ढेकणांचा अड्डा
काव्यरस
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण
भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून
पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा
फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा
झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या
अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा
आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती
त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती
तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी
दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी
भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे
नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे
पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे
गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
वाचने
5380
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्त
हा हा हा !!!
ढेकुण डास आणि झुरळ, तिनही
In reply to ढेकुण डास आणि झुरळ, तिनही by गणपा
अरे वा !! आज चायनिज बेत होता
ही ही ही.
In reply to ही ही ही. by रेवती
हा हा हा
पुण्याच्या होस्टेलची
गणेशा आणि प्रकाश१११ ह्यांनी
मस्त कविता अमोल
ढेकूण
In reply to ढेकूण by विजुभाऊ
कसला गोड दिसतोय !! विजुभाउ
In reply to कसला गोड दिसतोय !! विजुभाउ by अवलिया
व्वा @@ काय टवटवीत ढेकुण आहे
In reply to व्वा @@ काय टवटवीत ढेकुण आहे by टारझन
घरी करुन खानार हायेस की भायेर
In reply to ढेकूण by विजुभाऊ
विजुभाउ तुमच्या घरचा काय?
In reply to विजुभाउ तुमच्या घरचा काय? by Nile
नाही विजुभाऊ सध्या फिरतीवर
मस्त
ही ढेकणी कविता दाखवल्याबद्दल
(No subject)
ह ह पु वा