटाळा यितु. एक टंकलेखक फायजे. व्यनितुन संपर्क करा.
वाचने
14290
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त
एकदा शांतपणे ऐकाच
In reply to फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त by गणेशा
उडी उडी मै...कहा उडी
=)) =))
In reply to उडी उडी मै...कहा उडी by सविता
>>काय येक्केक गाणी निवडलीयेत
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
सविता मॅडम, असल्या गान्यांचा
In reply to उडी उडी मै...कहा उडी by सविता
हे चावट गाणं कसं विसरलात
स्पा... मी माधुरी बैंचा
In reply to हे चावट गाणं कसं विसरलात by स्पा
ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या
इंट्याभौ...
In reply to ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या by इंटरनेटस्नेही
. जवानी में अब जंग होने लगी
In reply to इंट्याभौ... by वपाडाव
१४ व्या वर्षी ब्रेक ऑफ
In reply to . जवानी में अब जंग होने लगी by इंटरनेटस्नेही
४. थोडासा प्यार हुआ है थोडा
In reply to १४ व्या वर्षी ब्रेक ऑफ by वपाडाव
कुठे गेल्यावर ?
In reply to ४. थोडासा प्यार हुआ है थोडा by टारझन
!
In reply to ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या by इंटरनेटस्नेही
हा हा हा, बाबा सुद्धा इथं
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
आपल्या लेखातील
मुन्नी अन शीला निव्वळ फिक्या
In reply to आपल्या लेखातील by आत्मशून्य
आणखी काही : १. बिडी जलाअॅदे
कल सैय्याने ऐसि ...........
आणि एक
हे गाणं, बोल ऐकले की लैच भारी
In reply to आणि एक by आनंदयात्री
जहर है के प्यार है तेरा
In reply to आणि एक by आनंदयात्री
अजुन एक
बोकोबा हे
In reply to अजुन एक by बोक्या सातबन्दे
अंगूर.....
अन हे "..................कल
सध्या एवढीच आठवत आहेत...
तोफा तोफा तोफा आपको आपको
In reply to सध्या एवढीच आठवत आहेत... by पिलीयन रायडर
साधारण छोट्या गावात केस
आमचे आगीत चार तेल्शिंतोडे
In reply to साधारण छोट्या गावात केस by गवि
+१
In reply to आमचे आगीत चार तेल्शिंतोडे by परिकथेतील राजकुमार
गावातल्या लोकांना असे टोचुन
In reply to +१ by छोटा डॉन
पर्या . डॉण्या शी. सहमत आहे
In reply to गावातल्या लोकांना असे टोचुन by टारझन
किमान बोलुन तरी
In reply to गावातल्या लोकांना असे टोचुन by टारझन
रेडिफ बोल
In reply to किमान बोलुन तरी by नरेशकुमार
चालेल, करतो. मग त्यावर आपन
In reply to रेडिफ बोल by शेखर
तिथे फक्त तुमच्या सारख्या
In reply to चालेल, करतो. मग त्यावर आपन by नरेशकुमार
+१ आमची फोडणीला मिर्ची
In reply to आमचे आगीत चार तेल्शिंतोडे by परिकथेतील राजकुमार
घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे
In reply to +१ आमची फोडणीला मिर्ची by वपाडाव
>>रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली
In reply to घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे by गवि
अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस
मदनबाणांनी आपलं वज्रास्त्र
In reply to अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस by मदनबाण
पोरांचा धागा आहे म्हणुन सोडुन
द्या की हो, नाहीतरि थोड्या
In reply to पोरांचा धागा आहे म्हणुन सोडुन by मुलूखावेगळी
बागडा रे मस्त. तुम्हांला
In reply to द्या की हो, नाहीतरि थोड्या by नरेशकुमार
आमचे काही पैसे...
१. चुम्मा दे गयी चुम्मा हो
वर दिलेली काही गाणी त्यांच्या
ओ पडोसन अपनी मुरगी को रखना
हम तो तंबू में बंबू लगाई रहे
In reply to ओ पडोसन अपनी मुरगी को रखना by विजुभाऊ
(जो मर्द होता है उसे दर्द नही
In reply to हम तो तंबू में बंबू लगाई रहे by गवि
(मर्द मराठा)वपाडाव
In reply to (जो मर्द होता है उसे दर्द नही by वपाडाव
शिंपल हाय, खिशात himani fast
In reply to (मर्द मराठा)वपाडाव by गोगोल
नाही-१अमितजींच्या या
In reply to (जो मर्द होता है उसे दर्द नही by वपाडाव
अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली
गायिकेचा (?) आवाज सोनु कक्कर
In reply to अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली by स्पा
मोठे व्हा!
In reply to अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली by स्पा
ती बी काय कमी नाय !!!!! लोक
In reply to मोठे व्हा! by धमाल मुलगा
"दिल का दरवाजा
श्या ! ह्या सगळ्यात आमच्या
नाराज......
In reply to श्या ! ह्या सगळ्यात आमच्या by परिकथेतील राजकुमार
आभार